चालू घडामोडी : ११ फेब्रुवारी
ऑस्ट्रेलियातील भारताच्या उच्चायुक्तपदी हरिंदर सिद्धू
- भारतीय वंशाच्या मुत्सद्दी हरिंदर सिद्धू यांची ऑस्ट्रेलियन सरकारने भारताच्या उच्चायुक्तपदी नियुक्ती केली आहे. सध्याचे उच्चायुक्त पॅट्रिक सकलिंग यांचा कालावधी संपत आल्याने सिद्धू यांचे नाव जाहीर करण्यात आले.
- या पदावर निवड झालेल्या पाच वर्षांतील त्या दुसऱ्या भारतीय वंशाच्या अधिकारी आहेत. २००९ ते २०१२ या काळात पीटर वर्गीस यांनी हे पद भूषविले आहे.
- सिद्धू यांचे कुटुंबीय मूळचे पंजाबचे आहे. त्यांच्या जन्म सिंगापूर येथे झाला. पुढे त्यांचे कुटुंब ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले. सिडनी विद्यापीठातून त्यांनी कायदा व अर्थशास्त्रामधील पदवी मिळविली आहे.
- ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व व्यापार मंत्रालयातील बहुपक्षीय व्यापार करार विभागात सहसचिव या पदावर त्या काम करीत होत्या. यापूर्वी त्यांची नियुक्ती रशिया व दमास्कस येथे झाली होती.
- हवामानबदल खात्यात सहसचिव, राष्ट्रीय मूल्यांकन विभागात सहायक संचालक, तसेच पंतप्रधान व कॅबिनेट कार्यालयात वरिष्ठ सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
आर. के. पचौरी यांच्यावर पुन्हा आरोप
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामान बदल समितीचे माजी अध्यक्ष आर. के. पचौरी यांच्यावर अन्य एका महिलेनेही लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
- टेरीमध्ये कार्यरत असलेल्या अन्य एका महिला कर्मचाऱ्याने याआधी लैंगिक शोषणाचा आरोप केल्याने पचौरी यांना संस्थेचे प्रमुखपद सोडावे लागले होते.
- याआधीच्या प्रकरणामध्ये जामीन मिळाल्यानंतर पचौरी यांना तक्रारकर्त्या महिलेपासून दूर राहण्याचे निर्देश देऊन न्यायालयाने पुन्हा ‘दी एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी)‘मध्ये काम करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे टेरीच्या कार्यकारी उपाध्यक्षपदी त्यांची पुन्हा नेमणूक करण्यात आली आहे.
- टेरीच्या कार्यकारी उपाध्यक्षपदी पुन्हा नेमणूक झालेल्या पचौरी यांच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास टेरी विद्यापीठामधील काही विद्यार्थ्यांनी नकार दिला आहे.
रामायणाच्या परीक्षेत मुस्लिम मुलगी अव्वल
- कर्नाटकातील मंगळुरू जिल्ह्यातील पुत्तूर तालुक्यात फातिमाथ रहिला या मुस्लिम विद्यार्थिनीने रामायणाच्या परीक्षेत ९३ टक्के गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. तिचे हे यश हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीकच मानले जात आहे.
- कर्नाटक-केरळ सीमेवरच्या सुल्लीयापडावू गावातील सर्वोदय हायस्कूलमध्ये फातिमाथ रहिला नववीत शिकते. रामायण आणि महाभारत हे तिच्या आवडीचे विषय आहेत.
- गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मुंबईत राहणाऱ्या १२ वर्षीय मरियम सिद्दीकी या मुस्लिम विद्यार्थिनीने इस्कॉनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भगवद्गीता स्पर्धेत बाजी मारली होती.
- सहावीत शिकणाऱ्या मरियमने सुमारे तीन हजारहून अधिक स्पर्धकांना मागे टाकत या स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला होता.
टायटॅनिकची प्रतिकृती २०१८ पासून सेवेत
- उत्तर अटलांटिक महासागरात १९१२साली जलसमाधी मिळालेल्या टायटॅनिक जहाजाचीच प्रतिकृती असलेले 'टायटॅनिक २' हे जहाज २०१८ साली प्रवाशांच्या सेवेत सज्ज असणार आहे.
- मूळ जहाज बुडाल्याच्या १०६ वर्षानंतर 'टायटॅनिक'ची सुधारित आवृत्ती 'टायटॅनिक २' हे जहाज ही ऑस्ट्रेलियातील अब्जाधीश क्लिव्ह पाल्मर आणि त्यांची ब्लू स्टार लाइन या कंपनीची कल्पना आहे.
- या जहाजाची प्रतिकृती ही मूळ 'टायटॅनिक'प्रमाणेच असून, याची लांबी चार मीटरने वाढविण्यात आली आहे. तर, सागरी सुरक्षेच्या दृष्टीने काही बदल करण्यात आल्या आहेत.
- २७० मीटर लांब, ५३ मीटर उंच आणि ४० हजार टन वजन अशी या जहाजाची रचना असून, यामध्ये ९ मजले आणि ८४० केबिन्स असणार आहेत.
- त्यामध्ये २४०० प्रवासी आणि ९०० क्रू मेंबर्ससाठी व्यवस्था आहे. स्विमिंग पूल, टर्कीश बाथरूम्स आणि जिम्सचीही व्यवस्था आहे.
- आपत्कालीन परिस्थितीत सुटकेसाठी आधुनिक पद्धती वापरण्यात आल्या आहेत. सॅटेलाइट कंट्रोल, डिजिटल नेव्हिगेशन अँड रडार सिस्टिम यासह २१व्या शतकातील जहाजांमध्ये ज्या सुविधांची आवश्यकता आहे, त्या सर्व सुविधा यात आहेत.
चर्चित पुस्तक
- अटलबिहारी वाजपेयी : ए मॅन फॉर ऑल सिझन्स
- लेखक : किंगशुक नाग
- प्रकाशक : रूपा पब्लिकेशन्स
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा