एलईडी बल्बच्या यशस्वी वितरणानंतर आता केंद्र सरकारतर्फे ‘उन्नत ज्योती फॉर अॅफोर्डेबल एलईडी फॉर ऑल’ अर्थात ‘उजाला’ योजनेंतर्गत एलईडी ट्यूबलाइटचे वितरण करण्यात येणार आहे.
याच्या वितरणाची जबाबदारीही ‘एनर्जी एफिशियंसी सर्व्हिसेस लिमिटेड’कडे (ईईएसएल) सोपविण्यात आली आहे.
युनिव्हर्सल बँक
देशातील बँकिंग व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँक व्यावसायिक आणि वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्यांना ‘युनिव्हर्सल बँक’ स्थापनेसाठी परवाने देणार आहे.
अधिकाधिक स्पर्धकांनी बँकिंग क्षेत्रात उतरावे आणि या क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण व्हावी, या हेतूने रिझर्व्ह बँकेने नियमावलीत बदल केले आहेत.
गळेकापू स्पर्धेपासून हे क्षेत्र दूरच राहावे, यासाठी बड्या उद्योगपतींना आणि घराण्यांना सद्य परिस्थितीत परवाने देणार येणार नाहीत.
लंडनच्या महापौरपदी प्रथमच मुस्लिम व्यक्ती
ब्रिटनची राजधानी लंडन शहराचा महापौर होण्याची मान प्रथमच एखाद्या मुस्लिम नागरिकाला मिळाला आहे.
लेबर पार्टीचे सादिक खान यांची लंडनच्या महापौरपदी निवड झाली आहे. ते पाकिस्तानी वंशाचे आहेत.
त्यांनी महापौरपदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत कंझरव्हेटिव पक्षाचे उमेदवार जॅक गोल्डस्मिथ यांचा पराभव केला.
कंझरव्हेटिव पक्षाच्या गोल्डस्मिथ यांनी लंडनमधील हिंदू आणि शीख नागरिकांना प्रभावित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नावाचा उपयोग केला होता. पण, याचा फायदा त्यांना होताना दिसला नाही.
सादिक खान यांनी मानव अधिकार वकील म्हणून कारकिर्दीची सुरवात केली होती. त्यानंतर ते खासदार बनले. २००५ पासून ते लेबर पार्टीचे सातवेळा खासदार राहिले आहेत.
माजी पंतप्रधान गॉरडन ब्राऊन यांच्या सरकारमध्ये २००९-१० मध्ये सादीक खान वाहतूक मंत्री होते. कॅबिनेट बैठकीतील ते पहिले मुस्लिम मंत्री होते.
सुब्रतो रॉय यांची पॅरोलवर सुटका
सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांची चार आठवड्यांच्या पॅरोलवर तिहार तुरुंगातून सुटका झाली आहे. रॉय यांच्या आईचे वृद्धापकाळामुळे निधन झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना संचित रजा (पॅरोल) मंजूर केली.
सहारा समुहामध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सुब्रतो यांना अटक झाली असून ते गेल्या दोन वर्षांपासून तिहार तुरुंगात आहेत.
सहारा समुहाचे संचालक व सुब्रतो यांचे नातेवाईक अशोक रॉय चौधरी यांनाही न्यायालयाने याच आधारे पॅरोलवर सोडले. चार आठवड्यांच्या कालावधीत सुब्रातो हे पोलिसांच्या नजरकैदेत असतील.
आपले अशील पळून जाण्याचा अथवा फरार होण्याचा प्रयत्न करणार नाही, अशी ग्वाही राय यांचे वकील कपिल सिब्बल यांनी दिली आहे.
विनेश फोगट आणि साक्षी मलिक रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र
भारताची अनुभवी महिला मल्ल विनेश फोगटने रिओ ऑलिम्पिक २०१६ मधील आपला प्रवेश निश्चित केला आहे. विनेश फोगटसोबत साक्षी मलिकनेदेखील ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला आहे.
साक्षी मलिक ५८ किलो वजनी गटात तर २१ वर्षीय विनेश फोगट ४८ किलो वजनी गटात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत.
भारताकडून प्रथमच दोन महिला मल्लांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवून इतिहास घडवला आहे. २०१२ मध्ये गीता फोगटने ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवत पहिली महिला मल्ल होण्याचा मान मिळवला होता.
भारताकडून एकूण ६ कुस्तीपटूंनी रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये ४ पुरुष मल्ल (योगेश्वर दत्त, संदीप तोमर, नरसिंह यादव, हरदीप सिंग) असून २ महिला मल्ल आहेत.
रवींद्रनाथ टागोर यांची १५५वी जयंती
७ मे १९६१ रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या रवींद्रनाथ टागोरांना १९१३मध्ये साहित्याचे नोबेल मिळाले. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत.
भारताचे जन गण मन व बांग्लादेशचे आमार सोनार बांगला, असे दोन देशांची राष्ट्रगीतं लिहिणारे तेच एकमेव.
आठव्या वर्षापासून कविता करण्याचा रवींद्रनाथांना छंद लागला. वयाच्या १६व्या वर्षी त्यांचा भानूसिंह हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला.
१३ भावंडांमध्ये सगळ्यात लहान असलेल्या रवींग्रनाथांना शाळेत जाण्याचा प्रचंड कंटाळा होता. त्यांचे सगळे शिक्षण वडीलबंधू हेमेंद्रनाथ यांनी घरातच केले.
रवींद्रनाथ टागोरांना ब्रिटिश सरकारने नाईटहूड हा किताब दिला होता, परंतु ब्रिटिशांच्या भारतातल्या धोरणांचा निषेध म्हणून त्यांनी तो परत केला.
वयाच्या साठाव्या वर्षी टागोरांनी चित्रकलेस आरंभ केला आणि नंतर त्यातही प्रावीण्य मिळवले. त्याच्या कलाकृतींची अनेक प्रदर्शने झाली.
मोहनदास करमचंद गांधींना महात्मा ही उपाधी रवींद्रनाथ टागोरांनी दिली.
टागोर आणि अल्बर्ट आइनस्टाइन यांना एकमेकांबद्दल अपार आदर होता, आणि त्यांच्यामधलं संभाषण प्रसिद्ध झाल्यावर खूप गाजले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा