येत्या १५ ऑगस्टपासून गुजरातमधील मोटारी आणि लहान वाहनांना टोलपासून मुक्ती मिळणार असून गुजरात सरकारने करमुक्ती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुजरातमध्ये टोलमुक्ती जाहीर झाल्याने आता महाराष्ट्रात टोलमुक्ती होणार की नाही? हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्रातील १२ टोलनाके कायमचे बंद आणि ५३ टोलनाक्यांवरुन छोट्या वाहनांना सूट दिली. मात्र सरसकट टोलमुक्ती करण्यात आलेली नाही.
अॅक्सिस बँक आणि एलआयसीदरम्यान सामंजस्य करार
आयुर्विमा योजनांच्या विक्रीसाठी खासगी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अॅक्सिस बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्यादरम्यान सामंजस्य करार झाला.
बँका आणि विमा कंपन्यांतील आजवरचे हे सर्वात मोठे बँक अश्युरन्स सामंजस्य मानले जात आहे.
देशभरात ३,००० हून अधिक शाखा व विस्तार कक्ष असलेल्या अॅक्सिस बँकेचा गेली पाच वर्षे आयुर्विमा पॉलिसींच्या विक्रीचा व्यवसाय दरसाल २५ टक्के दराने वाढत आहे.
भारतीय शेअर बाजारांतील गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढ
केंद्र सरकारने विदेशी बँका, विमा कंपन्या, शेअर बाजार आणि वस्तू बाजार (कमॉडिटी एक्सचेंज) यांना भारतीय शेअर बाजारांतील गुंतवणुकीची मर्यादा ५ टक्क्यांनी वाढवून १५ टक्के करण्याचा निर्णय जाहीर केला.
याबरोबरच विदेशी गुंतवणूकदारांना प्रारंभिक प्रस्तावात (आयपीओ) तसेच दुय्यम बाजारांतही समभाग खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या निर्णयांनी भारतीय बाजारांची जगाच्या अन्य बाजारांसोबतची स्पर्धा क्षमता वाढणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीवरील प्रचलन याचा अंगीकार करण्यासही बाजारास मदत होणार आहे.
याचा एकत्रित परिणाम म्हणून भारताच्या देशांतर्गत भांडवली बाजाराची एकूण वृद्धी आणि विकास होईल.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१६-१७ या वर्षाच्या अर्थसंकल्पातच या निर्णयाची घोषणा केली होती. त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
बँकांची ३० टक्के एटीएम अकार्यक्षम
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून स्थापित ३० टक्के तर खासगी क्षेत्रातील बँकांशी संलग्न १० टक्के एटीएम हे कार्यक्षम नसल्याचे रिझर्व्ह बँकेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
नोटा नाहीत अथवा तांत्रिक बिघाडामुळे एटीएम केंद्रे बंद असल्याच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे.
रिझर्व्ह बँकेने बडी महानगरे तसेच शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण भागातील एकूण ४,००० एटीएम केंद्रांचा प्रातिनिधिक नमुना घेऊन हे सर्वेक्षण पार पाडले.
एटीएम यंत्रातील तांत्रिक बिघाड या मुख्य कारणासह, नेटवर्क उपलब्ध नसणे, वीज पुरवठा खंडित होणे, यंत्रात नोटाच नसणे अशी एटीएम केंद्रे बंद राहण्याची कारणे आहेत.
देशात मे २०१६ अखेर २,१४,२७१ एटीएम कार्यरत आहेत. यापैकी १,०२,७७९ इतके ऑन-साइट म्हणजे बँकांच्या शाखांना लागून एटीएम आहेत. तर शाखांपासून दूर अलिप्तपणे कार्यरत असणाऱ्या एटीएमची संख्या १,११,४९२ आहे.
जर्मनीचा बॅस्टिअन श्वेईनस्टायगर निवृत्त
गेल्या दशकभराहून अधिक काळ जर्मनीच्या संघाचा आधारस्तंभ आणि संस्मरणीय विजयांचा शिल्पकार बॅस्टिअन श्वेईनस्टायगरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
३१ वर्षीय बॅस्टिअनने १२० सामन्यांत जर्मनीचे प्रतिनिधित्त्व केले. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होत असताना बॅस्टिअन मँचेस्टर युनायटेडतर्फे खेळत राहणार आहे.
ब्राझीलमधील रिओ येथे झालेल्या २०१४ विश्वचषकात अर्जेटिनाविरुद्धच्या लढतीत बॅस्टिअनने केलेला गोल निर्णायक ठरला होता.
चेंडू टॅकल करण्याची अनोखी शैली, चेंडू सोपवण्याची सुरेख पद्धत, चिवटपणे झुंज देण्याची वृत्ती यासाठी बॅस्टिअन ओळखला जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा