चालू घडामोडी : ३ मे
विराट कोहलीची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कसोटी कर्णधार विराट कोहली याची राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
- चार वर्षांनी एखाद्या क्रिकेटपटूची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी यांना ‘खेलरत्न’ पुरस्कार मिळाला आहे.
- देशातील या सर्वोत्तम क्रीडा पुरस्काराचे ७.५ लाख रोख आणि सन्मानतिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
- आतापर्यंत या पुरस्कारासाठी स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल, गोल्फपटू अनिर्बन लाहिरी, नेमबाज जितू राय, धावपटू टिंटू लुका या खेळाडूंच्या नावाची देखील शिफारस करण्यात आली आहे.
- याशिवाय ‘अर्जुन पुरस्कारा’साठी फलंदाज अजिंक्य रहाणेचे नाव सुचविण्यात आले आहे.
व्यापार सुलभीकरण करार
- उद्योग, व्यवसाय सुरु करण्यापूर्वी घ्यावे लागणारे परवाने ना हरकतीची प्रमाणपत्रे यासाठी होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी “व्यापार सुलभीकरण करार” करण्यात आला आहे.
- यामुळे संपूर्ण व्यवहारात पारदर्शकता येणार आहे, त्याचबरोबर लालफितीच्या कारभारापासून मुक्तता होणार आहे.
- कोणताही व्यापार, उद्योग सुरु करण्यापूर्वी अनेक परवाने घ्यावे लागतात. ही प्रक्रिया अधिक सुटसुटीत झाली आणि उद्योजकांना सुलभतेने परवाने मिळू लागले तर व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण तयार होईल.
- या करारामुळे देशातील लहान आणि मध्यम आकाराचे उद्योग आता अगदी सहजपणे प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरील साखळी उत्पादकांशी जोडले जाऊ शकणार आहेत.
- तसेच उद्योग सुरु करण्यासंबंधी कायदेशीर परवाने त्वरित देण्याची प्रक्रियाही “व्यापार सुलभीकरण करारा”मुळे होणार आहे.
- वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री : निर्मला सीतारामन
इराणला तेल थकबाकीवर १.५ टक्का दराने व्याज
- इराणसोबतचे व्यापारी संबंध आणखी दृढ करण्याच्या दृष्टीने तेल थकबाकीवर १.५ टक्का दराने व्याज देण्यास भारताने होकार दिला आहे.
- देशातील तेल उत्पादक कंपन्यांनी इराणमधून खरेदी केलेल्या तेलाची ६.५ अब्ज डॉलरची थकबाकी आहे.
- इराणने भारताला ‘लंडन इंटरबँक ऑफर्ड रेट‘ (लिबॉर-प्लस) ७५ बेसिस अंशांनुसार ही मागणी केली आहे. लिबॉर-प्लस ७५ बेसिस अंश म्हणजे सुमारे १.५ टक्के व्याजदर.
- इराणने भारतीय कंपन्यांना अमेरिकी डॉलरमध्ये तेलाची विक्री केली होती. परंतू युको बँकेमार्फत रक्कम भारताने रुपयांमध्ये देण्यात आली होती. ऊर्वरित ५५ टक्के रक्कम बँकिंग चॅनल खुले झाल्यावर देण्यात येणार होती.
- आर्थिक निर्बंध रद्द झाल्यानंतर इराणने थकित रकमेची मागणी केली आहे. परंतू भारतातील कंपन्यांनी तेल खरेदीवेळच्या परदेशी विनिमय दराने ही रक्कम घेण्याची मागणी केली आहे.
- कारण, फेब्रुवारी २०१३ साली ज्यावेळी ४५:५५ पद्धत लागू झाली होती डॉलरचा विनिमय दर ५५ रुपये होता आता तो ६७ रुपये झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा