महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक जीआय मिळविणारे राज्य
- जळगावची केळी, मराठवाड्यातील केसर आंबा, भिवापूर (नंदुरबार) मिरची, डहाणू घोलवडचा (पालघर) चिकू आणि आंबेमोहर (पुणे) तांदळास भौगोलिक निर्देशांक मिळाले आहेत.
- यापूर्वी महाराष्ट्रातील १८ शेतमालास जीआय मिळाले असून, एकूण २३ जीआयसह महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक जीआय मिळविणारे राज्य ठरले आहे.
जीआय मिळालेली महाराष्ट्रातील कृषी उत्पादने | ||
---|---|---|
जळगावची केळी | मराठवाड्यातील केसर आंबा | भिवापूर (नंदुरबार) मिरची |
डहाणू घोलवडचा चिकू | आंबेमोहर (पुणे) तांदूळ | सोलापुरी डाळिंब |
नाशिकची द्राक्ष | वायगावची हळद | मंगळवेढ्याची ज्वारी |
सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा कोकम | कोरेगावचा वाघ्या घेवडा | नवापूरची तूरडाळ |
वेंगुर्ल्याचा काजू | लासलगावचा कांदा | सांगलीचे बेदाणे |
बीडची सीताफळे | जालन्याची मोसंबी | जळगावची भरताची वांगी |
पुरंदरचे अंजीर | कोल्हापूरचा गूळ | महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी |
नागपूरची संत्री | आजऱ्याचा घनसाळ तांदूळ |
गृहमंत्री राजनाथसिंह पाकिस्तान दौऱ्यावर जाणार
- ‘सार्क‘ समूहाच्या अंतर्गत सुरक्षा किंवा गृहमंत्र्यांच्या इस्लामाबाद येथे ३ व ४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परिषदेसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
- ही बहुस्तरीय आणि बहुपक्षीय परिषद असल्याने त्या दौऱ्यात भारत-पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंधांच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित नाही.
प्रख्यात तबलावादक लच्छू महाराज यांचे निधन
- बनारस घराण्याचे प्रख्यात तबलावादक लच्छू महाराज यांचे २७ जुलै रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने वाराणसी येथे निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
- लच्छू महाराज यांचे खरे नाव लक्ष्मीनारायण सिंग असे होते.
- ख्यातनाम तबलावादक असलेले वडील वासुदेव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्यांनी तबला शिकणे सुरू केले आणि त्यात प्रावीण्य मिळवले.
- बनारसी शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या लच्छू महाराज यांना पद्मश्री पुरस्कार देण्याचे केंद्र सरकारने ठरवले होते, मात्र प्रेक्षकांकडून मिळालेल्या सन्मानापेक्षा कुठलाही पुरस्कार मोठा नसल्याचे सांगून त्यांनी तो नाकारला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा