भ्रष्टाचार आकलन निर्देशांक २०१८


भ्रष्टाचार आकलन निर्देशांक २०१८

  • अलीकडेच ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या संस्थेने भ्रष्टाचार आकलन निर्देशांक २०१८ जारी केला. ही संस्था सार्वजनिक क्षेत्रात होणारा भ्रष्टाचार मोजण्याचे काम करते.
  • हा निर्देशांक सार्वजनिक क्षेत्र आणि न्यायपालिकेतील भ्रष्टाचाराच्या संदर्भात तज्ञांच्या आणि व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या आकलनावर आधारित आहे.
  • या निर्देशांकाचा वापर जगभरातील भ्रष्टाचाराचा संकेत म्हणून केला जातो. यामध्ये व्यवसाय क्षेत्रातील भ्रष्टाचार समाविष्ट नाही.
  • या निर्देशांकात १८० देशांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे आणि देशांना ० ते १०० गुण देण्यात आले आहेत. ० गुण असलेला असलेला सर्वाधिक भ्रष्ट तर १०० गुण असलेला देश सर्वाधिक प्रामाणिक मानला जातो.
  • टीप: ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल ही १९९३मध्ये स्थापन झालेली बर्लिन (जर्मनी) स्थित एक आंतरराष्ट्रीय गैर-सरकारी संस्था आहे.

या निर्देशांकात भारताचे प्रदर्शन
  • २०१७मध्ये या निर्देशांकात भारताला ४० गुण होते, जे २०१८मध्ये वाढून ४१ झाले.
  • २०१७मध्ये भारत या निर्देशांकात ८१व्या स्थानी होता. तर २०१८मध्ये भारत ७८व्या स्थानी आहे. २०१६मध्ये भारत ७९व्या स्थानावर होता.
  • या अहवालात असे म्हटले आहे की भारत, पाकिस्तान, मलेशिया व मालदीवचे भविष्यातील उपक्रम फार महत्वाचे असतील.
  • या देशांमध्ये मागील काही काळात भ्रष्टाचारविरोधी जनतेची आंदोलने झाली आहेत. तसेच भ्रष्टाचार कमी करण्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांच्या बाजूने जनतेने मतदान केले आहे. परंतु अजूनही या देशांमध्ये भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.
  • भारतातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या निर्देशांक गुणसंख्येमध्ये २०१७च्या ४० वरून ४१पर्यंत वाढ झाली आहे.
  • २०११मधील भारतातील प्रभावी भ्रष्टाचारविरोधी चळवळीनंतरही आतापर्यंत जन लोकपालबद्दल कोणतीही विशेष प्रगती झालेली नाही.
  • सर्वोच्च न्यायालयाने लोकपाल निवड समितीला दिलेल्या फेब्रुवारी अखेरपर्यंतच्या मुदतीच्या पार्श्वभूमीवर या अहवालातील निरीक्षणे महत्वाची ठरतात.
या अहवालातील इतर मुद्दे
  • जगात डेन्मार्कमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार असून डेन्मार्कला १०० पैकी ८८ गुण मिळाले आहेत. डेन्मार्क पाठोपाठ यात न्युझीलँड व फिनलँड हे या यादीत सर्वात प्रामाणिक देश ठरले आहेत.
  • सोमालिया या यादीत सर्वात खाली म्हणजेच जगातील सर्वात भेष्ट देश ठरला आहे. त्यापाठोपाठ दक्षिण सुदान आणि सिरीया या देशांचा क्रमांक लागतो.
  • सर्वेक्षण करण्यात आलेल्या देशांपैकी जगभरातील दोन तृतीयांश पेक्षा अधिक देशांना सरासरी ५० पेक्षा कमी गुण मिळाले. यावर्षाची एकूण सर्व देशांची सरासरी गुंणसंख्या ४३ आहे.
  • यावर्षी इस्टोनिया, आयव्हरी कोस्ट, सेनेगल आणि गुयाना या देशांनी २०१२च्या तुलनेत सर्वाधिक सुधारणा केल्या आहेत.
  • २०१८च्या क्रमवारीनुसार ऑस्ट्रेलिया, चिली व माल्टा या देशामधील भ्रष्टाचार वाढला आहे.
  • यावर्षी पहिल्यांदाच अमेरिकेला अव्वल २० देशांच्या यादीत स्थान मिळाले नाही. ब्राझीलसह अमेरिकेलाही ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलद्वारे वॉचलिस्टमध्ये ठेवण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा