चालू घडामोडी : १७ जून
अमेरिका आणि भारत-चीन यांच्यात व्यापार युद्ध
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि भारताबरोबर व्यापार युद्ध सुरु केले असून, त्यांनी चीन आणि भारतामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर लादला आहे.
- ट्रम्प यांनी चीनवर बौद्धिक संपदेवर दरोडा घालत असल्याचा आरोप करीत चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर (५० अब्ज डॉलर्स) अतिरिक्त लादला आहे.
- याला भारतानेही जशास तसे उत्तर देताना अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर सीमा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
- अमेरिकेने गेल्या महिन्यात स्टीलवर २५ टक्के, तर अल्युमिनियमवर १० टक्के आयात कर लावला होता. या करामुळे भारताला २४१ दशलक्ष डॉलरचा फटका बसणार आहे..
- अमेरिकेच्या करवाढीमुळे जितका भारतीय व्यापारावर परिणाम होणार आहे तितकीच करवाढ भारताने केली आहे.
- अमेरिकेतून आयात होणाऱ्या मोटर सायकल, लोखंड-स्टीलच्या वस्तू, बोरिक ॲसिड आणि डाळींवर ५० टक्क्यांपर्यंत सीमा शुल्क वाढविण्यात येणार आहे.
- तसेच अमेरिकेतील ३० उत्पादनांना देण्यात येणारी सवलत बंद करीत असल्याचेही भारताने जागतिक व्यापार संघटनेला कळविले आहे.
- भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक समस्या सोडविण्यासाठी जूनच्या अखेरीला दोन्ही देशांमध्ये अधिकारी स्तरावर बैठक होणार आहे. यात दोन्ही देशांतील व्यापारी मतभेद मिटविण्याचा प्रयत्न केला जाईल.
- चीननेही अमेरिकेला प्रत्युत्तर देताना, अमेरिकेच्या ५० अब्ज डॉलर्स किमतीच्या ६५९ वस्तूंवर २५ टक्के कर लादला आहे.
- अमेरिकेच्या ३४ अब्ज रुपये किमतीच्या ५४५ वस्तूंवर ६ जुलै २०१८पासून चीनमध्ये कर लागू होत असून, त्यात कृषी उत्पादने, वाहने व इतर उत्पादनांचा समावेश आहे.
- या घडामोडींमुळे अमेरिका आणि भारत-चीन यांच्यात व्यापार युद्ध छेडले गेले आहे.
रॉजर फेडरर जागतिक क्रमवारीत पुन्हा पहिल्या स्थानी
- टेनिसचा अनभिषीक्त सम्राट म्हणून ओळख असलेला स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आलेला आहे.
- स्टुटगार्ड ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत मिलोस राओनिकवर मात करत आपला पहिले स्थान पुन्हा एकदा कायम राखले आहे.
- फेडररचे हे ९८वे विजेतेपद ठरले. अंतिम फेरीत फेडररने मिलोस राओनिकवर ६-४, ७-६(३) अशा फरकाने मात केली.
- यासह फेडररने आपला कट्टर प्रतिस्पर्धी स्पेनचा ‘क्ले कोर्टचा बादशाह’ राफेल नदालला पिछाडीवर टाकले आहे.
- फेडररने गेल्या एक वर्षापासून ग्रास कोर्टवर एकही पराभव पत्करलेला नाही. तसेच, एक वर्षापासून तो क्ले कोर्टवर एकही सामना खेळलेला नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा