चालू घडामोडी : १९ फेब्रुवारी
मुंबई-पुणे हायपर लूप ट्रेनसाठी व्हर्जिन हायपरलूप कंपनीशी करार
- मुंबई-पुणे दरम्यान हायपर लूप ट्रेन मार्ग उभारण्यासंदर्भात महाराष्ट्राशी व्हर्जिन हायपरलूप वन या कंपनीने ईच्छा करार केला आहे.
- मुंबईमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र समिटसाठी हायपरलुपचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन आले असून, मुंबई-पुणे हे अंतर हायपरलूप ट्रेनने अवघ्या २० मिनिटात पार करता येईल असे त्यांनी सांगितले.
- ब्रॅन्सन यांच्यानुसार हायपरलूपमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. या प्रकल्पासाठी २० हजार कोटीं रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
- दरवर्षी १५ कोटी प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता या हायपरलूप ट्रेनची असेल. हायपरलूप ट्रेनमुळे दरवर्षी प्रवाशांच्या ९ कोटी तासांच्या वेळेची बचत होईल.
- तसेच पर्यावरण प्रदुषित करणाऱ्या वायुंचे उत्सर्जनही दरवर्षाला दीड लाख टन इतके कमी होईल असा दावा करण्यात आला आहे.
- या तंत्रज्ञानांतर्गत हवाविरहित ट्यूबमधून चुंबकीय क्षेत्राच्या सहाय्याने ध्वनीच्या गतीने ट्रेनसारख्या डब्यांचा प्रवास केला जातो.
- अजूनतरी हे तंत्रज्ञान जगात कुठेही व्यावसायिक वापरात आलेले नाही. दुबईमधे हायपरलूपचे काम वेगाने सुरू असून तेथे ती लवकरच वापरात येण्याची शक्यता आहे.
- ही यंत्रणा संपूर्णपणे वीजेवर चालणारी असून हा मार्ग वापरात आला तर मुंबई पुणे रस्त्यावरील ताणही कमी होईल असे सांगण्यात येत आहे.
गणितज्ञ व्लादिमीर ड्रिनफेल्ड यांना प्रतिष्ठेचा वुल्फ पुरस्कार
- प्रसिध्द गणितज्ञ व्लादिमीर गेरशोनोविच ड्रिनफेल्ड यांना गणितातील प्रतिष्ठेचा वुल्फ पुरस्कार मिळाला आहे.
- एक लाख डॉलर्सचा हा पुरस्कार इस्रायलच्या वुल्फ फाऊंडेशनच्या माध्यमातून दिला जातो. ज्यांना आधी वुल्फ पुरस्कार मिळाला अशा अनेकांना नंतर नोबेलही मिळाले आहे.
- ड्रिनफेल्ड यांचे गणितातील संशोधन हे अंकीय सिद्धांत, थिअरी ऑफ अॅटॉमॉर्फिक फॉम्र्स, बीजगणितीय भूमिती, एलिप्टिक मोडय़ुल, थिअरी ऑफ लँग्लांड्स कॉरस्पाँडन्स या विषयांमध्ये आहे.
- पुंज समूहाची संकल्पना त्यांनी व मिशियो जिंबो यांनी एकाच वेळी मांडली. त्यातून गणितीय भौतिकशास्त्रात मोठी भर पडली. थिअरी ऑफ सॉलिटॉन्समध्ये ड्रिनफेल्ड-सोकोलोव्ह यांनी अनेक सुधारणा केल्या.
- युक्रेनमध्ये जन्मलेल्या ड्रिनफेल्ड यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी बुखारेस्ट येथे गणित ऑलिम्पियाडमध्ये रशियाचे प्रतिनिधित्व केले होते.
- १९७८मध्ये मॉस्को विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली. स्टेकलोव इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथॅमेटिक्स या संस्थेतून त्यांनी विज्ञानातील डॉक्टरेट मिळवली.
- १९८१ ते १९९९ या काळात त्यांनी व्हेरकिन इन्स्टिटय़ूट फॉर लो टेम्परेचर फिजिक्स अँड इंजिनीअरिंग या संस्थेत काम केले. १९९९मध्ये त्यांनी शिकागो विद्यापीठात काम सुरू केले.
- वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी लँग्लांड्स काँजेक्सर्स फॉर जीएल २ हा कूटप्रश्न सोडवला. एलिप्टिक मोडय़ुल्स म्हणजे ड्रिनफेल्ड मॉडय़ुल्सची कल्पना त्यांनी मांडली होती.
- गणितात युरी मॅनिन हे त्यांचे सहकारी होते. त्यांनी यांग-मिल्स इन्स्टँटनच्या मॉडय़ुलाय स्पेसची संकल्पना मांडली. ती नंतर मिखाइल अतिया व निगेल हिचीन यांनी स्वतंत्रपणे सिद्ध केली.
- क्वांटम ग्रूप हा शब्दप्रयोगही त्यांनीच प्रथम वापरला. त्यांचा संबंध यांग बॅक्सटर समीकरणाशी जोडून त्यांनी या संशोधनास नवी दिशा दिली.
- व्हर्टेक्स बीजगणितीय सिद्धांत त्यांनी अॅलेक्झांडर बेलीनसन यांच्यासमवेत नव्याने विकसित केला.
- ड्रिनफेल्ड यांनी समकालीन गणिताच्या विकासात मोठा हातभार लावला असून अनेक नवीन सिद्धांतांना त्यांचे नाव नंतर देण्यात आले.
- सूत्र सिद्धांतासह, भौतिकशास्त्राच्या अभ्यासात पायाभूत असलेले अनेक गणिती सिद्धांत त्यांनी विकसित केले आहेत.
पाकचे विरोधी पक्ष नेते इमरान खान यांचा तिसरा विवाह
- पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू इमरान खान यांनी तिसऱ्यांदा निकाह केला असून, बुशरा मनेका असे त्यांच्या तिसऱ्या पत्नीचे नाव आहे.
- मनेका या अध्यात्मिक गुरु असून, मनशांतीसाठी काही तंत्र शिकून घेण्यासाठी इम्रान खान मनेका यांच्याकडे जात होते.
- ४०वर्षीय बुशरा मनेका यांचा यापूर्वी वरिष्ठ कस्टम अधिकारी म्हणून कार्यरत असलेले खवर फरीद मनेका यांच्याशी निकाह झाला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
- इमरान खान यांचे यापूर्वी दोनदा निकाह झाले आहेत. पहिली पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांच्यासोबत त्यांनी १९९५ साली निकाह केला होता. २००४मध्ये त्यांनी जेमिमा यांना घटस्फोट दिला.
- यानंतर दुसरी पत्नी पत्रकार रेहम खानसोबत २०१५मध्ये त्यांनी निकाह केला. मात्र १० महिन्यांनंतर रेहम व इमरान यांनी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा