राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
- विभागवार समतोल, जातसमूहाच्या राजकीय फायद्या-तोट्याचे गणित साधत, शिवसेनेसह घटक पक्षाला सामावून घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला.
- राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ६ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची, तर ५ आमदारांना राज्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ दिली.
- गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांना या विस्तारात बढती देण्यात आली असून, त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे.
- या खाते वाटपामध्ये चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्याकडे महत्वाची खाती देण्यात आली आहेत.
- तर पंकजा मुंडे यांच्याकडील जलसंधार खाते तर विनोद तावडे यांच्या कडील वैद्यकीय शिक्षण खाते काढून घेण्यात आले आहे.
- भारतीय जनता पक्षाचे पांडुरंग फुंडकर, प्रा. राम शिंदे, जयकुमार रावल, संभाजी पाटील-निलंगेकर, सुभाष देशमुख यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे.
- तर शिवसेनेचे अर्जुन खोतकर, गुलाबराव पाटील, भाजपचे रवींद्र चव्हाण, मदन येरावार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे.
स्त्री भ्रूणहत्येमध्ये भारत चौथ्या स्थानी
- ‘एशियन सेंटर फॉर ह्युमन राइट्स’ (एसीएचआर) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात मुलगाच हवा, या हव्यासापोटी दरवर्षी दीड लाखापेक्षाही मुलींना गर्भातच मारले जात असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.
- स्त्री भ्रूणहत्येमुळे पुरुष आणि महिलांच्या प्रमाणात मोठी विषमता निर्माण झाली असून, या क्रमवारीमध्ये भारत चौथ्या, तर लिश्टेस्टाइन पहिल्या स्थानी आहे.
- दक्षिण कोरियाचा अपवाद वगळला तर जगातील अनेक देश कठोर कायदे आणि योजना तयार करूनदेखील स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण कमी करू शकलेले नाहीत.
- पुरुष महिलांच्या संख्येत असमतोल निर्माण झाल्याने मानवी अस्तित्वासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. यामुळे मानवी तस्करी, महिलांवरील अत्याचार यांसारख्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
- गर्भलिंग निदान हा लिंग भेदभावाचा निकृष्ट प्रकार असल्याचेही ‘एशियन सेंटर फॉर ह्युमन राइट्स’ या संस्थेने म्हटले आहे.
सर्वाधिक स्त्री भृणहत्या होणारे देश | |
---|---|
क्रमांक | देश |
१. | लिश्टेस्टाइन |
२. | चीन |
३. | अर्मेनिया |
४. | भारत |
५. | अझरबैझान व व्हिएतनाम |
६. | अल्बानिया |
७. | जॉर्जिया |
८. | दक्षिण कोरिया व ट्युनिशिया |
९. | नायजेरिया |
१०. | पाकिस्तान |
राधिका मेनन यांना सागरी शौर्याबद्दल पुरस्कार
- भारतीय व्यापारी नौसेनेच्या पहिल्या महिला कॅप्टन राधिका मेनन यांना सागरी शौर्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
- मागील वर्षी जूनमध्ये राधिका मेनन यांनी प्रतिकूल परिस्थितीत दुर्गाम्मा या बुडत्या जहाजासह सात मच्छीमारांना वाचविले होते.
- या जहाजातील मच्छीमारांचे अन्न समुद्राच्या पाण्यात वाहून गेले होते. त्यानंतर हे मच्छीमार बर्फावर जिवंत राहिले होते. १५ ते ५० वयोगटातील या मच्छीमारांना वाचविण्यासाठी तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले होते.
- त्यांना सुखरुप बाहेर काढल्याच्या पराक्रमाबद्दल राधिका मेनन यांना २०१६मधील विशेष शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
- आंतरराष्ट्रीय समुद्र संघटनेच्यावतीने (आयएमओ) हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. हा पुरस्कार पटकाविणाऱ्या राधिका मेनन या जगातील पहिल्या महिला आहेत.
- आंतरराष्ट्रीय समुद्र संघटना (आयएमओ) ही संयुक्त राष्ट्र संघाच्या संयुक्त विद्यमानाने जहाज सुरक्षा आणि जहाजांद्वावारे समुद्रात होणाऱ्या प्रदुषणाच्या नियंत्रणाची जबाबदारी पार पाडत असते.
- त्यामुळे अशा संस्थेकडून भारतीय महिलेला मिळणारा हा सन्मान कौतुकास पात्र आहे.
डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘पीस टीव्ही’वर बंदी
- बांगलादेशची राजधानी ढाका येथे भीषण हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी भारतीय मुस्लीम धर्मप्रसारक डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांमधून प्रेरणा घेतली होती, असे समोर आल्यानंतर नाईक यांच्या ‘पीस टीव्ही’च्या प्रसारणावर बांगलादेशात बंदी घालण्यात आली आहे.
- ढाका हल्याच्या चौकशीला भारत बांगलादेशला संपुर्ण सहकार्य करत आहे. भारतातील केबल ऑपरेटरनाही ‘पीस टीव्ही’चे प्रसारण बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
- ‘पीस टीव्ही’च्या प्रसारणासाठी नाईककडे डाउनलिंकचा परवावना नसल्याने या टीव्हीचे प्रसारण अवैध पद्धतीने सुरु आहे.
- मुंबई येथील इस्लामिक रीसर्च फाउंडेशनच्या वतीने पीस टीव्ही चालवला जातो व त्यावर नाईक यांची भाषणे प्रसारित केली जात असतात. सध्या पीस टीव्हीचे सर्व कार्यक्रमाचे प्रसारण दुबईमधून होत आहे.
- गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी मुंबई स्थित नाईक यांच्या भाषणीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
- राष्ट्रीय तपास यंत्रणेची नऊ पथके त्याशिवाय गुप्तचर यंत्रणा आणि अन्य तपास यंत्रणा झाकीर नाईकच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत. विशेष पथके त्याच्या भाषणाच्या चित्रफितींमधील शब्द न शब्द तपासत आहेत.
- प्राथमिक तपासात नाईकची भाषणे चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह असल्याचे समोर आले आहे.
विल्यम्स बहिणी महिला विम्बल्डन दुहेरीत चॅम्पियन
- जागतिक क्रमवारीतील नंबर वन महिला खेळाडू सेरेना विल्यम्सने विम्बल्डन एकेरीचे विजेतेपद पटकावल्यानंतर व्हिनस विल्यम्सच्या साथीने महिला दुहेरीत चॅम्पियन बनण्याचा बहुमान मिळवला आहे.
- अमानांकित सेरेना अणि व्हिनस जोडीने हंगेरीच्या तिमिया बाबोस आणि कजाखिस्तानच्या यारोस्लाव्हा श्वेदोव्हा या जोडीवर ६-३, ६-४ असा विजय मिळवला.
- विल्यम्स बहिणींचे हे एकमेकींच्या साथीने सहावे विम्बल्डन विजेतेपद ठरले. त्याचबरोबर सेरेनाने विम्बल्डनमध्ये दुहेरी मुकुट पटकावला आहे.
- त्याआधी सेरेनाने जर्मनीच्या अँजेलिक केर्बर हिचा पराभव करीत महिला एकेरीच्या विजेतेपदावरही शिक्कामोर्तब केले होते. ते तिचे विम्बल्डनमधील एकेरीचे ७वे तर एकूण २२वे विजेतेपद ठरले.
उत्तर कोरियाची बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी
- उत्तर कोरियाने सिनपो किनाऱ्यालगत बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. मात्र, प्राथमिक पातळीवर हे परीक्षण अयशस्वी ठरल्याचे दक्षिण कोरियाच्या सैनिकांनी म्हटले आहे.
- दक्षिण कोरिया सैन्यांच्या मतानुसार, उत्तर कोरियाने एका पाणबुडीतून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली; परंतु पाणबुडीतून घेण्यात आलेली चाचणी पहिल्याच टप्प्यात अयशस्वी ठरली आहे.
- संयुक्त राष्ट्रसंघाने निर्बंध घातलेले असतानाही उत्तर कोरिया चाचणी घेत आहे. संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानुसार, उत्तर कोरिया कोणत्याही प्रकारच्या क्षेपणास्त्राच्या तंत्राचा वापर करु शकत नाही.
- उत्तर कोरियाकडून वारंवार क्षेपणास्त्राच्या चाचण्या घेतल्या जात आहेत; तसेच अमेरिकेला खुले आव्हान दिल्यामुळे अमेरिका आणि दक्षिण कोरियाचे क्षेपणास्त्र संरक्षण योजनेवर एकमत झाले आहे.
- दुसरीकडे रशिया आणि चीनने अमेरिकेच्या भूमिकेला विरोध केला आहे. अमेरिकेने जर दक्षिण कोरियात क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली, तर रशिया पूर्व क्षेत्रात क्षेपणास्त्र तैनात करणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा