चालू घडामोडी : २७ फेब्रुवारी

भारताच्या नौदल युद्ध सरावात सहभागी होण्यास मालदीवचा नकार

  • पुढील महिन्यात भारताने आयोजित केलेल्या बहुराष्ट्रीय ‘मीलन’ या नौदल युद्ध सरावात सहभागी होण्यासाठी दिलेले निमंत्रण मालदीवने फेटाळून लावले आहे.
  • यासाठी मालदीवमधील सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत देश सोडून नौदल सरावास येणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्टीकरण मालदीवच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
  • मालदीवचा हा नकार म्हणजे मालदीवचे विद्यमान सत्ताधारी अब्दुल्ला यामीन आणि भारत सरकारमधील मतभेदांची दरी रुंदावत चालल्याचे लक्षण मानले जात आहे.
  • भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा ६ मार्चपासून सुरू होणाऱ्या या ८ दिवसांच्या नौदल सराव कार्यक्रमाची घोषणा केली. यामध्ये एकूण १६ देश सहभागी होणार आहेत.
  • इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या ताकदीच्या पार्श्वभूमीवर अंदमान-निकोबार द्विपसमूहावर या युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • मीलनमध्ये विविध देशांचे नौदल प्रमुखही सहभागी होणार असून यावेळी दक्षिण चीन सागरातील चीनच्या वाढत्या दादागिरीवरही चर्चा होईल.
  • यापूर्वी नौदल सराव कार्यक्रम १९९५साली पहिल्यांदा सहा नौदलांबरोबर, क्षेत्रीय सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने केला होता. यात ऑस्ट्रेलिया, मलेशिया, मॉरीशस, म्यानमार, न्यूझीलँड आणि ओमान या देशांच्या नौदलाचा सहभाग होता.
 मालदीवमधील परिस्थिती 
  • मालदीवमध्ये यामीन सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करण्यास नकार देत न्यायाधीशांनाच बेडया ठोकल्या आहेत.
  • विरोधकांचा आवाज दडपून टाकण्यासाठी आणीबाणी देखील लागू करण्यात आली.
  • तसेच ज्यादिवशी आणीबाणी संपणार होती, त्याचदिवशी आणीबाणीचा कालावधी आणखी ३० दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आणखी तणाव निर्माण झाला आहे. त्यावर भारताने तीव्र आक्षेप घेत आपली नाराजी नोंदवली.

जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपमध्ये भारताच्या अरुणा रेड्डीला कांस्यपदक

  • ऑस्ट्रेलियात मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपमध्ये वॉल्ट प्रकारात भारताच्या अरुणा बुडा रेड्डीने कांस्यपदक जिंकले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली आहे.
  • या स्पर्धेत स्लोव्हानियाच्या जासा कायससेल्फला सुवर्ण आणि ऑस्ट्रेलियाच्या इमायली व्हाइटहेडला रौप्यपदक मिळाले.
  • याच प्रकारातील अन्य भारतीय महिला स्पर्धक प्रणाती नायकला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
  • अरुणा रेड्डी कराटे प्रशिक्षक असून तिच्याकडे ब्लॅक बेल्ट आहे. २००५साली जिम्नॅस्टिक्समध्ये अरुणाने पहिले राष्ट्रीय पदक मिळवले.
  • २०१४साली राष्ट्रकुल स्पर्धेच्या पात्रता फेरीत वॉल्ट अॅपराटसमध्ये अरुणाला १४वे तर आशियाई स्पर्धेत नववे स्थान मिळाले होते.
  • २०१७साली आशियाई चॅम्पियनशिपमध्ये अरुणाला वॉल्ट प्रकारात सहावे स्थान मिळाले होते.

नीरव मोदीचा आणखी एक घोटाळा उघडकीस

  • पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) हिऱ्याचा व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा व्यावसायिक भागीदार मेहुल चोक्सीने १३२२ कोटी रूपयांचा आणखी एक घोटाळा केल्याची माहिती दिली आहे.
  • यापूर्वी पीएनबीने नीरव मोदीवर ११,४०० कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.
  • त्यामुळे नीरव मोदीच्या अवैध व्यवहाराचा आकडा आता २०४ मिलियन डॉलर म्हणजेच १२,६०० कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे
  • बँकेच्या ओव्हरसीज शाखेला मिळालेल्या नव्या लेटर ऑफ अंडरटेकिंग्जनंतर हा नवा घोटाळा समोर आला.

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत विकास कृष्णनला सुवर्णपदक

  • भारतीय बॉक्सर विकास कृष्णनने बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे झालेल्या स्ट्रँडजा स्मृती आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.
  • विकासला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरवण्यात आले. एखाद्या भारतीय खेळाडूला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे.
  • २६ वर्षीय विकासने अंतिम फेरीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या ट्रॉय इस्लीचा पराभव केला.
  • गतवर्षीच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदकानंतर विकासचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक ठरले.
  • भारताच्या अमित पांघलनेही ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली
  • या स्पर्धेत भारताने २ सुवर्ण, ३ रौप्य व ६ कांस्यपदकांदसह एकूण ११ पदकांची कमाई केली. यापैकी ५ पदक पुरुषांनी व ६ पदक महिलांनी पटकावली.

पाकिस्तान FATFच्या ग्रे लिस्टमध्ये

  • दहशतवादी संघटनांना निधी पुरवणाऱ्या देशांवर नजर ठेवणारी संस्था फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’ मध्ये टाकले आहे.
  • दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानवर नजर ठेवली जाणार आहे.
  • प्रत्येक परिस्थितीत पाकिस्तानची साथ देणाऱ्या चीनने यावेळी मात्र पाकला समर्थन दिले नसून या मुद्द्यावर माघार घेतली आहे.
  • त्यामुळे पॅरिसमध्ये सुरु असलेल्या FATFच्या बैठकीत सर्वसहमतीने पाकला ‘ग्रे लिस्ट’ मध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • पाकिस्तानला याआधी पैशांची अफरातफर केल्याच्या प्रकरणात वर्ष २०१२ ते २०१५ दरम्यान वॉच लिस्टमध्ये टाकण्यात आले होते.
  • तसेच काही महिन्यांपूर्वी दहशतवादी संघटनांना आश्रय दिल्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदतही रोखली आहे.

राशिद खान क्रिकेट विश्वातील सर्वात युवा कर्णधार

  • अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान क्रिकेट विश्वातील आतापर्यंतचा सर्वात युवा कर्णधार ठरला आहे.
  • राशिदचे वय सध्या १९ वर्षे आणि १५९ दिवस असून, असगर स्टॅनिकजईऐवजी राशिद खानकडे अफगाणिस्तानच्या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
  • अफगाणिस्तान संघातील प्रमुख गोलंदाज असलेल्या राशिद खानने नुकतेच आयसीसी टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे.
  • राशिद खानने ३७ एकदिवसीय सामन्यात ३५ डावांमध्ये ३.८२ च्या इकॉनामीने ८६ विकेट मिळवल्या आहेत. १८ धावांच्या बदल्यात ७ बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
  • तर टी-२०च्या २९ सामन्यात त्याने ४७ विकेट टिपल्या आहेत. टी-२० मध्ये त्याने एका डावात ३ धावा देऊन ५ विकेट ही सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.
  • क्रिकेट इतिहासातील युवा कर्णधार:
    • राशिद खान (अफगाणिस्तान) : १९ वर्षे १५९ दिवस
    • रोडनी ट्रॉट (बर्मुडा) : २० वर्षे ३३२ दिवस
    • राजिन सलेह (बांगलादेश) : २० वर्षे २९७ दिवस
    • तेतेंदा तैबू (झिम्बाब्वे) : २० वर्षे ३४२ दिवस
    • नवाब पतोडी (भारत) : २१ वर्षे ७७ दिवस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा