चालू घडामोडी : ३१ मे
सीएट क्रिकेट पुरस्कार २०१५-१६
- मुंबईत झालेल्या सीएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुरस्कार २०१५-१६ सोहळ्यात भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना सुनील गावस्कर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने गोरविण्यात आले.
- यावेळी विराट कोहलीला सर्वोत्तम टी-२० खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले. इंग्लंडचा फलंदाज जो रूटला वर्षांतील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि फलंदाज असे दोन पुरस्कार देण्यात आले.
- रोहित शर्मा व आर. आश्विन यांना अनुक्रमे सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू आणि आंतरराष्ट्रीय गोलंदाज पुरस्काराने गौरविण्यात आले.
- अजिंक्य रहाणेला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरला वर्षांतील सर्वोत्तम स्थानिक क्रिकेटपटूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- वर्षांतील सर्वोत्तम कसोटीपटू आणि एकदिवसीय क्रिकेटपटू पुरस्कार अनुक्रमे केन विल्यमसन आणि मार्टिन गप्तील यांना मिळाले.
- या कार्यक्रमादरम्यान वेंगसरकर, वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटपटू इयान बिशप आणि आॅस्टे्रलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन यांनी सीएट ड्रीम टीमचीही निवड केली. या संघाच्या कर्णधारपदी महेंद्रसिंह धोनीची निवड झाली.
यूपीएससीच्या सदस्यपदी बी. एस. बस्सी
- दिल्ली पोलिस आयुक्तपदी वादग्रस्त कार्यकाळ घालविल्यानंतर आता बी. एस. बस्सी यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- आप सरकारबरोबर वारंवार खटके उडाल्यानंतर आता या घटनात्मक जागेवर बस्सी पुढील पाच वर्षे कार्यरत राहणार आहेत.
- ६० वर्षीय बस्सी आता यूपीएससीमधील दहा सदस्यांपैकी एक असतील. ते अरुणाचल प्रदेश गोवा आणि केंद्रशासित प्रदेश केडरच्या १९७७च्या बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत.
- फेब्रुवारीत ते दिल्ली पोलिस प्रमुख या पदावरून निवृत्त झाले आहेत.
उपराष्ट्रपती मोरोक्को आणि ट्यूनिशिया दौऱ्यावर
- उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या मोरोक्को आणि ट्यूनिशिया या आफ्रिकन देशांच्या पाच दिवसीय दौऱ्याचा ३० मे रोजी प्रारंभ झाला. त्यांच्यासोबतच्या शिष्टमंडळात राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांचा समावेश आहे.
- गेल्यावर्षी आॅक्टोबरमध्ये दिल्लीत आयोजित भारत-आफ्रिका शिखर परिषदेतून आफ्रिकन देशांसोबत निर्माण झालेल्या सौहार्द्रपूर्ण संबंधाचा राजनैतिक पातळीवर लाभ मिळवण्याचा प्रयत्न या भेटीतून होणार आहे.
- मोरोक्कोचे पंतप्रधान अब्देलीलाह बेन्किरेन यांच्या निमंत्रणावरून भारताचे उपराष्ट्रपती ५० वर्षांनंतर प्रथमच या दोन देशांना भेट देत आहेत.
- तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९९ मध्ये या आफ्रिकन देशाचा केलेला दौरा पहिली उच्चस्तरीय भेट ठरली होती.
- दिल्लीत आयोजित शिखर परिदेला मोरोक्कोचे राजे मोहम्मद (सहावे) हे भारताचे पहिले अधिकृत आफ्रिकन पाहुणे ठरले होते.
- आधुनिक इतिहासात भारत-आफ्रिकन नेत्यांची सर्वात मोठी राजकीय परिषद म्हणून या शिखर परिषदेची नोंद झाली.
सुझुकी मोटर्सचा गुजरातमध्ये प्रकल्प
- जपानची कार उत्पादक कंपनी सुझुकी मोटर्सचा संपूर्णत: स्वत:च्या मालकीचा गुजरातमधील प्रकल्प पुढील वर्षी कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पावर कंपनीने १८,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
- सुझुकीच्या स्वत:च्या मालकीचा हा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे. कंपनीच्या भारतातील शाखेला बाजूला सारून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.
- या प्रकल्पातून मारुती सुझुकीला गाड्या आणि सुटे भाग पुरविण्यात येणार आहेत. भारत या कंपनीसाठी सर्वांत मोठा बाजार आहे.
- पहिल्या टप्प्यात गुजरातमधील प्रकल्पात वर्षाला २,५०,००० वाहने तयार करण्यात येतील. २०२२पासून सुझुकीचे भारतातील कार उत्पादन २ दशलक्ष युनिटवर पोहोचेल. सध्या ते १.४ दशलक्ष युनिट इतके आहे.
- भारतातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीमध्ये सुझुकी मोटर्सची हिस्सेदारी ५६ टक्के आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा