चालू घडामोडी : २३ जून

महाराष्ट्रात २३ जूनपासून सरसकट प्लास्टिकबंदी लागू

  • महाराष्ट्र सरकारने २३ मार्च रोजी अधिसूचना काढत लागू केलेली सरसकट प्लास्टिकबंदी तीन महिन्यांनंतर म्हणजेच २३ जूनपासून लागू होत आहे.
  • प्लास्टिकबंदीबाबत सविस्तर माहितीसाठी मुंबईतील नागरिकांना १८०० २२२ ३५७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.
  • प्लास्टिकबंदीमध्ये नेमकी कशावर बंदी असेल, प्लास्टिकबंदीचे उल्लंघन केल्यास दंड किती याचा घेतलेला हा आढावा.
  • बंदी कशावर?
  • प्लास्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या. पातळ-जाड, बंध असलेल्या-नसलेल्या सर्व पिशव्या.
  • थर्माकोल व प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या व एकदाच वापरून फेकल्या जाणाऱ्या वस्तू. उदा. ताट, वाटय़ा, ग्लास, चमचे इ.
  • उपाहारगृहात अन्न देण्यासाठी वापरले जाणारे डबे, स्ट्रॉ, नॉनवोवन पॉलिप्रॉपिलेन बॅग. (वोवन पॉलिप्रॉपिलेन बॅग या धान्य साठवण्यासाठी वापरल्या जातात.)
  • नारळपाणी, चहा, सूप इ. पातळ पदार्थ देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्या.
  • थर्माकोल व प्लास्टिकचे सजावट साहित्य.
  • बंदी कशावर नाही?
  • उत्पादकांकडूनच प्लास्टिकच्या वेष्टनात येणारे पदार्थ. उदा. ब्रॅण्डेड वेफर्स, चिवडा इ.
  • ब्रॅण्डेड शर्ट, ड्रेस, साडय़ा यांची उत्पादकांकडून गुंडाळलेली प्लास्टिक वेष्टने.
  • ब्रॅण्डेड दूध, तेल असलेल्या जाड प्लास्टिक पिशव्या तसेच बाटलीबंद पाणी.
  • शेती, रोपवाटिका, ओला कचरा जमा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विघटनशील प्लास्टिकच्या पिशव्या.
  • निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या वेष्टनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक.
  • औषधांसाठी वापरले जाणारे वेष्टन.
  • कारवाई कुठे?
  • सर्व दुकाने, कंपन्या, सार्वजनिक ठिकाणे, वने, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, शासकीय, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, चित्रपटगृह व नाट्यगृह.
  • कारवाई कोणावर?
  • राज्यातील कोणतीही व्यक्ती व व्यक्तींचा समूह, दुकानदार, मॉल्स, फेरीवाले, वितरक, वाहतूकदार, मंडई, कॅटरर्स इत्यादी.
  • दंड आणि शिक्षा
  • महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियम २००६नुसार नियमभंग केल्यास पहिल्या वेळी ५ हजार रुपये आणि दुसऱ्या वेळी १० हजार रुपये दंडाची तरतूद. तिसऱ्या वेळी पकडले गेल्यास २५ हजार रुपये व ३ महिन्यांच्या कैदेची तरतूद.

विक्रमवीर अवकाशयात्री पेगी व्हिटसन नासामधून निवृत्त

  • अवकशात सर्वाधिक काळ वास्तव्य केलेल्या अमेरिकेतील महिला अवकाशयात्री पेगी व्हिटसन नासा या अवकाश संशोधन संस्थेतून १५ जून रोजी निवृत्त झाल्या.
  • पेगी यांनी अवकाशात ६६५ दिवस २२ तास २२ मिनिटे वास्तव्य करण्याचा विक्रम केलेला आहे.
  • महिलांमध्ये सर्वाधिक स्पेस वॉक त्यांनी केले आहेत. १० स्पेसवॉकमध्ये त्यांनी ६० तास २१ मिनिटे एवढा मोठा काळ व्यतीत केला.
  • आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात त्यांनी तीन मोहिमा पूर्ण केल्या. २००२मध्ये त्यांचा पहिला अवकाश स्थानक प्रवास घडला.
  • अवकाशस्थानकात नेमण्यात आलेल्या त्या पहिल्या वैज्ञानिक अधिकारी ठरल्या होत्या. नोव्हेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ दरम्यान त्या अवकाश स्थानकाचे सारथ्य करणाऱ्या पहिल्या महिला होत्या.
  • त्या १९८६मध्ये नासात आल्या, तेथे अनेक भूमिका पार पाडत असताना त्या मीर अवकाश स्थानकातही प्रकल्प वैज्ञानिक बनल्या.
  • व्हिटसन यांचा जन्म आयोवात झाला. आयोवा वेसलन कॉलेजमधून त्या विज्ञानाच्या पदवीधर बनल्या.
  • राइस विद्यापीठातून जैवरसायनशास्त्रात डॉक्टरेट केल्यानंतर जॉन्सन स्पेस सेंटर येथे त्यांनी संशोधनाचे काम सुरू केले.
  • त्यानंतर कृग इंटरनॅशनल संशोधन गटात त्या काम करीत होत्या. १९९६मध्ये त्यांची जॉन्सन स्पेस सेंटर येथे अवकाशप्रवासासाठी उमेदवार म्हणून निवड झाली.
  • त्याआधी त्यांनी नासामध्ये जैवरसायनशास्त्रज्ञ म्हणून काम केले होते. अमेरिका-रशिया वैज्ञानिक कार्यकारी गटाच्या त्या सहअध्यक्षही होत्या.
  • त्यांच्या सोळाव्या मोहिमेत त्यांनी सुनीता विल्यम्सचा स्पेसवॉकचा विक्रम मोडला. टाइम नियतकालिकाने अलीकडेच त्यांचा गौरव केला.

कॅनडामध्ये गांजाला कायदेशीर मान्यता

  • १७ ऑक्टोबर २०१८ पासून कॅनडामध्ये गांजाला कायदेशीर मान्यता मिळणार आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनीच ही घोषणा केली आहे.
  • गांजाला कायदेशीर मान्यता देणारा कॅनडा हा जी-७ देशांमधील पहिलाच देश असेल. ५ वर्षांपुर्वी उरुग्वे देशानेही अशीच मान्यता दिली होती. त्यानंतर कॅनडाने गांजाच्या वापरावरील निर्बंध काढून घेतले आहेत.
  • कॅनडाच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी गांजाला कायदेशीर ठरविण्यात यावे यासाठी संमती दिली आहे.
  • १९२३साली कॅनडामध्ये गांजावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर २००१साली गांजाचा औषधासाठी वापर करण्यास मान्यता देण्यात आली होती.
  • आता नव्या नियमानुसार सर्व प्रौढ गांजाचा वापर करु शकणार आहेत व एका मर्यादेपर्यंत त्यांची लागवडही करु शकणार आहेत.
  • प्रत्येक कुटुंबाला एकावेळेस गांजाची ४ रोपे घरात लावता येतील तसेच एक व्यक्ती एकावेळेस ३० ग्रॅमपर्यंत गांजा बाळगू शकेल.
  • गांजाविक्री करणाऱ्या दुकानांकडून करही गोळा करण्यात येणार आहे. गांजाच्या व्यापारातून कॅनडा सरकारला कराच्या माध्यमातून भरपूर पैसा उपलब्ध होणार आहे.

पाकिस्तानी फलंदाज अहमद शेहजाद उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी

  • पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज अहमद शेहजाद उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे.
  • आयसीसीच्या उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत शेहजादवर सध्या ३ ते ६ महिन्यांच्या बंदीची शिक्षा होऊ शकते.
  • शेहजादने आतापर्यंत पाकिस्तानकडून १३ कसोटी, ८१ वन-डे आणि ५७ टी-२० सामने खेळले आहेत.
  • सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची एक समिती शेहजादची चौकशी करणार असून, यानंतर त्याच्या शिक्षेबद्दलचा निर्णय घेतला जाईल.
  • फेब्रुवारी २०१६मध्ये पाकिस्तानचा फिरकीपटू यासिर शहा उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्यालाही निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा