| 
·       
  २१
  जानेवारी १९७२
  : मणिपूर व
  मेघालय या
  राज्यांना
  स्वतंत्र
  राज्याचा
  दर्जा
  मिळाला. | 
| 
·       
  विधानसभेसाठी
  तिकीट
  नाकारले
  म्हणून
  नाराज झालेले
  काँग्रेसच्या
  टेक्नोसॅव्ही
  कार्यकर्ता संजय पुरी
  यांनी
  पक्षाच्या
  दिल्ली  विभागाची
  वेबसाइट आणि
  ऑनलाइन
  मुखपत्र
  संदेशचे
  पोर्टल बंद करुन
  पक्ष सोडला. 
·       
  संजय
  पुरी मागील
  ३०
  वर्षापासून
  काँग्रेससाठी
  काम करत आहेत.
  टेक्नोसॅव्ही
  असल्यामुळे
  पक्षाने
  डिजिटल
  प्रचाराची
  जबाबदारी
  त्यांच्याकडे
  दिली होती. 
·       
  संजय
  पुरी
  यांच्या
  बंडामुळे
  दिल्ली
  काँग्रेसची http://dpcc.co.in ही वेबसाइट
  आणि http://congresssandesh.com हे
  पोर्टल २०
  जानेवारी संध्याकाळपासून
  बंद आहे. | 
| 
·       
  बेळगावमध्ये
  होणाऱ्या
  ९५व्या
  अखिल भारतीय
  मराठी नाट्य
  संमेलनाचा कार्यक्रम
  जाहीर झाला आहे.  
·       
  संमेलनाचे
  उद्घाटन
  ७
  फेब्रुवारीला
  राष्ट्रवादी
  काँग्रेसचे
  अध्यक्ष शरद
  पवार
  यांच्या
  हस्ते होणार आहे.  
·       
  संमेलनस्थळाला
  बाळासाहेब
  ठाकरे नगरी
  असे नाव देण्यात
  येणार आहे, तर
  संमेलनाच्या
  मुख्य
  मंचाला
  स्मिता
  तळवलकर यांचे नाव
  देण्यात
  येणार आहे. | 
| 
·       
  २६
  जानेवारीला
  राजपथावरील प्रजासत्ताक
  दिनाच्या
  संचलनामध्ये
  प्रथमच
  तिन्ही सेना दलांमधील
  महिलांचे
  स्वतंत्र
  पथक सहभागी. | 
| 
·       
  स्विस
  रिसॉर्टने
  सन २०१५ साठी
  जगातील
  सर्वांत
  विश्वासू व
  जबाबदार
  असणाऱ्या २७
  देशांचे सर्वेक्षण केले आहे. 
·       
  यामध्ये
  भारताने
  दुसऱ्या
  क्रमांकावर
  झेप घेतली आहे. यूएई, भारत, चीन
  व नेदरलॅन्ड
  असे पहिले
  चार
  विश्वासू
  देश आहेत.
  यानंतर जपान, रशिया,
  हॉंगकॉंग, दक्षिण
  आफ्रिका व
  इटली, ब्राझील,
  मलेशिया, फ्रान्स
  व अमेरिकेचा
  क्रमांक
  लागतो.  
·       
  सर्वेक्षणादरम्यान
  सरकार, व्यवसाय,
  प्रसारमाध्यमे
  व सामाजिक
  संस्थांचा
  अभ्यास
  करण्यात आला. 
·       
  भारताने
  १०० पैकी ७९
  क्के गुण
  मिळवून
  दुस-या
  क्रमांक
  पटकावला.
  मागील वर्षी
  भारत या
  यादीमध्ये
  पाचव्या क्रमांकावर
  होता. | 
| 
·       
  देशातील
  प्रत्येक
  कुटुंबाला
  बँकेची सेवा
  मिळावा या
  हेतूने
  केंद्र
  सरकारने
  सुरू केलेल्या
  जनधन
  योजनेला
  प्रचंड
  प्रतिसाद
  मिळाला असून
  आत्तापर्यंत
  ११.५
  कोटी बँक
  खाती
  उघडण्यात
  आली आहेत.
   
·       
  दहा
  कोटींचे
  टार्गेटही
  बँकांनी पार  केले असून
  देशातील
  ९९.७४ टक्के
  कुटुंबे
  म्हणजे जवळजवळ
  अवघा भारत
  बँकांशी
  जोडला गेला
  आहे. 
·       
  जनधन
  खात्यात ९
  हजार कोटी
  रुपये जमा
  झालेले असून या
  उपक्रमाची
  गिनीज बुक ऑफ
  वर्ल्ड
  रेकॉर्डनेही
  दखल घेतली
  आहे.  
·       
  गेल्या
  वर्षी
  स्वातंत्र्य
  दिनी
  पंतप्रधान नरेंद्र
  मोदी यांनी
  जनधन
  योजनेची
  घोषणा केली.२६
  जानेवारीपर्यंत
  साडेसात
  कोटी खाती
  उघडण्याचे
  टार्गेट
  सार्वजनिक
  बँकांना
  देण्यात आले.
  हे टार्गेट
  नंतर दहा
  कोटींपर्यंत
  वाढवण्यात
  आले. 
·       
  सामाजिक
  सुरक्षा
  योजनांचे
  पैसे या
  खात्यात जमा
  होतील त्यामुळे खात्याचा
  वापर होत
  राहील. | 
चालू घडामोडी - २१ जानेवारी २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा