चालू घडामोडी : २६ जून

भारत आणि सेशल्सदरम्यान ६ करारांवर स्वाक्षऱ्या

 • सेशल्सचे राष्ट्रपती डॅनी फॉर यांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फॉर यांची द्विपक्षीय बैठक २५ जून रोजी पार पडली. त्यानंतर ६ विविध करारांवर दोघांकडून स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 • यावेळी सेशल्सच्या सागरी सुरक्षेची क्षमता वाढवण्यासाठी भारताकडून १० कोटी डॉलरचे कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली.
 • याशिवाय भारताने हिंदी महासागरामध्ये अत्यंत महत्त्वाच्या जागी असणाऱ्या सेशेल्सला दुसरे डॉर्नियर विमान भेट म्हणून दिले आहे.
 • सागरी संकटांपासून वाचण्यासाठी या विमानाचा आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी सेशेल्सला या विमानाची मदत होणार आहे.
 • सेशल्सच्या समुद्रात होत असलेल्या चिनी कारवायांच्या पार्श्वभूमीवर, सेशल्समध्ये नाविक तळ उभारण्यासाठी भारत आणि सेशल्समध्ये महत्त्वपूर्ण करार झाला आहे.
 • सेशल्सच्या अधिकार क्षेत्रात भारताकडून उभारण्यात येणाऱ्या या नाविक तळामुळे हिंदी महासागरात भारताचे बळ वाढणार आहे.
 • काही दिवसांपूर्वी सेशल्सने आपल्या असम्शन बेटांवर भारताच्या मदतीने उभारण्यात येणाऱ्या नाविक तळाबाबतचा करार रद्द करण्याची घोषणा केली होती.
 • मात्र या कराराबाबतच्या सेशल्सच्या शंका दूर झाल्यानंतर भारताचा येथे नाविक तळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आर. प्रग्नानंधा भारतातील सर्वात युवा ग्रँडमास्टर

 • बुद्धिबळपटू आर. प्रग्नानंधा हा भारतातील सर्वात युवा आणि जगातील दुसरा युवा ग्रँडमास्टर ठरला आहे.
 • जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर बनण्याचा मान सध्या रशियाकडून खेळणाऱ्या पण युक्रेनचा देशवासी असलेल्या सेर्गेट कार्जाकिन २००२मध्ये पटकावला होता. त्या वेळी कार्जाकिन १२ वर्षे ७ महिन्यांचा होता.
 • इटली येथे झालेल्या ग्रेन्डिन ओपन बुद्धिबळ स्पर्धेत १२ वर्षे, १० महिने आणि १३ दिवसांच्या प्रग्नानंधाने अंतिम फेरीपूर्वीच ग्रँडमास्टरचा तिसरा नॉर्म पूर्ण केला.
 • या स्पर्धेत पहिल्याच फेरीत प्रग्नानंधा पराभूत झाला होता. मात्र, हा त्याचा एकमेव पराभव ठरला. पुढील आठ फेऱ्यांमध्ये त्याने तीन डाव बरोबरीत सोडविले, तर पाच लढती जिंकल्या.
 • या स्पर्धेत प्रग्नानंधाने ७.५ गुणांसह उपविजेतेपद मिळवले, तर क्रोएशियाच्या सॅरिक इव्हॅनने विजेतेपद मिळवले.
 • २०१६मध्ये प्रग्नानंधा (१० वर्षे, १० महिने १९ दिवस) हा सर्वात युवा इंटरनॅशनल मास्टर ठरला होता.
 • जागतिक विजेता मॅग्नस कार्लसन ग्रँडमास्टर झाला त्यावेळी त्याचे वय १३ वर्षे ४ महिने होते. तर विश्वनाथ आनंदने हा सन्मान १८व्या वर्षी पटकावला.
 • सगळ्यात तरूण भारतीय ग्रँडमास्टर आत्तापर्यंत परीमार्जन नेगी होता, ज्याने हा किताब १३ वर्षे ४ महिन्याचा असताना पटकावला होता.

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी दत्ता पडसलगीकर

 • महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर सेवाज्येष्ठतेनुसार जून अखेरीस निवृत्त होत असून, त्यानंतर या पदावर दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती होणार आहे.
 • पडसलगीकर यांच्याकडे सध्या मुंबईचे आयुक्तपद आहे. ते महासंचालक झाल्यावर मुंबईच्या आयुक्तपदी संजय बर्वे यांना संधी मिळणार आहे.
 • सेवाज्येष्ठतेनुसार पडसलगीकरदेखील ऑगस्टअखेरीस निवृत्त होतील. मात्र त्यांची ३६ वर्षांची निष्कलंक सेवा लक्षात घेऊन, त्यांना ६ महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत ते महासंचालकपदी राहतील.

आयफा पुरस्कार २०१८

 • बँकॉक येथे २४ जून रोजी पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री विद्या बालन आणि मानव कौल यांच्या ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळवला.
 • तर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॉम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनी हा पुरस्कार स्विकारला.
 • तसेच ‘हिंदी मीडियम’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कार इरफान खानला देण्यात आला.
 आयफा पुरस्कार विजेत्यांची यादी... 
 • बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस: मेहर विज (सीक्रेट सुपरस्टार)
 • बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर: नवाजुद्दीन सिद्दीकी (मॉम)
 • बेस्ट स्टोरी : अमित मसूरकर (न्यूटन)
 • बेस्ट प्लेबॅक सिंगर (मेल): अरिजीत सिंह, हवाएं (जब हैरी मेट सेजल)
 • बेस्ट प्लेबॅक सिंगर (फीमेल): मेघना मिश्रा, मैं कौन हूं (सीक्रेट सुपरस्टार)
 • बेस्ट बॅकग्राउंड स्कोर: प्रीतम चक्रवर्ती (जग्गा जासूस)
 • सर्वश्रेष्ठ गीत: नुसरत फतेह अली खान, ए १ मेलोडी फना आणि मनोज मुंतशीर (मेरे रश्के कमर (बादशाहो))
 • बेस्ट कोरियोग्राफी: विजय गांगुली आणि रुएल डोसन वारिन्दानी (जग्गा जासूस)
 • बेस्ट स्पेशल इफेक्ट्स: एनआई वीएफएक्स (जग्गा जासूस)
 • बेस्ट स्क्रीनप्ले: नितेश तिवारी आणि श्रेयश जेनस (बरेली की बर्फी)
 • बेस्ट डॉयलॉग: हितेश केवल्य (शुभ मंगल सावधान)
 • बेस्ट एडिटिंग: व्यंकट मैथ्यू (न्यूटन)
 • बेस्ट साउंड डिजाइन: दिलीप सुब्रमण्यम आणि गणेश गंगाधरन (टाइगर जिंदा है)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा