भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) प्रथमच संपूर्ण स्वदेशी बनावटीचे अवकाशयान तयार केले आहे. या अवकाशयानासाठी कोणत्याही प्रकारे विदेशी मदत घेतली गेली नाही.
हे भारतीय स्पेस शटल तयार करण्याचे काम पाच वर्षांपूर्वी सुरू झाले असून त्यासाठी ९५ कोटी रुपये खर्च आला आहे.
एखाद्या ‘एसयूव्ही’ मोटारइतका आकार आणि वजन असलेल्या या ‘रियूझेबल लॉंच व्हेइकल- टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेटर’ (आरएलव्ही-टीडी) अवकाशयानाची अंतिम चाचणी घेण्यात आली आहे.
सध्या हे यान श्रीहरीकोटा येथील अवकाश केंद्रात ठेवले असून, हे अवकाशयान लवकरच प्रक्षेपित केले जाणार आहे. या प्रयोगाचे नाव हायपरसॉनिक एक्सपिरिमेंट असे आहे.
पुनर्वापर करता येण्यासारखे पंख हे या अवकाशयानाचे वैशिष्ट्य आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास अवकाशयानाच्या निर्मितीचा खर्च दहा पटीने कमी म्हणजे दोन हजार डॉलर प्रति किलो एवढा होणार आहे.
प्रक्षेपण झाल्यानंतर अवकाशयानाला लावलेले काही पंख (डेल्टा विंग्ज) बंगालच्या उपसागरात उतरविता येणार आहेत. या पंखांच्या रचनेमुळे ते तरंगणार नसल्याने परत आणता येणे अवघड आहे. मात्र, या प्रयोगाचा उद्देश पंखांचे तरंगणे नसून ते अवकाशयानापासून परत येणे, हा आहे.
रोम मास्टर्स टेनिस स्पर्धा
चार भारतीय शांतिरक्षकांना संयुक्त राष्ट्र पदक
संयुक्त राष्ट्राच्या शांतिरक्षण अभियानात काम करताना मृत्युमुखी पडलेले चार भारतीय शांतिरक्षक व एका नागरिकासह अन्य १२४ जणांना त्यांच्या साहस आणि बलिदानासाठी मरणोत्तर संयुक्त राष्ट्र पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतिरक्षक दिवसाच्या निमित्ताने या नागरिकांना डॅग हॅमरस्कजोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
भारतीय शांतिरक्षकात हेड कॉन्स्टेबल शुभकरण यादव, रायफलमॅन मनीष मलिक, अमल डेका, नायक राकेश कुमार यांचा सहभाग आहे. यांच्यासोबत गगन पंजाबी हेही मारले गेले होते.
संयुक्त राष्ट्र शांतिरक्षक दिवस दरवर्षी २९ मे रोजी साजरा केला जातो; मात्र यावर्षी तो १९ मे रोजी साजरा होईल. संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून सर्व शहीद शांतिरक्षकांना पुष्पचक्र अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा