चालू घडामोडी : ११ व १२ फेब्रुवारी
महाराष्ट्राचे विकास साठ्ये यांना ऑस्कर पुरस्कार
- व्यवसायाने अभियंता असलेल्या महाराष्ट्रीयन विकास साठ्ये यांना सायन्स अँड टेक्नॉलॉजी गटातील २०१८चा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
- कुठल्याही हवाई वाहनातून थेट खाली कॅमेरा रोखून चित्रण करता येईल अशी शॉटओव्हर के १ कॅमेरा सिस्टीम तयार करणाऱ्या चमूत त्यांचा समावेश होता. ही यंत्रणा म्हणजे ६ अक्ष असलेला हवाई कॅमेरा स्थिर ठेवू शकणारा स्टँड आहे.
- साठ्ये यांच्यासोबत या सिस्टीमवर काम करणारे जॉन कॉयल, ब्रॅड हर्नडेल आणि शेन बकहॅम या तिघांचीही ऑस्कर पुरस्कारासाठी निवड केली.
- साठ्ये यांचा जन्म १९६७मध्ये पुण्यात झाला. पुण्याच्या व्हीआयटी संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स विषयात बीई पदवी घेतली.
- १९९९ मध्ये त्यांनी टाटा हनीवेल कंपनीत काम केले. तेथून ते न्यूझीलंडला गेले व शॉटओव्हर कॅमेरा सिस्टीमवर काम केले.
- साठ्ये यांनी न्यूझीलंडमधील क्वीन्सटाऊन येथे शॉटओव्हर कॅमेरा सिस्टीम्स या कंपनीत २००९मध्ये काम सुरू केले. तेथेच त्यांनी या स्टँडच्या निर्मितीची कल्पना प्रत्यक्षात आणली होती.
- त्यांचे हे तंत्रज्ञान वॉर फॉर द प्लॅनेट ऑफ द एप्स, द फेट ऑफ दि फ्युरियस, पायरेट्स ऑफ द कॅरेबियन: डेड मेन टेल नो टेल्स, स्पायडरमॅन: होमकमिंग, ट्रान्सफॉर्मर्स : द लास्ट नाइट या प्रसिध्द चित्रपटांमध्ये वापरले गेले आहे.
राज्य शासनच्या शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा
- क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रोईंगपटू दत्तू भोकनळ, हॉकीपटू युवराज वाल्मिकी व देवेंद्र वाल्मिकी, कबड्डीपटू नितीन मदने, अभिलाषा म्हात्रे यांसारख्या १००हून अधिक खेळाडूंना राज्य शासनच्या शिवछत्रपती पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
- महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी २०१४-२०१७ वर्षासाठी शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा केली आहे.
- यंदाच्या शिवछत्रपती पुरस्कारासाठी किमान ३ राष्ट्रीय स्पर्धा खेळणे गरजेचे हा निकष ठेवण्यात आला होता.
- याचसोबत यंदा निकषांव्यतिरीक्त क्रीडा मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या काही खेळाडूंना थेट पुरस्काराची घोषणा केली.
- शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी
- बुद्धीबळ : ग्रॅण्डमास्टर अक्षयराज कोरे, विदित गुजराथी
- लॉन टेनिस : प्रार्थना ठोंबरे
- जलतरण : मंदार आनंदराव दिवसे
- हॉकी : युवराज वाल्मिकी, देवेंद्र वाल्मिकी
- कबड्डी : नितीन मदने, अभिलाषा म्हात्रे, किशोरी शिंदे
- वेटलिफ्टिंग : ओंकार ओतारी, गणेश माळी
- एव्हरेस्टवीर : आशिष माने
- क्रिकेट : रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे
- जलतरण : सौरभ सांगवेकर
- बॅडमिंटन : अक्षय देवलकर
- ॲथलेटिक्स : ललिता बाबर
- रोईंग- दत्तू भोकनळ
- मार्गदर्शक : प्रविण आमरे
- खाडी व समुद्र पोहणे : रोहन मोरे
- दिव्यांग खेळाडू : सुयश जाधव
मराठवाडा व विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा
- मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांना ११ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला.
- अचानक झालेल्या गारपिटीमुळे कांदा, गहू आणि हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात आला आहे.
- गारपीट व अवकाळी पाऊस यामुळे भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे ३०० पोपटांचा तर काटोलमध्ये ६४ बगळ्यांचा मृत्यूही झाला आहे.
- गेल्या तीन ते चार दिवसांपासून या भागात ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता.
- विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम तसेच मराठवाड्यातील बीड, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली व उत्तर महाराष्ट्रातील जळगाव या ११ जिल्ह्यांना गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे.
- अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर झाली आहे.
- कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचे सांगितले. शेतपीकाच्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.
- पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त रक्कम मिळेल. त्याचप्रमाणे पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांनाही मदत दिली जाईल.
- कुठल्या पीकाला किती रक्कम
- ज्वारी, मका, गहू पिकांसाठी : प्रतिहेक्टर ६,८०० रुपये.
- सिंचनातील जमिनीसाठी : प्रतिहेक्टर १३,५०० रुपये.
- मोसंबी, संत्र : प्रतिहेक्टर २३,३०० रुपये.
- आंबा : प्रतिहेक्टर ३६,७०० रुपये.
- केळी : प्रतिहेक्टर ४०,००० रुपये.
- लिंबू : प्रतिहेक्टर २०,००० रुपये.
- हरभरा, सुर्यफूल : प्रतिहेक्टर ६,८०० रुपये.
- पीकविमा न काढलेल्यांना : प्रतिहेक्टर १८,००० रुपये.
पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्या आसमा जहांगीर यांचे निधन
- पाकिस्तानमधील प्रसिद्ध महिला वकिल आणि मानवाधिकार कार्यकर्त्या आसमा जहांगीर यांचे ११ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले.
- जहांगीर या कर्करोगाने त्रस्त होत्या. अनेक वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना आजारी पडल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
- आसमा जहांगीर या ‘जहांगीर ह्यूमन राईट्स ऑफ कमिशन’च्या सहसंस्थापक होत्या. २०१० ते २०१२ मध्ये त्या पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षही होत्या.
- त्यांचा जन्म १९५२मध्ये लाहोर येथे झाला होता. १९८७ ते २०११पर्यंत त्या पाकिस्तान मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाही होत्या.
- किनार्ड कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली होती. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९७८ मध्ये कायद्याची पदवी मिळवली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा