कारखानदारी क्षेत्राला गती देण्यासाठी, औद्योगिक उत्पादनात वाढ होण्यासाठी आणि त्याद्वारे रोजगार निर्मितीला चालना मिळण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रथमच भांडवली वस्तू क्षेत्रासाठी राष्ट्रीय यंत्रसामग्री धोरण मंजूर केले आहे.
पी. विजयन केरळचे १२वे मुख्यमंत्री
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. विजयन यांनी २६ मे रोजी केरळच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल पी. सदाशिवम यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
विजयन के माकपच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य असून ते केरळचे १२वे मुख्यमंत्री आहेत.
विजयन यांच्यासह अन्य १८ मंत्र्यांचा शपथविधीही या वेळी पार पडला. यामध्ये ‘माकप’चे ११ ‘भाकप’चे ४, कॉंग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रत्येकी एका मंत्र्याचा समावेश आहे.
इलाथूर कोझीकोड मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. शशीधरन यांना विजयन यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
केरळमध्ये डाव्यांच्या डेमोक्रेटिक फ्रंटला बहुमत मिळाले असून, काँग्रेस सत्तेवरून पायउतार झाली आहे. केरळमध्ये एलडीएफने ९१ जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
नवे सरकार स्थापन होताच विजयन यांनी आर्थिक बचतीची घोषणा केली, यान्वये मंत्र्यांच्या घरांची डागडुजी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच मंत्र्यांच्या मदतीस असणाऱ्या स्टाफमधील कर्मचाऱ्यांची संख्या ३० वरून २५ करण्यात आली आहे.
यापूर्वी ओमन चंडी यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री कार्यालय आणि चेंबरचे लाइव्ह स्ट्रिमिंग होत असे, तेही आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंकज अडवाणीची ऐतिहासिक कामगिरी
भारताचा आघाडीचा स्नूकरपटू पंकज अडवाणीने अबू धाबी येथे सुरू असलेल्या आशियाई ६-रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली.
जागतिक आणि आशिया खंडातील ६-रेड स्नूकरचे अजिंक्यपद पटकावणारा पंकज हा पहिला खेळाडू ठरला आहे.
अंतिम लढतीत त्याने मलेशियाच्या किन होह मोहचा ७-५ असा पराभव केला. उपांत्य फेरीत भारताच्या आदित्य मेहतावर ६-१ असा विजय मिळवला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा