इराक युद्धातील ब्रिटनच्या सहभागाची चौकशी करणाऱ्या चिलकॉट अहवालात टोनी ब्लेअर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ब्लेअर यांनी जनतेची माफी मागितली आहे.
इराक युद्धाची आणि त्यातील ब्रिटनच्या सहभागाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांच्यावर जनतेचा दबाव वाढत होता.
त्याला उत्तर म्हणून १५ जून २००९ रोजी सर जॉन चिलकॉट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली. त्या समितीचा अहवाल नुकताच सादर झाला.
फेसबुकच्या ‘ऍक्विला’ ड्रोनचे यशस्वी उड्डाण
फेसबुकच्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या ‘ऍक्विला’ या ड्रोनने २१ जुलै रोजी यशस्वी उड्डाण केले.
ऍरिजोनातील युमा येथे चाचणीसाठी करण्यात आलेल्या या उड्डाणावेळी ऍक्विला १००० फुटांपर्यंत सुमारे ९६ मिनिटे उडत होते.
या ड्रोनमुले जगभर इंटरनेट पोचविणे शक्य होणार आहे. विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागांत इंटरनेट पोचविण्यात याचा मोठा फायदा होणार आहे.
अडवानींवरील पुस्तक वादात
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्यावर लिहिलेल्या ‘अडवानी के साथ ३२ साल’ या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच त्यावरून वाद सुरू झाले आहेत.
या पुस्तकाच्या लेखनापूर्वी अडवानींची परवानगीच घेतलेली नव्हती, असे अडवानी यांच्या वतीने अधिकृतरीत्या स्पष्ट केले गेले आहे.
विश्वंभर श्रीवास्तव यांचे हे पुस्तक अनिल प्रकाशनातर्फे काढण्यात आले आहे. तथापि हे पुस्तक आपल्या इच्छेच्या किंवा परवानगीविरुद्ध लिहीले गेल्याचे अडवानी यांनी स्पष्ट केले.
अफगणिस्तानातून अपहरण झालेल्या भारतीय तरुणीची सुटका
अफगणिस्तानातून अपहरण करण्यात आलेल्या कोलकाता येथील ज्युडिथ डिसूझा या तरुणीची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
आगाखान फाउंडेशन या संस्थेमध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून काम करणाऱ्या ज्युडिथ डिसूझा हिचे ९ जूनला काबूलमधून दहशतवाद्यांनी अपहरण केले होते.
अतिशय धाडसी व उमदी असलेली ज्युडिथ अफगणिस्तानच्या लोकांच्या कल्याणासाठी काम करीत होती.
ज्युडिथच्या पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तिच्या सुटकेसाठी स्वतः लक्ष घालण्याची विनंती केली होती.
तनिष खोतने केले माउंट एल्ब्रस सर
कोल्हापूरच्या तनिष सुधीर खोतने वयाच्या तेराव्या वर्षीच युरोपातील माउंट एल्ब्रस हे सर्वोच्च हिमशिखर सर केले. एव्हरेस्टवीर चेतन केतकर यांच्या नेतृत्वाखाली त्याने ही किमया साधली.
१२ जुलै रोजी त्याने एल्ब्रस शिखरावर तिरंगा फडकवला. या शिखराची उंची ५६४२ मीटर असून सात खंडांमध्ये हे पाचव्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे.
तनिषने माउंट एल्ब्रस सर करणारा आशियातील युवा गिर्यारोहक म्हणून मान मिळविला. डेन्मार्कचा टाइलर आर्मस्ट्रॉंग हा एल्ब्रस शिखर सर करणारा जगातील सर्वात युवा गिर्यारोहक आहे.
या मोहिमेमध्ये सुधीर खोत, निगडीची ऋतुजा शहा यांनीही हे शिखर सर केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा