- कारगिल युद्धाला २६ जुलै रोजी १९ वर्षे पूर्ण झाली. १९९९च्या कारगिल युद्धात लढलेल्या जवानांच्या त्याग आणि बलिदानाला आदरांजली वाहण्याचा हा दिवस आहे.
- भारत आणि पाकिस्तानमध्ये १९९९साली कारगिल युद्ध झाले होते. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानला युद्धभूमीत पराभूत करत जगाला आपल्या वीरतेचा संदेश दिला.
- १९६५ आणि १९७१ पेक्षा या युद्धाचे स्वरुप वेगळे होते. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून भारतात घुसखोरी केली होती.
- ६० पेक्षा जास्त दिवस लढल्या गेलेल्या या कारगिल युद्धामध्ये भारताचे ५२७ जवान शहीद झाले. तर १३०० पेक्षा अधिक सैनिक जखमी झाले होते.
- या युद्धात भारतीय सैन्याने ३००० पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक व दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
- १८ हजार फूट उंची आणि बर्फाळ प्रदेश अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्याने धाडसाने शत्रूवर विजय मिळवला होता.
- या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन विजय नाव देण्यात आले होते. तसेच यावेळेस भारताने केलेल्या हवाई कारवाईला सफेदसागर नाव देण्यात आले होते.
- दोन अण्वस्त्रधारी सत्ता एकमेकांसमोर ठाकण्याच्या दुर्मिळ घटनेपैकी एक ही घटना होती. या युद्धाच्यावेळेस अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते.
- तेव्हापासून भारतीय जवानांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण म्हणून २६ जुलै हा कारगिल विजयदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
Kargil Vijay Din लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Kargil Vijay Din लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
