भारत आणि केनिया दरम्यान सात करार
- पंतप्रधान नरेंद्र मादींच्या केनिया देशाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि केनिया दरम्यान सात करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
- संरक्षण, सुरक्षा, व्हिसा, गृहनिर्माण आणि दुहेरी करप्रणाली टाळणे आदींचा या करारांमध्ये समावेश आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केनियाचे अध्यक्ष उहुरू केनियट्टा यांच्याशी चर्चा केल्यानंतर कोनियाला सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध करून देण्याच्या मर्यादेत वाढ केल्याचे घोषित केले.
- केनियातील लघू आणि मध्यम उद्योग आणि वस्त्रोद्योग यांच्या विकासासाठी भारत ४४.९५ दशलक्ष डॉलरचे कर्ज केनियाला देणार आहे.
- केनियात दर्जेदार आणि परवडणारी वैद्यकीय सेवा देणारे कॅन्सर हॉस्पिटलही भारतातर्फे उभारले जाणार आहे.
- संरक्षण क्षेत्रातील समझोता करारामुळे दोन्ही देशांमध्ये कर्मचाऱ्यांची देवाणघेवाण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपकरणांचा पुरवठा करणे शक्य होणार आहे.
बोगस विद्यापीठांची यादी जाहीर
- विद्यापीठ अनुदान आयोगाने बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. या यादीत देशभरातील २२ विद्यापीठांचा समावेश आहे.
- बोगस विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील नागपूर येथील राजा अरेबिक विद्यापीठाचाही समावेश आहे.
- विद्यापीठ अनुदान आयोग दरवर्षी देशभरातील बोगस विद्यापीठांची यादी जाहीर करते. या यादीत गेल्या वर्षीच्या तुलनेत एका विद्यापीठाची भर पडली आहे.
- देशभरातील २२ बोगस विद्यापीठांमध्ये सर्वाधिक म्हणजे ९ बोगस विद्यापीठे उत्तर प्रदेशातील आहेत. तर त्याखालोखाल दिल्ली येथील ६ विद्यापीठे बोगस ठरली आहेत.
- विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या बोगस विद्यापीठांतील पदवी अवैध ठरणार आहे.
या यादीतील विद्यापीठे | ||
---|---|---|
विद्यापीठ | राज्य | |
१. | महिला ग्राम विद्यापीठ | उत्तर प्रदेश |
२. | गांधी हिंदी विद्यापीठ | उत्तर प्रदेश |
३. | नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी | उत्तर प्रदेश |
४. | नेताजी सुभाषचंद्र बोस ओपन युनिव्हर्सिटी | उत्तर प्रदेश |
५. | उत्तर प्रदेश विश्वविद्यालय | उत्तर प्रदेश |
६. | महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विश्वविद्यालय | उत्तर प्रदेश |
७. | इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद | उत्तर प्रदेश |
८. | गुरुकुल विश्वविद्यालय | उत्तर प्रदेश |
९. | नबाभारत शिक्षा परिषद | उत्तर प्रदेश |
१०. | कमर्शिअल विद्यापीठ लिमिटेड | दिल्ली |
११. | युनायटेड नेशन्स विद्यापीठ | दिल्ली |
१२. | व्होकेशनल विद्यापीठ | दिल्ली |
१३. | वाराणसिया संस्कृत विश्वविद्यालय | दिल्ली |
१४. | एडीआर सेंट्रिक ज्युरिडीशल विद्यापीठ | नवी दिल्ली |
१५. | इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग | नवी दिल्ली |
१६. | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन | कोलकाता |
१७. | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अॅण्ड रिसर्च | कोलकाता |
१८. | मैथिली विद्यापीठ | बिहार |
१९. | बडागणवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी | कर्नाटक |
२०. | सेंट जॉन विद्यापीठ | केरळ |
२१. | राजा अरेबिक विद्यापीठ | महाराष्ट्र |
२२. | डी.डी.बी. संस्कृत विद्यापीठ | तामिळनाडू |
सुब्रतो रॉय यांना ३०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश
- सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचा पॅरोल ३ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय देतानाच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आणखी ३०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
- रॉय यांनी ३ ऑगस्टपर्यंत ही रक्कम जमा करायची आहे. ती रक्कम वेळेत न भरल्यास रॉय यांना पुन्हा तुरुंगात जावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
- सुब्रतो रॉय यांची न्यायालयाने ६ मे रोजी एका आठवड्यासाठी पॅरोलवर सुटका केली करण्याचा निकाल दिला होता.
- सुब्रतो रॉय यांच्या पॅरोलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलैपर्यंत वाढ केली होती. रॉय यांनी यावेळी २०० कोटी रुपये सेबीकडे जमा केले होते.
- असंख्य गुंतवणूकदारांचे तब्बल २० हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुब्रोत रॉय मार्च २०१४ पासून तिहार कारागृहात आहेत.
- रॉय यांच्या सहारा इंडिया रिअअल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सहारा हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन या दोन कंपन्यांनी २००७ ते २००८ या काळात परिवर्तनीय रोख्यांतून ही रक्कम जमा केली होती.
मैदानी क्रीडा स्पर्धेतील तीन खेळाडू रिओसाठी पात्र
- भारताचा तिहेरी उडीपटू रंजित महेश्वरी याच्यासह मैदानी क्रीडा स्पर्धेतील तिघे जण रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. बंगळुरूत झालेल्या चौथ्या भारतीय ग्रां. प्रि. मैदानी स्पर्धेत त्यांना हे यश मिळाले.
- महेश्वरीने तिहेरी उडीत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. याचप्रमाणे धरमबीर सिंगने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला.
- तर जिन्सन जॉन्सनने ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ऑलिम्पिक निकष पूर्ण केला.
- महेश्वरीने अर्पिदर सिंगने २०१४मध्ये नोंदवलेला १७.१७ मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. तसेच त्याने १६.८५ मीटर ही ऑलिम्पिक पात्रता वेळही पार केली.
- हरयाणाचा २७ वर्षीय खेळाडू धरमबीरने २०.४५ सेकंद वेळ नोंदवत २०.५० सेकंद ही ऑलिम्पिक पात्रता पार केली.
- त्यामुळे सुमारे ३६ वर्षांनी ऑलिम्पिकच्या २०० मीटर शर्यतीत भारताचा धावपटू दिसणार आहे. यापूर्वी १९८०मध्ये पेरुमल सुब्रमण्यम यांनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता.
कैर्न एनर्जीची सरकारकडे ५.६ अब्ज डॉलर नुकसानभरपाईची मागणी
- पूर्वलक्ष्यी प्रभावाने कराची मागणी केल्याप्रकरणी ब्रिटिश कंपनी असलेल्या कैर्न एनर्जीने केंद्र सरकारकडे ५.६ अब्ज डॉलर नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
- भारतातील दहा वर्षे जुन्या युनिटच्या पुनर्रचनेसंदर्भात कैर्न एनर्जीकडे सरकारने २९ हजार ४७ कोटी रुपये कर पूर्वलक्ष्यी प्रभावाने मागितला आहे.
- कैर्न एनर्जीने आंतरराष्ट्रीय लवादाकडे या नुकसानभरपाईसंदर्भात दावा दाखल केला आहे. यूके-भारत गुंतवणूक करारात दिलेली वचने भारताने पाळली नाहीत, असा आरोपही कैर्न एनर्जीने केला आहे.
- भारतीय आयकर विभागाने जानेवारी २०१४मध्ये कराची मागणी केल्यामुळे कैर्न इंडियाच्या भागधारणेमध्ये ९.८ टक्के तोटा झाल्याचा दावाही कंपनीने केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा