चालू घडामोडी : २१ जुलै
फॉर्च्युन-५०० मध्ये सात भारतीय कंपन्या
- जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांची यादी असलेल्या फॉर्च्युन-५००मध्ये यंदा सात भारतीय कंपन्यांची वर्णी लागली आहे.
- या यादीत रिटेल क्षेत्रातील अमेरिकी कंपनी वॉलमार्ट जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.
- भारतीय कंपन्यांमध्ये इंडियन ऑईलने १६१वे स्थान पटकावत आघाडी मिळवली आहे. तर २०१६ या वर्षासाठीच्या या यादीतून ओएनजीसी बाहेर फेकली गेली आहे.
- खासगी जेम्स अँड ज्वेलरी कंपनी असलेल्या राजेश एक्स्पोर्टने या यादीत प्रथमच प्रवेश केला असून त्याचा क्रमांक ४२३वा आहे.
- एकूण सात भारतीय कंपन्यांपैकी इंडियन ऑइल, भारतीय स्टेट बँक, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या चार कंपन्या सार्वजनिक क्षेत्रातील आहेत.
- खासगी कंपन्यांमध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी आहे. त्यानंतर टाटा मोटर्स व राजेश एक्स्पोर्ट यांचे क्रमांक लागले आहेत.
फॉर्च्युन-५०० मधील भारतीय कंपन्या |
कंपनी |
क्रमांक |
इंडियन ऑइल |
१६१ |
रिलायन्स इंडस्ट्रीज |
२१५ |
टाटा मोटर्स |
२२६ |
भारतीय स्टेट बँक |
२३२ |
भारत पेट्रोलियम |
३५८ |
हिंदुस्थान पेट्रोलियम |
३६७ |
राजेश एक्स्पोर्ट |
४२३ |
जागतिक निवृत्ती निर्देशांकात भारताला ८८वे स्थान
- नॅटिक्सिस ग्लोबल ऍसेट मॅनेजमेंटच्या चौथ्या जागतिक निवृत्ती निर्देशांकात (जीआरआय) भारताला ८८वे स्थान मिळाले आहे. ब्रिक्स देशांमध्ये भारताची कामगिरी सर्वांत वाईट ठरली आहे.
- भारतात नोकरीतून निवृत्त झालेल्या व्यक्तींचे आयुष्य इतर देशांच्या तुलनेत सर्वांत अवघड असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.
- निवृत्तीनंतरचे दिवस सुखात घालविता येतील अशा देशांच्या यादीत स्वित्झर्लंडने पहिला क्रमांक मिळविला आहे. या खालोखाल नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, आइसलॅंड आणि नेदरलॅंड या देशांनी क्रमांक पटकाविला आहे.
- या अहवालात जगातील एकूण ४३ देशांतील निवृत्त व्यक्तींच्या जीवनमानाचा अभ्यास करण्यात आला.
- निर्देशांकात देशाचे स्थान ठरविण्यासाठी त्या देशांतील पाच वर्षांचा मुलभूत व्याजदर आणि महागाईच्या सरासरीचा अभ्यास करण्यात आला.
- याआधारे निवृत्तीनंतर लोकांच्या गरजा, अपेक्षा आणि विश्वासाला पात्र ठरणाऱ्या देशांच्यामध्ये तुलना करून हे निष्कर्ष काढण्यात आले.
- २०१४मध्ये या यादीत भारताचा क्रमांक १०४वा होता. या तुलनेत भारताची थोडी सुधारणा असली तरी अद्यापही परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नसल्याचेच हा अहवाल सांगत आहे.
भारतामध्ये १०.९६ लाख नागरिकांना ‘एचआयव्ही’ची लागण
- भारतामध्ये गेल्या वर्षात सुमारे १०.९६ लाख नागरिकांना नव्याने ‘एचआयव्ही’ची लागण झाली आहे, अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे.
- ‘दी न्यू ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज २०१५’ (जीबीडी : २०१५) हा अहवाल ‘दी लॅन्सेट’ या एचआयव्ही जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
- या अहवालात देशात एकूण २८.८१ लाख जण एचआयव्हीने बाधित असल्याचे समोर आले आहे. जगभरात ‘एचआयव्ही’ची लागण होण्याचा वेग संथ गतीने मंदावत आहे.
- गेल्या दहा वर्षांत (२००५-२०१५) नव्याने लागण प्रमाण केवळ ०.७ टक्के आहे. हेच प्रमाण १९९७ ते २००५ दरम्यान २.७ टक्के होते.
- जगभरात एचआयव्ही बाधित व्यक्तींचे प्रमाण वाढत चालले असून, सन २०००मध्ये २.७९ कोटी जण एचआयव्हीने बाधित होत्या. २०१५मध्ये हाच आकडा ३.८८ कोटी इतका झाला.
- एड्सने वर्षाला मृत्यू झालेल्यांच्या संख्येत घट होत चालली आहे. २००५मध्ये १८ लाख तर २०१५मध्ये १२ लाख जणांचा या आजाराने मृत्यू झाला होता. अँटीरिट्रोव्हायरल थेरपीमुळे (एआरटी) मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.
- मात्र, गेल्या दहा वर्षांत नव्याने लागण होणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये फारसा फरक पडलेला नाही, ही चिंतेची बाब आहे.
खलिदा जिया यांच्या मुलाला सात वर्षांची शिक्षा
- बांगलादेशच्या मुख्य विरोधी पक्षनेत्या खलिदा जिया यांच्या मोठ्या मुलाला सात वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली. आर्थिक गैरव्यवहाराचा त्याच्या मुलावर आरोप ठेवण्यात आला आहे.
- आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तारिक रेहमान याच्यावर २०१३मध्ये गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली होती.
- या निकालाविरोधात उच्च न्यायालयात आपिल करण्यात आले होते. उच्च न्यायालयानेही रेहमान यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली.
- दोन वेळा पंतप्रधान झालेल्या खलिदा जिया यांचा तारिक हा मोठा मुलगा आहे. खलिदा जिया यांचा राजकीय वारसदार म्हणून पाहिले जात आहे.
तुर्कस्तानचे तीन महिन्यांची आणीबाणी
- लष्करी बंडामागे असलेल्या दहशतवादी गटांचा शोध घेण्यासाठी तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी तीन महिन्यांची आणीबाणी घोषित केली आहे.
- तुर्कस्तानच्या लष्करातील नाराज सैनिकांच्या एका गटाने सत्तापालटाचा प्रयत्न केला होता. लष्कराच्या बंडामुळे २५० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
- आतापर्यंत या बंडात सहभागी २८३९ सैनिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
- यापूर्वी १९८७ मध्ये तुर्कीमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा