चालू घडामोडी - २० जानेवारी २०१५

·        २० जानेवारी १९८८ : खान अब्दुल गफार खान स्मृतीदिन
·        गेल्या चार वर्षांत देशातील वाघांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाली असून आता विविध जंगलांमध्ये2226 Tigers in India तब्बल २२२६ वाघ वास्तव्य करत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
·        २०१०च्या व्याघ्रगणनेत देशात १७०६ वाघ आढळले होते. त्यानंतर २०१४ मध्ये भारतीय वन्यजीव संस्थांच्यावतीने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रधिकरणाने देशभरात ट्रान्झिट पद्धतीने व्याघ्रगणना केली. त्यात २२२६ वाघांची नोंद झाली आहे.
·        जगातील एकूण वाघांपैकी तब्बल ७० टक्के वाघ भारतात आहेत.
·        यंदाच्या व्याघ्रगणनेत कर्नाटकात सर्वाधिक ३४० वाघ आढळले असून तामिळनाडूतील व्याघ्र प्रकल्पांमध्ये २२९ वाघांचं वास्तव्य आहे. मध्य प्रदेशात २०८, महाराष्ट्रात १९० आणि बंगालमधील सुंदरबनमध्ये ७६ वाघांची नोंद झाली आहे.
·        द इन्स्टिट्यूट ऑफ चाटर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियामार्फत (आयसीएआय) नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. हा निकाल ८.२३ टक्के लागला.
·        गुडगावच्या विजेंद्र अगरवाल याने ६९.७५ टक्के मिळवत देशात पहिला क्रमांक तर अहमदाबाद येथील पूजा पारीख हिने ६९.५ टक्के मिळवून दुसरा क्रमांक पटकावला.
·        नंदुरबार येथील संतोष नानकणी व हावडा येथील निकिता गोयल या दोघांनी ६९.१३ टक्के गुणांसह संयुक्तपणे तिसरा क्रमांक मिळविला आहे.
·        सरकारच्या धोरणावर आगपाखड करीत लीला सॅमसन यांनी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारने बोर्डाचे पुनर्गठन करीत अन्य नऊ सदस्यांचीही नियुक्ती केली.
·        डेरा सच्चाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांची मुख्य भूमिका असलेल्या मेसेंजर ऑफ गॉड या वादग्रस्त चित्रपटाला Pahlaj Nihlani - New President of Censor Board चित्रपट प्रमाणीकरण अँपिलेट लवादाने (एफसीएटी) मंजुरी दिल्यानंतर लीला सॅमसन यांनी तडकाफडकी राजीनाम्याचा निर्णय घेतला होता.
·        बोर्डाने मनाई केली असतानाही एफसीएटीने प्रदर्शनाला मंजुरी दिल्याने त्या नाराज झाल्या होत्या. त्यांच्या सर्मथनार्थ बोर्डाच्या अनेक सदस्यांनीही राजीनामे दिले होते.
·        सरकारने बोर्डाचे नऊ सदस्यही नियुक्त केले आहेत. या नऊ सदस्यांमध्ये भाजपा नेत्या वाणी त्रिपाठी टिक्कू, चित्रपट निर्माते अशोक पंडित, चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा समावेश आहे. अन्य सदस्यांमध्ये पटकथा लेखक मिहिर भुटा, सय्यद अब्दुल बारी, रमेश पतंगे, कलाकार जॉर्ज बेकर, अभिनेता आणि चित्रपट निर्माता जिविता आणि अभिनेता एस. व्ही. शेखर यांचा समावेश आहे.
·        अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संस्थेकडून (एनएसएस) यंदाचा स्पेस पायोनियर पुरस्कार भारताच्या मंगळ मोहिमेवर काम करणाऱ्या पथकाला जाहीर करण्यात आला आहे.
·        हा पुरस्कार मे महिन्यात टोरंटोमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अवकाश विकास परिषदेदरम्यान (आयएसडीसी) देण्यात येणार आहे.
·        आंबा लवकर पिकवण्यासाठी रसायने आणि औषधे यांचा वापर होत असल्याचे कारण देत युरोपीयन युनियनने हापूसवर बंदी घातली होती.
·        ही बंदी युरोपीयन युनियनने मागे घेतली आहे. त्यामुळे  हापूस आंब्याच्या युरोपमधील निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे.
·        किरण बेदी यांचे नाव भाजप पक्षाने दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले.

चालू घडामोडी - १९ जानेवारी २०१५

·        १९ जानेवारी १९०५ : देबेन्द्रनाथ टागोर स्मृतिदिन
·       दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डी-विलियर्सने विंडीजविरुद्धच्या वन डे सामन्यातA B Devilliers अवघ्या ३१ चेंडूत दमदार शतक ठोकत नवा विक्रम आपल्या नावावर केला.
·       त्याने ४४ चेंडूत ३३८.६४ च्या सरासरीने १४९ धावा केल्या आणि बाद झाला. त्याच्या खेळीत ९ चौकार आणि १६ षटकारांचा समावेश आहे.
·       प्रथम फलंदाजीला उतरलेल्या हाशिम आमला आणि रिली रोसू या दोघांची जोडी फोडणंच विंडिज संघाला कठीण गेलं. आमला आणि रोसू दोघांनही शतक ठोकले. रोसू १२८ धावांवर बाद झाला आणि आमला मात्र १५३ धावांवर नाबाद राहिला.
·       सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या ५० जागतिक बँकांच्या यादीत भारताच्या एचडीएफसी या एकमेव बँकेला स्थान मिळाले असून ४१ अब्ज डॉलर बाजारमूल्य (२०१४ अखेर) असलेली ही बँक यादीत ४५ व्या क्रमांकावर आहे.
·       स्टेट बँक (बाजारमूल्य ३६.४० अब्ज डॉलर) आणि आयसीआयसीआय बँक (बाजारमूल्य ३६.४० अब्ज डॉलर) अनुक्रमे ५१ आणि ५५ व्या क्रमांकावर आहे.
·       अमेरिकेतील वेल फार्गो ही जगातील सर्वात मोठी बँक असून जगभर ७ कोटी ग्राहक आणि ९ हजार शाखा असणाऱ्या या बँकेचे बाजारमूल्य २४८.३९ अब्ज डॉलर इतके प्रचंड आहे.
·       बाजारमूल्याच्या आधारावर इंडस्ट्रिअल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची बँक ठरली आहे. या बँकेचे बाजारमूल्य २३३.९४ अब्ज डॉलर इतके आहे.
·       पहिल्या दहा बँकांमध्ये अमेरिका आणि चीनच्या प्रत्येकी ४ आणि ब्रिटन, ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी एका बँकेचा समावेश आहे.
·       बाजारमूल्य - एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत आणि शेअर्सची एकूण संख्या यांचा गुणाकार.
·       सामाजिक बांधलकी (सीएसआर) म्हणून विविध उपक्रम राबवण्यासाठी सर्वाधिक खर्च करणाऱ्या जगभरातील कंपन्याच्या ‘फॉर्च्युन ग्लोबल ५००’ यादीत आठ भारतीय कंपन्या आहेत. रिलायन्स आणि ओएनजीसी आदी आठ कंपन्यांनी वर्षभरात ८ कोटी डॉलर ‘सीएसआर’साठी खर्च केले आहेत.
·       या तुलनेत १३२ अमेरिकन कंपन्यांनी १० अब्ज डॉलर खर्च केले. २६ ब्रिटिश कंपन्यांनी २ अब्ज डॉलर, आठ ऑस्ट्रिलियन कंपन्यांनी ९० कोटी ८० लाख डॉलर तर आठ स्पॅनिश कंपन्यांनी ६० कोटी ४८ लाख डॉलर खर्च केले आहेत.
·       जगभरातील कंपन्यांच्या तुलनेत भारतीय कंपन्यांच्या सामाजिक प्रकल्पांवर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी असून प्रत्येकी सुमारे १ कोटी डॉलर इतके आहे. अर्थात चीन आणि जपानी कंपन्यांपेक्षा ते जास्त आहे.
·       यूपीए सरकारमध्ये मंत्री राहिलेले कॉंग्रेस नेते कृष्णा तिरथ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
·       अमेरिकेतील उद्योजक आणिFrank Islam समाजसेवक फ्रँक इस्लाम यांना मार्टिन ल्युथर किंग (ज्यु) पुरस्कार प्रदान करण्यात आला.
·       आंतरराष्ट्रीय सेवा आणि नागरी क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल दि मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष हॅरी जॉन्सन यांच्या हस्ते इस्लाम यांना गौरविण्यात आले.
·       इस्लाम मूळचे उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील आहेत.

चालू घडामोडी - १८ जानेवारी २०१५

·        १८ जानेवारी १८४२:  महादेव गोविंद रानडे जन्मदिन
·        प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर तब्बल ३२ वर्षांनी तेजस हे हलक्या वजनाचे लढाऊ (लाइट कॉम्बॅट) विमान संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केले.
·        एअर चीफ मार्शल अरुप राहा यांनी पर्रीकर यांच्याकडून या विमानाची कागदपत्रं ताब्यात घेतली.
·        तेजस हे लढाऊ विमान तुलनेने हलके, चपळ आणि योजनाबद्ध हालचाली करणारे लढाऊ विमान असून, हवाई दलाच्या ताफ्यात सध्याच्या मिग-२१ऐवजी आता तेजसचा समावेश होईल.
·        डीआरडीओ आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यातर्फे संयुक्तरीत्या राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची किंमत ३० हजार कोटींच्या आसपास आहे. भारतीय नौदल आणि हवाई दलाला तेजसचा उपयोग होणार आहे.
·        एकूण खर्च : केवळ उत्पादनासाठी ५५ हजार कोटी ( हवाई दल, नौदल आवृत्त्यांसाठी प्रशिक्षण विमान पण कावेरी इंजिन फेल)
·        आता १७ हजार २६९ कोटी खर्च. जेट विमान २२० ते २५० कोटी रुपयांना तर १२० तेजस ३७ हजार ४४० कोटी रुपयांना पडणार.
·        वैशिष्ट्ये
Tejas
·        वजन : १२ टन
·        लांबी : १३.२ मीटर
·        उंची : ४.४ मीटर
·        पखांची लांबी : ८.२ मीटर
·        वेग : १,३५० कि.मी. प्रतितास
·        आकाशात भरारी : १५ कि.मी.
·        सर्वाधिक काळ उड्डाण : ४०० कि.मी. (मध्येच इंधन न भरता)
·        ६५ टक्के संपूर्ण स्वदेशी
·        इंजिन व इजेक्शन सीट अमेरिकी बनावटीचे
·        कॅनोपी सीट कॅनडाच्या बनावटीचे
·        आरोग्य सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी तसेच माता व अर्भक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात प्रथमच जिल्हा परिषदेच्यावतीने कोल्हापूरात चिरायु योजना सुरू करण्यात आली.
·        इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी पुढील पाच वर्षांत केंद्र सरकार ५०० कोटी रुपये खर्च करणार असून त्यातून ५.४ लाख लोकांना प्रशिक्षण दिले जाईल.
·        त्यापैकी १०० कोटी रुपये यूपीए सरकारने यापूर्वीच दिलेले होते मात्र, ही योजना काही राज्यांपुरतीच मर्यादित होती.
·        या योजनेचा दुसरा टप्पा सर्व राज्यांत लागू होणार असल्याचे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले.
·        भारताच्या सानिया मिर्झाने एपिया आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद मिळवले. सानियाचे हे कारकिर्दीतील २३वे जेतेपद आहे.
·        दुहेरीच्या अंतिम फेरीत सानियाने अमेरिकेच्या बेथनी मॅटेक-सँड्ससह खेळताना अमेरिकेच्या अॅबिगेल स्पिअर्स-रॅक्वेल कोप्स जोन्स या जोडीवर ६-३, ६-३ अशी मात केली. ही लढत ६९ मिनिटे चालली.
·        निती आयोगातर्फे २०१५ हे आंतरराष्ट्रीय मूल्यमापन वर्षम्हणून घोषित करण्यात आले आहे.
·        राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना झिम्बाब्वे, कॅनडा, बुरुंडी आणि यूएसए या चार देशांच्या भारतातील नवनियुक्त राष्ट्रदुतांनी आपली अधिकारपत्रे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना सादर केली.
·        या राजदूतांची नावे पुढीलप्रमाणे - मॅक्सवेल रंगा (झिम्बाब्वे), नादिर पटेल (कॅनडा), श्रीमती रेजीने काटाबारुम्वे (बुरुंडी) आणि रिचर्ड राहुल वर्मा (यूएसए).
·        १२वी स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन स्पर्धा २०१५
·        पुरुष गट :
·        प्रथम - तेजफाए अबेरा (इथिओपिया) (वेळ : २ तास ९ मिनिट ४४ सेकंद)
·        द्वितीय - देरेज देबेले (इथिओपिया) (वेळ : २ तास १० मिनिट २९ सेकंद)
·        तृतीय - ल्युक किबेट (केनिया) (वेळ : २ तास १० मिनिट ५४ सेकंद)
·        महिला गट :
·        प्रथम - दिनकेश मेकाश (इथिओपिया) (वेळ : २ तास २९ मिनिट ५८ सेकंद)
·        द्वितीय - कुमेशी सिचाला (इथिओपिया) (वेळ : २ तास ३० मिनिट ५३ सेकंद)
·        तृतीय - मार्टा मेगारा (इथिओपिया) (वेळ : २ तास ३१ मिनिट ४३ सेकंद)
·        पुरुष गट (भारतीय) :
Mumbai Marathon
·        प्रथम - करण सिंह (वेळ : २ तास २१ मिनिट ३४ सेकंद)
·        द्वितीय - अर्जुन प्रधान (वेळ : २ तास २२ मिनिट २१ सेकंद)
·        तृतीय - बहादुरसिंह धोनी (वेळ : २ तास २२ मिनिट ४१ सेकंद)
·        महिला गट (भारतीय) :
·        प्रथम - जैशा ओ. पी (वेळ : २ तास ३७ मिनिट २९ सेकंद)
·        द्वितीय - ललिता बाबर (वेळ : २ तास ३८ मिनिट २१ सेकंद)
·        तृतीय - सुधा सिंग (वेळ : २ तास ४२ मिनिट ११ सेकंद)
·        सगळ्यात छोटा धावपटू: ११ वर्षीय रोहन गोकर्ण हा सहावीत शिकणारा चिमुकला ठरलाय मुंबई मॅरेथॉन ड्रीम रन पूर्ण करणारा सगळ्यात लहान धावपटू. त्याने २ तास १० मिनिटांत ६ किमीचे लक्ष्य गाठले.