psi pre लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
psi pre लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

चालू घडामोडी - ११-१२ नोव्हेंबर २०१४

kpk

Ø  अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या मध्यम पल्ल्याच्या 'अग्नी-२' या क्षेपणास्त्राची ९ नोव्हेंबर २०१४ रोजी  यशस्वी चाचणी करण्यात आली.

Ø  ओडीशाच्या किनारपट्टीजवळ व्हिलर बेटावरील 'इंटिग्रेटेड टेस्ट रेंज'वर  ही चाचणी घेतली गेली.

Ø  जमिनीवरून जमिनीवर मारा करणा-या या क्षेपणास्त्राचा पल्ला सुमारे २००० किमी. एवढा आहे.

Ø  DRDO ने विकसित केलेल्या अग्नी-२ या क्षेपणास्त्राची उंची २० मीटर असून त्याचे वजन १७ टन आहे.

Ø  क्षेपणास्त्र व त्यांचा पल्ला : अग्नी-१ (७००किमी) / अग्नी-२ (२०००किमी) / अग्नी-३ (३०००किमी) / अग्नी-४ (४०००किमी) / अग्नी-५ (५०००किमी)

Ø  जर्मनीचे दोन भाग पाडणारी बर्लिन येथील भिंत पाडल्याला रविवारी ९ नोव्हेंबर २०१४ रोजी २५ वर्षे पूर्ण झाली.

Ø  यानिमित्त गुगलने विशेष डूडल तयार केले.

Ø  डूडलच्या स्वरुपात एक मिनिटांपेक्षा अधिक अवधीची चित्रफित तयार करून ते जगभर प्रकाशित करण्यात आले.

Ø  मॉर्गन स्टिफ यांनी या चित्रफितीचे संपादन केले आहे.

Ø  आयपीओप्रकरणी फसवणूक केल्याबाबत दोषी आढळलेल्या डीएलएफवर भांडवली बाजार नियामक सेबीने तीन वर्षाची बंदी घातली होती.

Ø  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गंगेच्या अस्सी घाटावर साफसफाई करत काशीवासीयांना स्वच्छतेचा संदेश दिला.

Ø  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, क्रिकेटपटू महंमद कैफ, सुरेश रैना, भोजपुरी कलाकार मनोज तिवारी, गायक कैलाश खेर, चित्रकूट अपंग विद्यापीठाचे कुलगुरू स्वामी राम भद्राचार्य, लेखक मनू शर्मा, पद्मश्री देवीप्रसाद द्विवेदी, दूरदर्शनचे कलाकार राजू श्रीवास्तव या नऊ जणांची स्वच्छता मोहिमेसाठी मोदींनी निवड केली.

Ø  केंद्रीय मंत्रिमंडळातील महिला मंत्र्यांची संख्या आता ८ झाली आहे. त्यापैकी ६ कॅबिनेट मंत्री आहेत.

Ø  सुषमा स्वराज, नजमा हेपतुल्ला, उमा भारती, मनेका गांधी, स्मृती इराणी, हरसीम्रत कौर-बादल

Ø  २ राज्यमंत्री आहेत -निर्मला सीतारामन, निरंजन ज्योती

Ø  विशेष म्हणजे मंत्रिमंडळातील सर्वात तरुण (स्मृती इराणी) आणि सर्वात वृध्द (नजमा हेपतुल्ला) मंत्रीही महिलाच आहेत.

Ø  फॉर्च्यून मासिकाने इंडियाने देशातील शक्तिशाली ५० व्यावसायिक महिलांची यादी तयार केली आहे.  त्यात भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य अग्रस्थानी तर खासगी बँक आयसीआयसीआयच्या एमडी आणि सीईओ चंदा कोचर दुस-या आणि अॅक्सिस बँकेच्या एमडी तथा सीईओ शिखा शर्मा तिस-या स्थानावर आहेत.

Ø  टॉप १० मधील इतर

4.    निशी वासुदेवा, सीएमडी, एचसीएल

5.    जिया मोदी, सहसंस्थापक, एजेडबी पार्टनर्स

6.    मल्लिका श्रीनिवासन, सीईओ टीएएफई

7.    अरुणा जयंती, सीईओ, कॅपजेमिनी, इंडिया

8.    पृथा रेड्डी, एमडी, अपोलो हॉस्पिटल

9.    किरण मुजुमदार, सीएमडी, बायोकॉन

10. शोभना भारतीया, प्रमुख, एचटी, मीडिया

Ø  फॉर्च्यून जागतिक स्तरावरील तयार केलेल्या प्रभावी महिलांच्या यादीत फक्त इंद्रा नुयी या एकमेव भारतीय महिलेचा समावेश आहे.

Ø  जागतिक स्तरावरील यादीत जगातील टॉप ५

1.    गिनी रोमेटी, प्रमुख व सीईओ, आयबीएम

2.    मेरी बारा, सीईओ, जनरल मोटर्स

3.    इंद्रा नुयी, चेअरपर्सन व सीईओ, पेप्सिको

4.    मेरिलिन ह्यूसन, चेअरपर्सन व सीईओ लॉकहीड मार्टिन

5.    अॅलन कुलमन, चेअरपर्सन व सीईओ ड्यूपोंट

Ø  ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, ऐझवाल येथील डॉ. संगथनकिमा आणि नेपाळमधील सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा कोईराला यांच्यासह दहा जणांना 'हार्मनी फाऊंडेशन'तर्फे सामाजिक न्यायासाठीचा प्रतिष्ठेचा मदर तेरेसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

Ø  आमटे दाम्पत्य लोकबिरादारी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींच्या विकासासाठी कार्यरत आहे.

Ø  अनुराधा कोईराला यांनी आतापर्यंत मानवी तस्करीच्या जाळ्यातून १२ हजारांहून अधिक महिलांची सुटका केली आहे

Ø  डॉ. संगथनकिमा यांनी ईशान्य भारतामध्ये व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न केले आहेत.

Ø  छत्तीसगढची राजधानी रायपूरमध्‍ये स्वच्‍छ भारत अभियान चे तयार करण्यात आलेले  एक भव्‍य दिव्‍य पोस्‍टर  थेट 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये नोडवले गेले.

Ø  २५० फुट उंचीचे पोस्‍टर तयार करण्‍यासाठी १२० कामगारांनी ३० दिवस सतत काम केल्‍यानंतर हे पोस्‍टर पूर्ण झाले.

Ø  जगातील सर्वात मोठ्या पोस्‍टरवर भारताच्‍या सर्व पंतप्रधानांचे फोटो देण्‍यात आली आहेत.

Ø  या आगोदर अमेरिकेत बॉसचित्रपटाचे सर्वात मोठे पोस्‍टर तयार करण्‍यात आले होते. ३४ हजार वर्गफुट क्षेत्रफळाचे हे पोस्‍टर होते.

 


चालू घडामोडी - १० नोव्हेंबर २०१४

  • केंद्रातील भाजप सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला असून २१ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे आता मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या ६६ झाली. 
    • मनोहर पर्रीकर - संरक्षण मंत्री 
    • सुरेश प्रभू - रेल्वे मंत्री 
    • जगत प्रकाश नड्डा - आरोग्य मंत्री 
    • बिरंदर सिंग - ग्रामविकास मंत्री 
  • श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या  वनडे सामन्यात ५३ धावा करून विराट कोहलीने सर्वाधिक जलद ६००० धावांचा टप्पा पार करण्याचा  केला. याआधी हा विक्रम व्हिव्हियन रिचर्डस (वेस्ट इंडीज) यांच्या नावावर होता. 
  • फॉर्च्युन मासिकाने भारतातील उद्योग क्षेत्रातील सर्वाधिक प्रभावशाली महिला म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांची निवड केली. 
  • स्टेट बँक, HDFC बँक आणि Axis बँक या तीन बँकांनी एटीएमच्या मोफत वापरावर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आहे. 
    • त्यानुसार सहा महानगरातील (मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, बेंगळूरू, हैद्राबाद) ग्राहकांना आपल्याच बँकेच्या एटीएमवरून दरमहा पाच तर अन्य बँकांच्या एटीएमवरून तीन व्यवहार मोफत करता येतील. 
    • त्यानंतरच्या प्रत्येक कॅश ट्रांझॅक्शनसाठी २० रुपये तर नॉन कॅश ट्रांझॅक्शनसाठी ८.५ रु. (HDFC  बँक)/ ९ रु. (स्टेट बँक) /९.५ रु (Axis बँक) आकारण्यात येतील.  
         

चालू घडामोडी - ९ नोव्हेंबर २०१४

  • मनोहर पर्रीकर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश निश्चित झाल्यावर रिक्त झालेल्या गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी लक्ष्मीकांत पार्सेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी ते गोव्याचे आरोग्यमंत्री होते.
  • भारताचा ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद व नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांच्यामध्ये बुद्धिबळ विश्वविजेतेपदासाठी सोची (रशिया) येथे लढत सुरू झाली. त्या दोघांमध्ये एकूण १२ लढती होणार आहेत. 
  • नावाजलेले स्त्रीरोगतज्ञ आर.पी.सोनवाला यांना "धन्वंतरी पुरस्काराने" गौरविण्यात आले.    

चालू घडामोडी - ८ नोव्हेंबर २०१४

  • 'मी सिंधुताई सपकाळ', 'पाउलवाट', 'सुखांत' या चित्रपटातून लक्षवेधी भूमिका करणाऱ्या ज्योती चांदेकर यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेने जीवनगौरव पुरस्काराने गौरविले.
  • तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला. 
  • संसद ग्राम योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणसी या लोकसभा मतदार संघातील जयापूर हे गाव दत्तक घेतले. 
  • अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी आपल्या २००९-२०१३ या चार वर्षाच्या परराष्ट्र मंत्रिपदाच्या कारकिर्दीतील आठवणी "हार्ड चॉइसेस" या त्यांच्या नव्या पुस्तकात सांगितल्या आहेत.

चालू घडामोडी - ७ नोव्हेंबर २०१४

  • नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा सल्लागार समितीने जाहीर केलेल्या अहवालात प्राथमिक ते शालांत परीक्षेपर्यंत मराठी अनिवार्य करण्यात यावी अशी शिफारस केली. 
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून प्रवीण दराडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर प्रवीण परदेशी (वन विभाग प्रधान सचिव) आणि मिलिंद म्हैसकर (मदत व पुनर्वसन विभाग प्रधान सचिव) यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. 
  • बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी मुख्यमंत्री कार्यालयात त्यांचे जावई देवेंद्रकुमार यांची स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्ती करून नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. 
  • राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी दिल्ली विधानसभा बरखास्त केली असून फेब्रुवारी २०१५ मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होतील. 
  • अमेरिकेतील निवडणुकीमध्ये सिनेटच्या १०० जागांपैकी ५२ जागा रिपब्लिकन तर ४३ जागा डेमोक्रॅटिक पक्षाने जिंकल्या. पूर्वीच्या सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाकडे ४५ तर डेमोक्रॅटिक पक्षाकडे ५३ जागा होत्या. 
    • डेमोक्रॅटिक पक्षाच्या तुलसी गॅब्बर्ड "हवाई" येथून दुसऱ्यांदा विजयी झाल्या. अमेरिकी काँग्रेसमधील त्या एकमेव हिंदू सदस्या आहेत. 
    • भारतीय वंशाच्या निकी हॅले दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या. 
  • अमेरिका उपखंडातील कॅलिफोर्निया ते वॉशिंग्टन दरम्यान घेतल्या जाणाऱ्या 'रॅम' या सायकलिंग रेसमध्ये सहभागी होण्यासाठी नाशिकचे डॉ. महेंद्र आणि हितेंद्र महाजन या बंधूंची निवड झाली आहे. ४८०० किलोमीटरची हि स्पर्धा १२ दिवसात पूर्ण करावी लागते. 

चालू घडामोडी - ६ नोव्हेंबर २०१४

  • अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांच्या हस्ते 'विष्णुदास भावे पुरस्कार’ डॉ. जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात आला. 
  • भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीने वर्षातील सर्वोत्तम बारा क्रिकेटपटूंचा कसोटी आणि वनडे संघ जाहीर केला आहे. कसोटी संघाचे नेतृत्व श्रीलंकेच्या अँजलो मॅथ्यूजकडे आणि वनडे संघाचे नेतृत्व सलग पाचव्यांदा भारताच्या महेंद्रसिंग धोनीकडे देण्यात आले आहे. महेंद्रसिंग धोनीची आठव्यांदा वनडे संघात (सलग सातव्यांदा) निवड झाली. 
  • शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये १९७८ ते १९८० या काळात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेल्या सुंदरराव सोळंके यांचे  नुकतेच निधन झाले आहे. 
  • ICC  पीपल्स चॉइस पुरस्कार २०१४ - भुवनेश्वर कुमार 
  • फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वात प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ व्या स्थानावर आहेत. जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती रशिचाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन प्रथम स्थानावर आहेत.  
  • आसाराम बापू समर्थक दिल्ली विधानसभेची निवडणूक ओजस्वी पार्टी या पक्षाकडून लढवित आहेत.या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण साई आहेत. 
  • दूरसंचार विभागाची मान्यता मिळण्यात अडचणी येत असल्यामुळे ‘एअरटेल’ने लूप मोबाइलशी केलेला ७०० कोटींचा करार रद्द केला आहे. 
  • सचिन तेंडूलकरचे आत्मचरित्र "प्लेईंग इट माय वे" या पुस्तकाचे प्रकाशन रमाकांत आचरेकर यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाचे सचिनचे सहलेखक स्पोर्टस जर्नलिस्ट बोरिया मुजुमदार आहेत. 
  • १३ नोव्हेबर पासून जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धा दक्षिण कोरियातील जेजू येथे सुरु होणार आहे. भारतीय महिला संघातील अविवाहित खेळाडूंची गर्भधारणा चाचणी (प्रेग्नन्सी टेस्ट) केल्यामुळे हि स्पर्धा चर्चेत आहे. 
  • विधानसभेतील जेष्ठ सदस्य गणपतराव देशमुख (शेकाप) यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे जेष्ठ आमदार जीवा पांडू गावित नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील. 

चालू घडामोडी - ५ नोव्हेंबर २०१४

  • IPL-६ दरम्यान झालेल्या बेटिंग व  स्पॉटफिक्सिंगबाबत एन. श्रीनिवासन व अन्य १२ क्रिकेटपटूविरोधात न्या. मुकुल मृदगल समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला. 
    • ICC चे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्याविरोधात पुरावा नसल्यामुळे त्यांना क्लिनचिट देण्यात आली. 
    • श्रीनिवासान यांचे जावई व चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे माजी प्रमुख गुरुनाथ मय्यपन यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. 
  • कॅलिफोर्नियाच्या ब्रिटनी मेनार्ड या २९ वर्षीय महिलेने इच्छामरण पत्करले. 
    • तिला ग्लिओब्लास्टोमा हा चौथ्या स्टेजचा ब्रेन कॅन्सर होता. 
    • कॅलिफोर्नियामध्ये इच्छामरणाला परवानगी नसल्यामुळे तिने ओरेगॉनमधील पोर्टलँडला स्थानांतर केले आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिल्या गेलेल्या विशिष्ट मात्रेच्या प्रमाणित औषधांच्या माध्यमातून तिने मरण पत्करले.  
  • इंडिया कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्सच्या अध्यक्षपदी लोकेश चंद्रा यांची निवड करण्यात आली. 
  • केंद्रीय अर्थसचिव म्हणून राजीव महर्षी यांची नियुक्ती. 
  • मराठी रंगभूमी दिन : ५ नोव्हेंबर 

चालू घडामोडी - ४ नोव्हेंबर २०१४

  • भारत जपान संबंधांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मनमोहन सिंग यांना "द ग्रँड कॉर्डोन ऑफ द पौलोवनिया फ्लॉवर्स" या जपानच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. 
  • फ्रान्समध्ये "सीवायडी-टिडिव्ही" (CYD-TDV) या डेंग्यूच्या पहिल्या लसीची यशस्वी चाचणी करण्यात आली असून ती वर्षाअखेरीस भारतात उपलब्ध होइल. ही लस सॅनोफी पाश्चर कंपनीने तयार केली आहे.
  • पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धकसोटी मालिका २-० अशी जिंकून ICC रॅंकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. 
    • ICC रॅंकिंग :
      1. दक्षिण आफ्रिका (१२४ गुण)
      2. ऑस्ट्रलिया (११७ गुण)
      3. पाकिस्तान (१०५ गुण)
      4. इंग्लंड (१०४ गुण)
      5. श्रीलंका (१०१ गुण)
      6. भारत (९६ गुण)
  • आर्थिक विकासदर निर्देशांकासाठी २०११-२०१२ हे नवीन आधारभूत वर्ष मानले जाणार आहे. यापूर्वी २००४-२००५ हे आधारभूत वर्ष होते. 
  • किरकोळ व्यापारातील निर्देशांक (CPI), घाऊक बाजारातील निर्देशांक (WPI), औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक (IIP) यासाठी २०१४-२०१५ हे आधारभूत वर्ष मे २०१६ पासून लागू करण्यात येणार आहे. यापूर्वी २००४-२००५ हे आधारभूत वर्ष होते.
  • माजी केंद्रीय मंत्री जी. के. वासन यांना काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले. 
    • काँग्रेसमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपामुळे हि कारवाई करण्यात आली. 
    • तामिळनाडूमध्ये तमिळ मनिला काँग्रेसची स्थापना करण्याचे वासन यांचे प्रयत्न चालू आहेत. 
    • पिता जी. के. मुपनार  यांनी स्थापन केलेल्या तमिळ मनिला काँग्रेसचे १४ वर्षांनंतर पुनरुज्जीवन करण्यासाठी वासन सज्ज झाले आहेत. 

चालू घडामोडी - २ नोव्हेंबर २०१४

  • अंतराळ पर्यटनासाठी तयार करण्यात आलेल्या 'व्हर्जिन गॅलेक्टिक' या अंतराळयानाचा स्फोट कॅलिफोर्निया येथे झाला. 
    • व्हर्जिन विमानवाहतूक कंपनीचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी हि महत्वकांक्षी योजना आखली आहे. 
  • कर्नाटक राज्योत्सव दिनाचे औचित्य साधून राजधानी बंगळूरसह राज्यातील १२ शहरांचे कन्नड नामांतर कर्नाटक राज्य सरकारने केले. 
    • बेळगावमधील मराठी भाषिक नागरिकांनी हा दिवस 'काळा दिन' म्हणून पाळून कर्नाटक सरकारचा निषेध केला. 
    • नावे बदलण्यात आलेली १२ शहरे १. बेळगाव (बेळगावी), २. म्हैसूर (म्हैसुरु), ३. बंगलोर (बंगळूरू), ४. गुलबर्गा (कलबुर्गी), ५. विजापूर (विजयपुरा), ६. शिमोगा (शिवमोग्गा), ७. होसपेट (होसपेटे), ८. हुबळी (हुब्बळळी), ९. तुमकुर (तुमकुरु), १०. चिकमंगळूर (चिक्कमंगळुरू), ११. मंगळूर (मंगळूरू) १२. वेल्लारी (बळळारी)
  • १४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांची १२५वी जयंती साजरी करण्यात आहे. 
    • त्यानिमित्त १४ ते १९ नोव्हेंबर याकाळात देशातील सर्व शाळांमध्ये "बाल स्वच्छता मिशन" राबविण्यात येणार आहे. 
    • तसेच हे वर्ष "बाल स्वच्छता वर्ष" म्हणून साजरे करण्यात येणार आहे. 
  • दौरा अर्धवट सोडून जाणाऱ्या वेस्ट इंडीज संघामुळे BCCI ने वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाकडून २५० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.