चालू घडामोडी : २३ फेब्रुवारी

जगप्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी के गोयल यांचे निधन

  • प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी के गोयल यांचे २० फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले.
  • सर्वसामान्य तसेच गरजू रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती.
  • हृदयविकारशास्त्रातील प्रगाढ अभ्यास आणि अनुभवामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून गोयल यांच्याकडे रुग्णांचा ओघ असे.
 डॉ. बी के गोयल यांच्याबद्दल 
  • जयपूरला १९३६साली जन्मलेले डॉ. बी के गोयल हे एक जगप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ होते.
  • डॉ. गोयल हे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख होते.
  • तसेच त्यांनी जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल आणि मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये कार्डियोलॉजीचे डायरेक्टर-प्रोफेसर म्हणूनही काम केले.
  • टेक्सास हार्ट इन्स्टिटय़ूट व न्यू ऑर्लिन्स येथील ओशनर हार्ट इन्स्टिटय़ूट या संस्थांमध्ये ते सल्लागार शल्यविशारद होते.
  • खान अब्दुल गफार खान म्हणजे सरहद्द गांधी यांच्यावरील शस्त्रक्रियेमुळे गोयल यांचे नाव सर्वतोमुखी झाले.
  • १९९०मध्ये तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल केले होते तेव्हा त्यांच्यावर उपचारासाठी गोयल यांना पाचारण करण्यात आले होते.
  • गोयल यांनी भारतातील पहिले इंटेन्सिव्ह केअर युनिट आणि मोबाइल कोरोनरी केअर युनिट स्थापन केले.
  • त्यांचे ‘हार्ट टॉक’ हे पुस्तक अनेक भाषांत प्रसारित झाले. १९८०मध्ये वयाच्या ३९व्या वर्षी ते मुंबईचे नगरपाल (शेरीफ)होते.
  • अवघ्या २९व्या वर्षी जे जे रुग्णालयातील हृदयरोग विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. याशिवाय अनेक रुग्णालयांत हृदयरोगतज्ज्ञ म्हणून त्यांनी काम केले.
  • ह्युस्टनस्थित टेक्सास हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये ते हृदयरोगतज्ज्ञ सल्लागार होते तसेच भारतीय सैन्यदलाच्या विभागाचेही ते हृदयरोगतज्ज्ञ सल्लागार होते.
  • महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या वैद्यकीय सल्लागार चमूमध्येही त्यांचा सहभाग होता. मुंबईतील हाफकिन संस्थेच्या अध्यक्षपदाचा त्यांनी १४ वर्षे कार्यभार सांभाळला.
  • देशातील पल्स पोलिओ अभियान, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, इंडो अमेरिकन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी, हार्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया, इंडियन कॉलेज ऑफ कार्डिओलॅजी, धन्वंतरी फाऊंडेशन येथेही त्यांनी भरीव काम केले.
  • मेडीकल कौन्सिल ऑफ इंडियाने गोयल यांची जुलै २००७मध्ये उपराष्ट्रपती पदासाठी आणि मार्च २०१२मध्ये राष्ट्रपती पदासाठी शिफारस केली होती.
  • वैद्यकीय क्षेत्रातील मौल्यवान योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री (१९८४), पद्मभूषण (१९९०), पद्मविभूषण (२००५) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
  • गोयल यांनी पन्नासहून अधिक वर्षे वैद्यकीय सेवा केली. यात त्यांनी गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता निस्पृह भावनेने रुग्णसेवा केली.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारत दौऱ्यावर

  • कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे त्यांच्या भारत दौऱ्यात २३ फेब्रुवारी रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
  • यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सहा करार झाले.
  • कॅनडाशी सहकार्य वाढवण्यावर भारत भर देत असून दोन्ही देशांमधील संबंध हे लोकशाही, सर्वश्रेष्ठ कायदा यावर आधारित आहे, असे मोदींनी नमूद केले.
  • भारतातून उच्च शिक्षणासाठी कॅनडात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे भारताने कॅनडाशी उच्च शिक्षणासाठी करार केला आहे.
  • कॅनडा सुपरपॉवर असून उर्जाक्षेत्रात भारताला कॅनडाची गरज असल्याचे मोदींनी नमूद केले.

कृष्णा लाल कोहली पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या दलित महिला

  • पाकिस्तानमध्ये कृष्णा लाल कोहली पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहाची (सिनेट) निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या दलित महिला ठरल्या आहेत.
  • किशू बाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोहली यांना सिनेटसाठी पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
  • कृष्णा यांचे बंधू वीरजी कोहली यांची अपक्ष उमेदवार म्हणून बेरानोच्या युनियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.
  • ते कृष्णा यांची साथ देत आहेत. त्यामुळे जर वीरजी सिनेटर पदी नियुक्त झाले तर, अल्पसंख्याक हिंदू समाज आणि ग्रामीण सिंध प्रांतातून पाकिस्तानच्या संसदेत पोहोचणाऱ्या आणि राजकीय सूत्र हातात घेणाऱ्या कृष्णा या पहिल्या महिला ठरणार आहेत.
  • मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या कृष्णा यांचा जन्म १९७९मध्ये सिंध प्रांताजवळ असणाऱ्या नगरपारकर येथे झाला होता.
  • त्या पाकिस्तानातील ‘कोहली’ या हिंदू अल्पसंख्यांक समुदायातून आल्या आहेत. पाकिस्तानातील महिलांचे आणि अल्पसंख्यांकांचे सबलीकरण हे त्यांचे ध्येय आहे.
  • त्यांचे कुटुंबिय सुरुवातीच्या काळात बंधुआ मजूर म्हणून काम करत होते. त्यामुळे इयत्ता तिसरीत असल्यापासून त्यांनाही मजूरी करावी लागली होती.
  • वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी सिंध कृषी विद्यापीठात शिकणाऱ्या लाल चंद यांच्याशी विवाह केला होता.
  • लग्नानंतर त्यांनी सिंध विद्यापीठातून समाजशास्त्र या विषयातील पदवी घेतली. कुटुंब आणि पतीने दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांनी पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले.
  • २००५पासून त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २००७मध्ये इस्लामाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मेहेरगढ ह्युमन राइट्स युथ लिडरशिप ट्रेनिंग कॅम्प’साठी त्यांनी निवड झाली होती.
  • कामाच्या ठाकाणी होणारे लैंगिक शोषण, महिलांचे मुलभूत हक्क आणि बंधुआ मजूर यांच्याविषयी काही महत्त्वाची पावले उचलण्यात आणि त्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामांमध्ये हातभार लावण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
  • पाकिस्तानच्या युथ सिविल अॅक्शन प्रोग्राममध्येही त्यांनी आपले योगदान दिले आहे.

भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारताला ८१वे स्थान

  • ट्रान्सपरंसी इंटरनॅशनल संस्थेनी प्रसिद्ध केलेल्या जागतिक भ्रष्टाचार आकलन निर्देशांक २०१७ या अहवालानुसार भ्रष्टाचारी देशांच्या यादीत ४० गुणासह भारताने ८१वे स्थान मिळविले आहे.
  • २०१६मध्ये भारत एकूण १७६ देशांमध्ये ७९व्या (गुण ४०) क्रमांकावर होता. तर २०१५मध्ये भारत या यादीत ३८व्या क्रमांकावर होता.
  • यावर्षी या यादीत एकूण १८० देशांना त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचाराच्या पातळीनुसार क्रमीत करण्यात आले आहे.
  • हा निर्देशांक ० ते १०० गुणांमध्ये देशांना मापतो. निर्देशकानुसार ० गुण हे अति भ्रष्टाचाराचे तर १०० गुण स्वछ व्यवस्थेचे सूचक आहे.
  • या यादीत न्यूझीलँड आणि डेन्मार्क अनुक्रमे ८९ आणि ८८ या गुणांसह अग्रस्थानी आहेत. तर सीरिया, दक्षिण सूदान आणि सोमालिया अनुक्रमे १४, १२ आणि ९ गुणांसह तळाशी आहेत.
  • यादीत चीन ४१ गुणांसह ७७व्या क्रमांकावर आहे. तसेच ब्राझील ९६व्या, पाकिस्तान ११७व्या आणि रशिया २९ गुणांसह १३५व्या क्रमांकावर आहे.
  • भारतात भ्रष्टाचाराच्या विरोधात कार्य करणारे पत्रकार, कार्यकर्ते, विरोधी पक्षनेते तसेच तपास यंत्रणांचे अधिकारी यांना जीव गमवावा लागल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
  • पत्रकारांच्या संरक्षणार्थ असलेल्या समितीच्या अहवालातही गेल्या सहा वर्षांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात लिखाण करणाऱ्या १५ पत्रकारांचा खून झाल्याचे म्हटले आहे.
  • आशियाई देशांमध्ये भूतान देश चांगल्या स्थानावर आहे, तर बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका यांचे स्थान बिकट असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा