भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची एकमताने निवड झाली. ते बीसीसीआयचे आत्तापर्यंतचे सगळ्यात तरुण अध्यक्ष ठरले आहेत.
४१ वर्षीय अनुराग ठाकूर हे भाजपचे खासदार असून हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
शशांक मनोहर आयसीसीचे अध्यक्ष झाल्यामुळे भारतीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांची जागा ठाकूर घेतील.
सध्या पूर्व विभागाची अध्यक्षपदाची वेळ आहे. त्यामुळे ठाकूर यांच्या उमेदवारीस सूचक तसेच अनुमोदक पूर्व विभागातील असणे आवश्यक आहे.
ठाकूर यांना पूर्व विभागातील बंगाल, आसाम, झारखंड, त्रिपुरा तसेच नॅशनल क्रिकेट क्लब या सर्व संघटनांनी एकमताने पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित होती.
ठाकूर बिनविरोध अध्यक्ष झाल्यावर रिक्त झालेल्या सचिवपदी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीसी) अध्यक्ष अजय शिर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
किरण बेदी पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल
माजी आयपीएस अधिकारी आणि भाजपच्या नेत्याकिरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील जवळपास दोन वर्षांपासून या राज्याचा अतिरिक्त भार अंदमान आणि निकोबारच्या नायब राज्यपालांकडे होता.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुद्दुचेरीमध्ये कॉंग्रेस आघाडीचा विजय झाला असून, त्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या असलेल्या बेदी यांची नायब राज्यपाल पदावर नियुक्ती होणे महत्त्वपूर्ण मानले जाते.
मोदी सरकारने सूत्रे स्वीकारताच पुद्दुचेरीचे तत्कालीन नायब राज्यपाल वीरेंद्र कटारिया यांना हटविले होते. कॉंग्रेस आघाडीने कटारिया यांची या नियुक्ती केल्याला त्या वेळी फक्त एक वर्षच झाले होते.
यानंतर अंदमान आणि निकोबारचे नायब राज्यपाल ले. जन. अजयसिंह यांना पुद्दुचेरीची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती.
सेबीने पी-नोटचे नियम कडक केले
परदेशी गुंतवणूकदारांना देशात गुंतवणूक करता यावी यासाठी तयार करण्यात आलेली पार्टिसिपेटरी नोटची (पी-नोट) सुविधा वादात सापडल्यामुळे भांडवल बाजार नियंत्रक सेबीने अखेर पी-नोटचे नियम कडक केले आहेत.
काळ्या पैशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या शिफारसींनुसार सेबीने खालील नियम तयार केले आहेत.
भारत आणि ओमान दरम्यान चार महत्त्वपूर्ण करार
भारत आणि ओमान यांनी आज द्विपक्षीय संरक्षण संबंध आणखी बळकट करण्याच्या दिशेने लष्करी सहकार्याला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करताना चार महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
संरक्षण सहकार्य, समुद्रातील गुन्ह्यांना प्रतिबंध, समुद्राशी संबंधित मुद्दे आणि उड्डाण सुरक्षा माहितीची देवाणघेवाण यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर पहिल्यांदाच मध्य पूर्वेतील जवळचा देश असलेल्या ओमानच्या दौऱ्यावर पोहचल्यानंतर हे करार झाले.
ओमानमधील नेतृत्वाशी झालेल्या चर्चेदरम्यान द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या सर्व मुद्यांवर बोलणी झाली. त्याचप्रमाणे द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वाढविण्यावर दोन्ही देशांनी सहमतीही दर्शविली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा