सचिनचे ‘प्लेइंग इट माय वे’ हे आत्मचिरित्र कथा (फिक्शन) आणि गैरकथा (नॉन फिक्शन) प्रकारात सर्वात जास्त विकले गेलेले (बेस्टसेलर) पेपरबॅक पुस्तक बनल्यामुळं त्याची नोंद ‘लिम्का बूक ऑफ रेकॉड्स’मध्ये झाली आहे.
सचिनच्या आत्मचित्रानं डॅन ब्राउन यांचे ‘इनफर्नो’, वॉल्टर इसाकसन यांचे ‘स्टीव्ह जॉब्स’ आणि जे. के. रॉलिंग यांचे ‘कॅज्युअल व्हॅकेन्सी’ यांना मागे टाकत सर्वोच्च स्थान प्राप्त केले.
हे पुस्तक ६ नोव्हेंबर २०१४ ला हॅचेट इंडियाने पब्लिश केले. तसेच या आत्मचरित्रासाठी सचिन तेंडुलकर शिवाय क्रिकेट एक्सपर्ट बोरिया मजूमदार यांनीही लेखन केले आहे.
या आत्मचरित्रासाठी पहिल्याच दिवशी आलेली मागणी आणि लाइफटाइम विक्री अशा दोन्ही प्रकारांमध्ये हे आत्मचरित्र सर्वात पुढे आहे. अत्तापर्यंत ‘प्लेइंग इट माय वे’च्या तब्बल १ लाख ५० हजार २८९ विकल्या गेल्या आहेत.
सचिनच्या आत्मचरित्राने किरकोळ विक्रीमूल्यामध्ये देखील रेकॉर्ड बनवले असून त्याची किंमत ८९९ रूपये इतकी आहे. या विक्रीतून तब्बल १३ कोटी ५१ लाख रूपयांची कमाई झाली आहे.
अमेरिकेकडून भारत घेणार हॉवित्झर तोफा
बीएई सिस्टिम्सने भारतीय कंपनी महिंद्राशी‘एम ७७७ हॉवित्झर’ तोफांच्या पुरवठ्यासाठी करार केला असून, १४५ तोफांचा हा करार सुमारे ७० कोटी डॉलरचा असणार आहे.
‘एम ७७७ हॉवित्झर’ या तोफांची दुरुस्ती, सुटे भाग आणि दारूगोळा भारतीय कंपनीसोबत भागीदारीत भारतातच उत्पादित करण्यात येणार आहे.
भारतीय लष्कराला १४५ ‘एम ७७७ हॉवित्झर’ तोफा खरेदी करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात चर्चा झाली होती. बीएईने भारतातील ‘असेंब्ली, इंटिग्रेशन ऍण्ड टेस्ट’ केंद्रासाठी महिंद्रा कंपनीची निवड केली आहे.
व्हेनेझुएलाने केले चलनाचे अवमूल्यन
व्हेनेझुएलाने सरकारी चलन बोलिव्हरचे ३७ टक्के अवमूल्यन केले असून, कच्च्या तेलाच्या भावात घसरण होत असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या ‘ओपेक’ देशांनी सुरू केलेल्या उपाययोजनांचा हा भाग आहे.
याआधी अमेरिकी डॉलरचा भाव ६.३ बोलिव्हर होता. तो आता १० बोलिव्हरपर्यंत जाणार आहे. हा भाव कायम बदलत राहणार असून, तो जीवनावश्यक वस्तू आणि औषधांसाठी लागू राहणार आहे.
व्हेनेझुएलाची ९५ टक्के अर्थव्यवस्था कच्च्या तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. कच्च्या तेलाच्या भावातील घसरणीमुळे अर्थव्यवस्थेची घसरण होत असल्याने सरकारने उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. तसेच, देशात प्रथमच २० वर्षांमध्ये पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
‘ओपेक’ तेल उत्पादक देशांची संघटना आहे. कच्च्या तेलाच्या भावात आंतरराष्ट्रीय पातळीवर मागील १९ महिन्यांपासून घसरण होत आहे.
त्यातच इराणवर आण्विक कार्यक्रमामुळे लादण्यात आलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध उठविण्यात आले आहेत. यामुळे इराणकडून पुरवठ्यात वाढ झाल्याने भावात सातत्याने घसरण होत आहे. याचा परिणाम म्हणून ‘ओपेक’ सदस्य देशांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष : निकोलाय मडुरो
केवळ २५१ रुपयांमध्ये स्मार्टफोन
रिंगिंग बेल या नोएडास्थित मोबाइल उत्पादक कंपनीने ‘फ्रीडम २५१’ या सर्वांत स्वस्त स्मार्टफोनचे दिल्लीत लॉंचिंग केले. नावाप्रमाणेच सर्वांनाच स्मार्टफोन वापरण्याचे स्वातंत्र्य मिळणार असून, याची किंमत केवळ २५१ रुपये (४ डॉलर) आहे.
दिल्लीमध्ये संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या फोनचे अनावरण केले. ऑनलाइन सेलमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ३० जूनपर्यंत फोनची डिलेव्हरी देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
या फोनमध्ये वुमन सेफ्टी, स्वच्छ भारत यांसारखी अनेक अॅप्स प्रीलोडेड असून, एक वर्षांची वॉरंटी आहे. कंपनीची ६५० सर्व्हिस सेंटर आहे.
फ्रीडम २५१ साठी रिंगिंग बेल या कंपनीने www.freedom251.com ही स्वतंत्र वेबसाइट सुरू केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा