भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार २०१८
- लेझर फिजिक्स या विषयात केलेल्या अतुलनीय कार्यासाठी अमेरिकेचे आर्थर ॲश्किन, फ्रान्सचे गेरार्ड मोरौ आणि कॅनडातील डोना स्ट्रीकलँड या तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला.
- ॲश्किन यांना ऑप्टिकल ट्विजर्सवर केलेल्या संशोधनासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी लेझर बीमद्वारे कण, अणू, व्हायरस आणि पेशींना पकडणारे तंत्र शोधून काढले.
- तर सर्वात सूक्ष्म व गतिशील लेझर तरंगांचा शोध लावण्यासाठी मोरौ व स्ट्रीकलँड यांना हा पुरस्कार मिळाला.
- लेझर तंत्रज्ञान आरोग्य आणि उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरले जाते. डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी शोध लावलेल्या तंत्राचा उपयोग होऊ शकेल.
- याबरोबरच वयाच्या ९६व्या वर्षी नोबेल मिळवणारे आर्थर ॲश्किन सर्वात वयोवृद्ध शास्त्रज्ञ ठरले आहे.
- ॲश्किन यांच्या आधी २००७ मध्ये अमेरिकेतील लियोनिद हुर्विज यांना ९०व्या वर्षी अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले.
- ५७ वर्षांच्या लेझर संशोधनात ॲश्किन यांनी १०७ शोध प्रबंध लिहिले. ४७ पेटंट त्यांच्या नावावर आहेत. ५०हून जास्त शास्त्रज्ञांसोबत काम केले. यातील तिघांना नोबेलही मिळाला आहे.
- तसेच कॅनडातील ओंटारिओ विद्यापीठाच्या संशोधक डोना स्ट्रीकलँड ५५ वर्षांनंतर फिजिक्समध्ये नोबेल मिळवणाऱ्या महिला ठरल्या आहेत.
- भौतिकशास्त्रामध्ये नोबेल जिंकणाऱ्या स्ट्रीकलँड तिसऱ्या महिला आहेत. त्यांच्या अगोदर १९०३मध्ये मेरी क्युरी आणि १९६३मध्ये मारिया मेयर यांना नोबेल मिळाला होता.
- मेरी फिजिक्समध्ये नोबेल मिळवणाऱ्या पहिल्या महिला आहेत. त्यांना पती पियरे क्युरी आणि हॅन्री बॅक्वेरल यांच्यासह संयुक्त पुरस्कार देण्यात आला होता.
- गेल्या वर्षीदेखील भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार रेनर वेईस, बॅरी बॅरीश, कीप थॉर्न या ३ संशोधकांना गुरुत्वीय लहरींच्या संशोधनासाठी विभागून देण्यात आला होता. हे तिन्ही वैज्ञानिक अमेरिकेचे होते.
इंदूर आणि भोपाळ मेट्रो रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
- केंद्रीय मंत्रिमंडळाने इंदूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला आणि २ कॉरिडॉर्सचा समावेश असलेल्या भोपाळ मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे.
- हे दोन्ही प्रकल्प इंदूर आणि भोपाळमधील सर्व प्रमुख आणि शहरी भागांना मेट्रोने जोडणार आहेत.
- या दोन्ही प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मध्यप्रदेश मेट्रो रेल कंपनी लिमिटेडची स्थापना करण्यात आली आहे.
- या प्रकल्पाला केंद्र व मध्यप्रदेश सरकार समप्रमाणात आणि युरोपिअन इन्व्हेस्टमेंट बँकेकडून अंशतः कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य पुरविण्यात येईल.
इंदूर मेट्रो रेल्वे प्रकल्प
- यामध्ये बंगाली स्क्वेअर-विजय नगर-भावरसाला-विमानतळ-पॅटॅसिया-बंगाली स्क्वेअर या ३१.५५ किलोमीटर लांबीच्या रिंग लाईनचा समावेश आहे.
- या रिंग लाइनवर एकूण ३० स्थानके असतील. या प्रकल्पाचा एकूण खर्च ७५००.८० कोटी रुपये असून ४ वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाईल.
भोपाळ मेट्रो रेल्वे प्रकल्प
- भोपाळमधील प्रमुख भागांना जोडणाऱ्या करोंद सर्कल ते एम्स (१४.९९ किमी ) आणि भडभडा स्क्वेअर ते रत्नागिरी तिराहा (१२.८८ किमी) असा एकूण २७.८७ किमी लांबीचा हा प्रकल्प असेल.
- यापैकी करोंद सर्कल ते एम्स या कॉरिडॉरचा बहुतांश भाग उन्नत तर थोडासा भाग भुयारी असेल.
- करोंद सर्कल ते एम्स या मार्गावर एकूण १६ स्थानके असतील, तर भडभडा स्क्वेअर ते रत्नागिरी तिराहा या मार्गावर एकूण १४ स्थानके असतील.
- प्रकल्पाचा एकूण खर्च ६९४१.४० कोटी रुपये असून ४ वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाईल.
फायदे
- या मेट्रो रेल्वे प्रकल्पालगतच्या रहिवासी भागाला या प्रकल्पांचा लाभ होणार असून त्यांना शहरातील विविध भागात पोहचणे सोयीचे होईल
- भोपाळमधील २३ लाख आणि इंदूरमधील ३० लाख लोकसंख्येला या मेट्रो रेल्वे प्रकल्पांमुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लाभ होण्याची शक्यता आहे.
- यामुळे शहरात किफायतशीर, विश्वासार्ह, सुरक्षित आणि वेगवान वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल.
- तसेच अपघात, प्रदूषण, प्रवासाचा वेळ, इंधनाचा वापर यांच्यात घट होईल आणि शाश्वत विकासासाठी जमिनीचा वापर आणि विस्तार यांचे नियमन होईल.
- या प्रकल्पातून भाडे आणि जाहिराती स्वरूपात तसेच टीओडी आणि टीडीआरच्या माध्यमातून महसूल मिळेल.
- नागरिक, प्रवासी, औद्योगिक कर्मचारी , पर्यटक यांना ही मेट्रो रेल्वे पर्यावरण-स्नेही आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवेल.
नालसाच्या कार्यकारी अध्यक्षपदी मदन लोकूर
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाच्या (नालसा) कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश मदन भीमराव लोकूर यांची नियुक्ती केली.
- कायदेशीर प्राधिकरण कायदा, १९८७च्या कलम ३ मधील उप-कलम ३ब अंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली आहे.
मदन भीमराव लोकूर
- मदन भीमराव लोकूर यांनी दिल्लीतील मॉडर्न स्कूल आणि सेंट स्टीफन्स कॉलेज येथून शिक्षण घेतले आहे.
- १९७७मध्ये त्यांनी वकील म्हणून कारकीर्दीस प्रारंभ केला. नागरी, गुन्हेगारी, संवैधानिक, महसूल आणि सेवा नियमांच्या संदर्भात त्यांना दांडगा अनुभव आहे.
- जुलै १९९८ ते फेब्रुवारी १९९९ या कालावधीत त्यांनी भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून कार्य केले. फेब्रुवारी १९९९मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले.
- जून २०१० ते जून २०१२ या कला त्यांनी प्रथम गुवाहाटी आणि त्यानंतर आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले.
- जून २०१२मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमण्यात आले.
भारतीय राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण
- इंग्रजी: इंडियन नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी (NALSA)
- स्थापना: ५ डिसेंबर १९९५ (लीगल सर्व्हिसेस ऑथोरिटीज ॲक्ट, १९८७अन्वये)
- नालसा कोठडीत असलेल्या व्यक्तीस मोफत कायदेशीर सहाय्य प्रदान करते.
- तसेच हे प्राधिकरण नागरी किंवा गुन्हेगारी प्रकरणांमध्ये गरीबांना मोफत कायदेशीर सहाय्य प्रदान करते.
- याशिवाय विवादांचे मैत्रीपूर्ण प्रकारे जलद निराकरण करण्यासाआठी नालसा लोक अदालतीचेही आयोजन करते.
१ ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस
- जगभरात १ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाद्वारे जेष्ठ नागरिकांसंबंधी विषयांवर जागरुकताही निर्माण केली जाते.
- संयुक्त राष्ट्रसंघाने १४ डिसेंबर १९९० रोजी हा दिन साजरा करण्यासंबंधी घोषणा केली होती. १ ऑक्टोबर १९९१ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा केला गेला.
- यावर्षीच्या ज्येष्ठ नागरिक दिनाचा मुख्य विषय ‘Celebrating Older Human Rights Champions’ हा होता.
- हा विषय सार्वत्रिक मानवाधिकारांच्या घोषणेच्या ७०व्या वर्धापनदिनानिमित्त मानवी हक्कांच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो.
- या दिवशी, वृद्धांच्या कल्याणासाठी चिंतन केले जाते आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या अमुल्य योगदानासाठी सन्मानित केले जाते. याशिवाय वृद्धांना सेवा प्रदान करण्याऱ्या संस्थांचाही गौरव केला जातो.
रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०१८
- रसायनशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल फ्रान्सिस अरनॉल्ड (अमेरिका), जॉर्ज स्मिथ (अमेरिका) आणि सर जॉर्ज विंटर (ब्रिटन) या तीन शास्त्रज्ञांना यंदाचा नोबेल जाहीर झाला आहे.
- प्रोटीन आणि एन्झामाईन विषयातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
- अरनॉल्ड यांनी एन्झामाईन बनविण्याची थेट प्रक्रिया शोधून काढली आहे. हे जैविक इंधनापासून फार्मास्युटीकलमध्ये वापरण्यात येतील.
- यासोबतच विंटर आणि स्मिथ यांना अनुक्रमे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असणारा घटक बनविण्यासाठी आणि प्रोटीननिर्मितीसाठी सन्मानित करण्यात आले आहे.
- या संशोधनामुळे पर्यावरणपूरक रसायनांच्या निर्मितीलाही हातभार लागला आहे. त्यात औषधे तसेच इंधनांचाही समावेश आहे.
- कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अरनॉल्ड या रसायनशास्त्राचा पुरस्कार जिंकणाऱ्या पाचव्या महिला शास्त्रज्ञ आहेत.
- त्यांना नोबेल पुरस्काराच्या रकमेतील अर्धा हिस्सा म्हणजेच एक दशलक्ष डॉलर इतकी रक्कम त्यांना दिली जाणार आहे. तर उर्वरित रक्कम स्मिथ आणि विंटर यांना विभागून दिली जाणार आहे.
- २०१७चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जॅक्स ड्युबोशे, जोआकिम फ्रॅंक आणि रिचर्ड हेंडरसन या तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आला होता.
IBSAMAR २०१८ नौदल युद्धसराव
- भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या नौदालांदरम्यान आयोजित IBSAMAR युद्धसरावाच्या ६व्या आवृत्तीचे आयोजन दक्षिण आफ्रिकेतील सिमोंस टाउन येथे करण्यात आले.
- यामध्ये सहभागी नौदालांमध्ये सामुहिक प्रशिक्षण, इंटरऑपरेबिलिटी आणि परस्पर सहकार्य विकसित करणे, हे या सरावाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- या युद्धसरावाची सुरुवात २००६मध्ये झाली. लोकशाही मूल्ये, आर्थिक हितसंबंध आणि समुद्री सहकार्याच्या दृष्टीने हा युद्धसराव महत्वपूर्ण आहे.
- यापूर्वीचा IBSAMAR युद्ध अभ्यास फेब्रुवारी २०१६मध्ये गोव्याजवळील समुद्री क्षेत्रामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यापूर्वीचे सर्व सराव दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आले आहेत.
IBSAMAR २०१८
- या युद्धसरावामध्ये बंदर आणि सागरी अशा दोन टप्प्यातील सरावाचा समावेश होता.
- या युद्धसरावामध्ये सागरी दिशादर्शन, संरक्षण, सरफेस वेपन फायरिंग, अँटी-एअर तसेच पाणबुडी विरोधी शस्त्रे यांचा अभ्यास करण्यात आला.
- व्यावसायिक कार्वायांव्यतिरिक्त यात क्रीडा आणि सामाजिक उपक्रमही समाविष्ट होते.
- या सरावात भारताचे प्रतिनिधित्व गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर कलकत्ता, गाइडेड मिसाइल फ्रिजेट तर्कश, लांब पल्ल्याचे सागरी एयरक्राफ्ट P8I, सीकिंग व चेतक हेलीकॉप्टर आणि MARCOS यांनी केले.
- दक्षिण आफ्रिकेच्या नौदलाचे प्रतिनिधित्व SAS अमतोला, SAS प्रोटीया आणि SAS मंथातिसी यांनी केले.
- ब्राझिलच्या नौदलाचे प्रतिनिधित्व BNS बार्रोसो, स्पेशल फोर्स पलटण आणि AS३५० एकुरयूइल यांनी केले होते.
आयबीएसए (IBSA)
- IBSA: India Brazil South Africa
- हा भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या ३ देशांचा एक गट आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणे हा त्यांचा उद्देश आहे.
- हे ३ देश आफ्रिका, आशिया व दक्षिण अमेरिका अशा ३ वेगवेगळ्या खंडांचे प्रतिनिधीत्व करतात.
- या गटामध्ये तीनही देश कृषी, व्यापार, संस्कृती आणि संरक्षण या संबंधित मुद्द्यांवर चर्चा करतात.
- जागतिक समस्यांवर सहकार्य करण्यासाठी आयबीएसए एक महत्त्वाचा मंच आहे..
डब्लूईएफच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी विक्रम लिमये
- राष्ट्रीय शेअर बाजाराचे (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांची वर्ल्ड फेडरेशन एक्स्चेंजच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
- वर्ल्ड फेडरेशन एक्स्चेंजच्या अखत्यारीत जवळपास ४५ हजार कंपन्या सूचीबद्ध आहेत.
- त्यांच्या कारभाराचे नियंत्रण करणाऱ्या कार्यकारी समितीत ६ नव्या सदस्यांची नियुक्ती झाली असून समितीच्या सदस्यांची संख्या आता ७० झाली आहे. या समितीचे नेतृत्त्व विक्रम लिमये यांच्याकडे असणार आहे.
- वर्ल्ड फेडरेशन एक्स्चेंजची कार्यकारी समिती ही फेडरेशनचे इंजिन आहे. फेडरेशनच्या कामकाजाची दिशा या समितीच्या हातात असते.
- विक्रम लिमये गेल्या वर्षभरापासून एनएसईच्या सीईओ आणि एमडीपदाचे कामकाज पाहात होते. आयडीएफसीचे एमडी म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले आहे.
- वर्ल्ड फेडरेशन एक्स्चेंजच्या सीईओ: नंदिनी सुकुमार
इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी बरहम सालेह
- बरहम सालेह यांची इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सालेह हे इराकचे आठवे राष्ट्राध्यक्ष असतील.
- बरहम सालेह पेट्रिऑटिक यूनियन ऑफ कुर्दिस्तानचे (पीयूके) राष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार होते आहेत. इराकच्या राष्ट्रपती पदासाठी एकूण २० उमेदवार उभे होते.
- कुर्दिश राजकारणात नेहमी पेट्रिऑटिक यूनियन ऑफ कुर्दिस्तानशी (पीयूके) आणि कुर्दिस्तान डेमोक्रॅटिक पक्षाचे (केडीपी) प्रभुत्व राहिले आहे.
- सालेह यांनी कुर्दिस्तान डेमोक्रॅटिक पक्षाचे (केडीपी) उमेदवार फुआद हुसेन यांचा पराभव केला. सालेह यांना २२० तर फुआद यांना २२ मते मिळाली.
- सालेह यांनी अदेल अब्दुल महदी यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील ३० दिवसांमध्ये मेहदी यांना संसदेत त्यांची कॅबिनेटची यादी सादर करावी लागेल.
बरहम सालेह
- जन्म: १२ सप्टेंबर १९६०
- १९७६मध्ये ते पीयूकेमध्ये सामील झाला. त्यापूर्वी ते कुर्दिस्तान प्रादेशिक सरकारचे पंतप्रधानही होते. तसेच इराकी संघराज्य सरकारमध्ये त्यांनी उप-पंतप्रधान म्हणूनही काम केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा