shasnachya yojana लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
shasnachya yojana लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पंतप्रधान विद्यालक्ष्मी कार्यक्रम

Pradhanmantri Vidyalakshmi Program      उच्चशिक्षणासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने ‘विद्यालक्ष्मी’ या अभिनव उपक्रमाची मुहूर्तमेढ १५ ऑगस्ट २०१५ रोजी रोवली आहे. त्या अंतर्गत विद्यार्थ्याने शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केल्यानंतर पाच सार्वजनिक बँकांची सेवा उपलब्ध होणार आहे. जेणेकरून कर्ज मिळविण्यातील अडचणी संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
      या उपक्रमासाठी केंद्राने www.vidyalakshmi.co.in या पोर्टलची निर्मिती केली आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी सुरू केलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची माहिती २० ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली.
 ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी कार्यक्रमा’विषयी 
  • नाव: पंतप्रधान विद्यालक्ष्मी कार्यक्रम
  • सुरुवात: १५ ऑगस्ट २०१५ (अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५-१६च्या अर्थसंकल्पीय भाषणात ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी कार्यक्रमा’ची घोषणा केली होती.)
  • संकेतस्थळ: www.vidyalakshmi.co.in
  • सहयोगी बँका: स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया
  • निर्मिती व व्यवस्थापन: या पोर्टलची निर्मिती आणि देखभालीची जबाबदारी ‘ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ (एनएसडीएल) या सरकारी उपक्रमाकडे देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थखाते, वित्तीय सेवा खाते, उच्चशिक्षण खाते, मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि ‘इंडियन बँक्स असोसिएशन’च्या (आयबीए) मार्गदर्शनाखाली ‘एनएसडीएल’ उपक्रमाचे व्यवस्थापन पाहणार आहे. 

उद्दिष्टे
  1. आर्थिक मदतीअभावी देशातील कुणीही विद्यार्थी शिक्षणाविना राहू नये, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विद्यालक्ष्मी पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. 
  2. ‘प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रमा’अंतर्गत (पीएमव्हीएलके) वाटप करण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांना करण्यात येणारी आर्थिक मदत यांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
  3. १३ बँकांच्या २२ योजना : अर्थखात्याने दिलेल्या माहितीनुसार वेबपोर्टलवर १३ बँकांनी २२ शैक्षणिक कर्जाच्या योजना देऊ केल्या आहेत. त्यातील स्टेट बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा आणि युनियन आदी बँकांनी एकत्र येऊन नोंदणी करण्यात येणाऱ्या एकाच अर्जावर आपली सेवा उपलब्ध करून दिली आहे.

वैशिष्ट्ये
  • माहिती-तंत्रज्ञानावर आधारित सर्व शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्ज व तत्सम विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या अर्थसहाय्याचे एकसूत्री स्रोत या नात्याने हे संकेतस्थळ पुढे आले आहे.
  • वेगवेगळ्या बँकांकडे कर्जासाठी खेटे घालण्यापेक्षा, विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर उपलब्ध माहिती पडताळून, आवश्यक तितक्या गरजेच्या शैक्षणिक कर्जासाठी अर्ज सादर करता येईल. बँका मग विद्यार्थ्यांच्या अर्जाची दखल घेऊन पुढील प्रक्रिया पार पाडतील. 
  • सध्या जरी १३ बँकांनी त्यांच्या २२ प्रकारच्या शैक्षणिक कर्ज योजनांची माहिती सादर केली असली तरी पुढे जाऊन सर्वच बँका या संकेतस्थळाशी जोडल्या जातील.

खालील माहिती PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

सामाजिक सुरक्षा योजना

खालील माहिती PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
     पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत १०० दिवसात १२.५ कोटी नागरिकांच्या उघडण्यात आलेल्या बँक खात्यांचा म्हणजेच 'जॅम' अर्थात जन धन योजना, आधार आणि मोबाईल या तीन माध्यमांचा उपयोग विविध सरकारी योजनांचे अनुदान थेट लाभार्थ्यांकडे म्हणजेच सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी करण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात केली होती.
     त्यानुसार विविध नव्या योजनांची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. त्यानुसार प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व अटल निवृत्तिवेतन (पेन्शन) योजना या तीनही योजनांचं उद्घाटन ९ मे रोजी देशभरात ११२ ठिकाणी एकाचवेळी करण्यात आले.

सामाजिक सुरक्षा योजना
प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना
  • ही एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी अपघात विमा योजना आहे. दरवर्षी याचे दरवर्षी नुतनीकरण गरजेचे आहे.
  • बँका आणि सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्यांच्या सहयोगाने ही योजना राबविण्यात येणार आहे.
  • १८ ते ७० वयोगटातील सर्व बचत बॅंक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. एका व्यक्तीची अनेक बचत खाती असल्यास कुठल्याही एका बचत खात्यामधून हा विमा उतरवता येईल. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाणार आहे.
  • यासाठी विमा हप्ता प्रतीवर्ष प्रतिव्यक्ती १२ रुपये इतका राहील. विमा हप्ता बॅंक खात्यात परस्पर नावे टाकला जाईल.
  • विमा उतरवणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाईल.
  • योजनेचा कालावधी दरवर्षी १ जून ते ३१ मे असा राहील. योजनेच्या नूतनीकरणाचा अर्ज ३१ मे पर्यंत द्यावा लागणार आहे. पुढील वर्षाच्या योजनेत सहभागी होण्यासाठीचा काळ सरकार सुरुवातीला ३ महिने पर्यंत (३०.११.२०१५) वाढवू शकते.
  • यामध्ये भरपाई मृत्यू झाला तर दोन लाख रुपये वारसांना, दोन्ही डोळे, दोन्ही पाय निकामी अथवा गंभीर दुखापत होऊन कायमचे अपंगत्व आले तर दोन लाख तर एक डोळा, अथवा एक पाय निकामी झाला तर एक लाख रुपये भरपाई मिळणार आहे.
  • विमा धारकाने वय वर्षे ७० पूर्ण केल्यावर, बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी शिल्लक नसल्यास बँक खाते बंद करून विमा संरक्षण संपुष्टात येईल. तांत्रिक अडचणींमुळे संपुष्टात आलेली विमा पॉलिसी अटींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा चालू करता येईल.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
  • एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही आयुर्विमा योजना आहे. या योजनेचे दरवर्षी नूतनीकरण आवश्यक आहे. बँका व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहयोगाने या योजना चालविण्यात येणार आहे.
  • १८ ते ५० वयोगटातील सर्व बचत बॅंक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. एका व्यक्तीची अनेक बचत खाती असल्यास कुठल्याही एका बचत खात्यामधून हा विमा उतरवता येईल. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाणार आहे.
  • योजनेचा कालावधी दरवर्षी १ जून ते ३१ मे असा राहील. योजनेच्या नूतनीकरणाचा अर्ज ३१ मे पर्यंत द्यावा लागणार आहे. पुढील वर्षाच्या योजनेत सहभागी होण्यासाठीचा काळ सरकार सुरुवातीला ३ महिने पर्यंत (३०.११.२०१५) वाढवू शकते.
  • या योजनेत कोणत्याही प्रकारे मृत्यू झाला तर २ लाख रुपये विमा संरक्षण मिळणार आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या विम्याचे संरक्षण राहणार आहे.
  • या योजनेचा विमा हप्ता ३३० रूपये प्रती व्यक्ति, प्रती वर्ष राहणार आहे. विमा हप्ता बॅंक खात्यात परस्पर नावे टाकला जाईल.
  • विमा धारकाने वय ५५ वर्षे पूर्ण केल्यानंतर बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी शिल्लक नसल्यास बँक खाते बंद करून विमा संरक्षण संपुष्टात येणार आहे. काही अटींची पूर्तता केल्यानंतर विमा पॉलिसी पुन्हा चालू करता येणार आहे.

अटल निवृत्तिवेतन (पेन्शन) योजना
  • ही निवृत्तीनंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना १ जून २०१५ पासून सुरू केली जाणार आहे.
  • ही योजना मुख्यतः असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी, ज्यांच्यासाठी कुठलीही पेन्शन योजना उपलब्ध नाही, अशासाठी लाभदायक आहे.
  • बँका व पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या सहयोगाने ही योजना कार्यान्वित होणार आहे.
  • १८ ते ४० वयोगटातील असंघटित क्षेत्रातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील.सहभागी व्यक्तींना ६० वर्षानंतर त्यांनी भरलेल्या रकमेनुसार १००० ते ५००० हजार दरमहा निवृत्तिवेतन दिले जाणार आहे. दर महिन्याचे योगदान बचत खात्यातून परस्पर नावे टाकण्याची सोय आहे.
  • या योजनेत ग्राहकाच्या योगदानाबरोबरच पहिली पाच वर्षे (२०१५-१६ ते २०१९-२०) सरकारचेही योगदान राहणार आहे. हे योगदान ग्राहकाच्या एकूण योगदानाच्या ५० टक्के किंवा एक हजार रूपये यापैंकी जी रक्कम कमी असेल तेवढी असणार आहे.
  • ज्या ग्राहकांसाठी कुठलीही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध नाही आणि जे ग्राहक आयकर दाते नाहीत, अशाच ग्राहकांना हे योगदान मिळणार आहे.
  • ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी किंवा पतीस हे पेन्शन चालू राहील. दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांनी नामांकित केलेल्या व्यक्तीस सर्व जमा रक्कम एक रकमी परत करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात १६ मे रोजी कोल्हापूर, रत्नागिरी, सोलापूर, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती जळगाव या जिल्ह्यांत या योजनांचे उद्‌घाटन संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री करणार आहेत.

किसान विकास पत्र

ठराविक कालावधीत निश्चित आणि चांगला परतावा मिळवून देणाऱ्या योजनांना गुंतवणूकदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशीच काहीशी लोकप्रियता केंद्र सरकारच्या “किसान विकास पत्र” योजनेला मिळाली होती. डिसेंबर २०११ मध्ये बंद झालेल्या या योजनेचे १८ नोव्हेंबर २०१४ रोजी पुनरुज्जीवन करण्यात आले.
योजनेचे स्वरूप
·        “किसान विकास पत्र” हि योजना केंद्र सरकार पुरस्कृत असून या योजनेमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून जमा झालेला निधी केंद्र सरकारच्या विविध विकासकामांमध्ये वापरला जातो.
·        गुंतवणूकदारांना १०००, ५०००, १०००० आणि ५०००० रुपये अथवा त्यापटीत गुंतवणूक करण्याची मुभा आहे. कमाल गुंतवणूक किती असावी यावर मर्यादा नाही.
·        संबंधित गुंतवणुकीची रक्कम १०० महिन्यात (आठ वर्ष चार महिने) दाम दुप्पट होईल.
·        एकदा रक्कम गुंतवल्यावर किमान अडीच वर्षे (३० महिने) ती रक्कम काढता येणार नाही.
·        पहिल्या टप्प्यात योजनेची प्रमाणपत्रे फक्त टपाल खात्याच्या माध्यमातूनच मिळणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात हि योजना सर्व सार्वजनिक बँकांमध्ये उपलब्ध होईल.
योजनेविषयी महत्वाची माहिती
·        योजनेद्वारा जारी करण्यात येणारी प्रमाणपत्रके वैयक्तिक गुंतवणूकदाराच्या अथवा संयुक्त (पती, पत्नी, मुले) गुंतवणूकदारांच्या नावे करता येऊ शकतात. हि प्रमाणपत्रे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका व्यक्तीकडून अनेक व्यक्तींना कितीही वेळेस हस्तांतरित करता येऊ शकतील.
·        प्रमाणपत्रे हस्तांतरित करण्याची सुविधा टपाल कार्यालयांच्या माध्यमातून देशभरातून उपलब्ध करून दिली आहे.
·        बँक अथवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेताना योजनेची प्रमाणपत्रे तारण म्हणून ठेवता येऊ शकतात.
·        सर्वात महत्वाचे म्हणजे, गुंतवणूकदार तीस महिन्याच्या ‘लॉक इन पिरीयड’ नंतर गुंतवलेली रक्कम काढून घेऊ शकतो. तीस महिन्यानंतरही उर्वरित रक्कम दर सहा महिन्यांनी काढण्याची सुविधा मिळणार आहे. 
योजनेत केलेली गुंतवणूक कोणत्याही कर सवलतीस पात्र नाही.