कारगिल विजयदिन : भारतमातेच्या वीरपुत्रांना सलाम

 • कारगिल युद्धाला २६ जुलै रोजी १९ वर्षे पूर्ण झाली. १९९९च्या कारगिल युद्धात लढलेल्या जवानांच्या त्याग आणि बलिदानाला आदरांजली वाहण्याचा हा दिवस आहे.
 • भारत आणि पाकिस्तानमध्ये १९९९साली कारगिल युद्ध झाले होते. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानला युद्धभूमीत पराभूत करत जगाला आपल्या वीरतेचा संदेश दिला.
 • १९६५ आणि १९७१ पेक्षा या युद्धाचे स्वरुप वेगळे होते. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून भारतात घुसखोरी केली होती.
 • ६० पेक्षा जास्त दिवस लढल्या गेलेल्या या कारगिल युद्धामध्ये भारताचे ५२७ जवान शहीद झाले. तर १३०० पेक्षा अधिक सैनिक जखमी झाले होते.
 • या युद्धात भारतीय सैन्याने ३००० पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक व दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
 • १८ हजार फूट उंची आणि बर्फाळ प्रदेश अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्याने धाडसाने शत्रूवर विजय मिळवला होता.
 • या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन विजय नाव देण्यात आले होते. तसेच यावेळेस भारताने केलेल्या हवाई कारवाईला सफेदसागर नाव देण्यात आले होते.
 • दोन अण्वस्त्रधारी सत्ता एकमेकांसमोर ठाकण्याच्या दुर्मिळ घटनेपैकी एक ही घटना होती. या युद्धाच्यावेळेस अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते.
 • तेव्हापासून भारतीय जवानांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण म्हणून २६ जुलै हा कारगिल विजयदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
 कारगिल युद्धामधील शौर्यासाठी प्रदान करण्यात आलेले पुरस्कार 
 • भारतीय सुरक्षादलातील एकूण ९७ जणांना कारगिल युद्धातील कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले.
 • १८ ग्रेनेडीयर बाटलियनचे सैनिक ग्रेनेडीयर (हातबॉम्ब फेकणारा सैनिक) योगेंद्र सिंग यादव यांना परमवीर चक्र पुरस्कार.
 • १/११ गोरखा रायफल्स बाटलियनमधील लेफ्टनंट मनोज कुमार पांड्ये यांना परमवीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर).
 • १३ जेएके रायफल्स बाटलियनचे कॅप्टन विक्रम बत्रा यांना परमवीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर).
 • १३ जेएके रायफल्सचे रायफलमॅन संजय कुमार यांना परमवीर चक्र पुरस्कार.
 • १७ जाट बाटालियनचे कॅप्टन अर्जून नायर यांना महावीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर).
 • १८ ग्रेनेडीयर बाटलियनचे मेजर राजेश सिंग अधिकारी यांना महावीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर).
 • ११ राजपुताना रायफल्सचे कॅप्टन हनिफउद्दीन यांना वीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर).
 • १ बिहार बटालियनचे मेजर मरिय्यपन सर्वनन यांना वीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर).
 • भारतीय हवाईदलाचे स्क्वाड्रन लीडर अजय अहूजा यांना वीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर).
 • ८ जेएके एलआय हवालदार चुन्नी लाल यांना वीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच शौर्यासाठी सेना मेडलही देण्यात आले. त्यानंतर नायब सुबेदार झाल्यानंतर निवृत्त झालेल्या चुन्नी लाल यांना मरणोत्तर अशोक चक्र पुरस्कार जाहीर करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा