चालू घडामोडी : २० फेब्रुवारी

भारताकडून अग्नी-२ची यशस्वी चाचणी

  • भारताने २० फेब्रुवारी रोजी अग्नी-२ या अण्वस्त्र वाहण्याची क्षमता असलेल्या मध्यम वर्गात मोडणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
  • ओदिशामधल्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या मोबाइल लाँचरच्या माध्यमातून ही चाचणी घेण्यात आली आहे.
  • जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे अग्नी-२ क्षेपणास्त्र २० मीटर लांबीचे असून त्याचे वजन १७ टन आहे.
  • तसेच १ टन इतकी अण्वस्त्र वहनक्षमता असलेल्या बॅलेस्टिक मिसाइल अग्नी-२चा माऱ्याचा पल्ला २,००० किमी इतका आहे.
  • भारताचे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) विकसित केलेल्या अग्नी या मालिकेतील हे क्षेपणास्त्र आहे.
  • या मालिकेत अग्नी-१ (७०० किमी पल्ला), अग्नी-३ (३,००० किमी पल्ला), अग्नी-४ (४,००० किमी पल्ला) व अग्नी-५ (५,००० किमीपेक्षा जास्त पल्ला) यांचा समावेश आहे.
  • हे क्षेपणास्त्र याआधीच लष्करामध्ये सामील झाले असून अत्यंत अत्याधुनिक अशा नॅव्हीगेशन सिस्टीमने (दिशादर्शन यंत्रणा) ते सज्ज आहे.

आयुष्मान भारत योजनेच्या संचालकपदी डॉ. दिनेश अरोरा

  • निती आयोगाचे आरोग्य संचालक डॉ. दिनेश अरोरा यांची नुकतीच ‘आयुष्मान भारत’ या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या योजनेचे संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
  • आयुष्मान भारत अमेरिकेतील ओबामा केअरएवढीच मोठी आरोग्य योजना असून, या योजनेची प्राथमिक आखणी अरोरा यांनी केली होती.
  • अरोरा हे एमबीबीएस डॉक्टर होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत आले. मूळ चंदिगढचे असलेले डॉ. अरोरा केरळ केडरचे २००२च्या तुकडीचे अधिकारी आहेत. पंजाबी, मल्याळम, हिंदी व इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे.
  • केरळच्या पल्लकड जिल्ह्यातील ओट्टापल्लम येथे त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय कारकीर्द सुरू केली.
  • त्यांनी सार्वजनिक आरोग्य योजनेत केरळमध्ये २००६-२००९ दरम्यान काम केले आहे. त्यांच्या काळात केरळने आरोग्य क्षेत्रातील अनेक निर्देशांकांत बाजी मारली होती.
  • विम्यातून सार्वजनिक आरोग्य क्षेत्राला पैसा मिळेल व तो पैसा पुन्हा याच व्यवस्थेसाठी वापरल्याने ही योजना बळकट होईल, असे त्यांचे मत आहे.
  • त्यांनी केरळात बेकायदा खाणींवर बंदी, बंदिस्त हत्तींच्या समस्या, वाहतूक अशा अनेक प्रश्नांत लक्ष घालून शिस्त आणली. त्यामुळे बेधडक अधिकारी म्हणून त्याचा नावलौकिक आहे. 
  • प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा अर्थशास्त्र व राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
  • ग्रामीण विद्युतीकरण महामंडळात काम करताना त्यांनी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य) यात चमकदार कामगिरी केली आहे.

सिंगापूर सरकारकडून नागरीकांना बोनस

  • सिंगापूर सरकारने अर्थसंकल्पातील शिलकी रकमेतून देशातील २१ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रत्येकाला ‘बोनस’ देण्याची घोषणा केली आहे.
  • नागरिकांना त्यांच्या करपात्र उत्पन्नानुसार १०० ते ३०० सिंगापूर डॉलर (४,९०० रुपये ते १४.७०० रुपये) एवढी रक्कम बोनस म्हणून मिळेल.
  • या बोनसचे वर्णन मंडारियन भाषेत ‘हाँगबाओ’ असे केले आहे. याचा अर्थ विशेष आनंदाप्रसंगी दिली जाणारी रोख बक्षीस रक्कम.
  • सिंगापूरच्या आर्थिक प्रगतीत प्रत्येक नागरिकास सहभागी करून घेण्याची सरकारची प्रतिबद्धता यातून दिसून येते.
  • वित्तमंत्री हेंग स्वी किएत यांनी १० अब्ज सिंगापुरी डॉलर शिलकीचा अर्थसंकल्प मांडताना सुमारे ७०० दशलक्ष सिंगापुरी डॉलर २७ लाख नागरिकांना ‘बोनस’ म्हणून वाटण्याची घोषणा केली.
  • यानंतरही उरलेली रक्कम रेल्वे सुधारणा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा संरक्षण योजनांसारख्या कामासाठी वापरण्यात येणार आहे.
  • देशातील वैधानिक मंडळाने अर्थव्यवस्थेत दिलेले योगदान आणि मुद्रांक शुल्क म्हणून जमा झालेली रक्कम यामुळे यंदा इतका नफा असणारा अर्थसंकल्प सादर झाल्याचे वृत्त आहे.
  • नोट : जेव्हा सरकारचे अंदाजित उत्पन्न अंदाजित खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्या अर्थसंकल्पास शिलकीचा अर्थसंकल्प (Surplus Budget) असे म्हणतात.

पाकिस्तानकडून मँडरिनला अधिकृत भाषेचा दर्जा

  • पाकिस्तानमधील सिनेटने चीनमधील मँडरिन या भाषेचा पाकिस्तानमधील अधिकृत भाषांच्या यादीत समावेश केला आहे.
  • त्यामुळे पाकिस्तानमध्ये इंग्रजी, अरबी, उर्दुसह मँडरिनचाही अधिकृत भाषांच्या यादीत समावेश झाला आहे.
  • मँडरिनला अधिकृत भाषेचा दर्जा मिळाल्याने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरअंतर्गत जनतेमधील संवाद वाढण्यास हातभार लागेल, असा दावा केला जात आहे.
  • पाकिस्तानमध्ये पंजाबी, पश्तू या भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. मात्र, अजूनही या भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा मिळालेला नाही.
  • पाकिस्तानमधील बोली भाषांना डावलून परदेशी भाषेला अधिकृत भाषांच्या यादीत स्थान देण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचे प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

  • पाकिस्तान-चीनमधील वाढते व्यापारी संबंध पाहता पाकमधील अनेक जण मँडरिन ही भाषा शिकत आहेत.
  • चीनमधील शैक्षणिक संस्थांनीही पाकमध्ये मँडरिन भाषा वर्ग सुरु केले आहेत. तर पाकिस्तानमधील काही शाळांमध्येही ही भाषा शिकवली जाते.
  • पश्चिमेकडील देशांमध्ये पाकिस्तानी नागरिकांना सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचे अनेकांना वाटते. त्यामुळे पाकमधील तरुणाईचा कल आता चीनकडे वाढत असल्याचे सांगितले जाते.

शिया इस्माईली समाजाचे ४९वे धर्मगुरू आगा खान भारत दौऱ्यावर

  • जगभर पसरलेल्या शिया इस्माईली समाजाचे ४९वे धर्मगुरू प्रिन्स आगा खान भारत दौऱ्यावर आले आहेत.
  • धर्मगुरूपदाची सूत्रे त्यांनी हाती घेतल्याला ६० वर्षे होत असल्याच्या निमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रम होणार आहेत.
  • प्रिन्स आगा खान शिया समाजाच्या लोकांची भेट घेतील. तसेच ते राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार आहेत.
  • प्रिन्स आगाखान यांच्या हस्ते २१ फेब्रुवारीला दिल्लीत सुंदर नर्सरीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
  • सुंदर नर्सरी हा १६व्या शतकातील उद्यानांचा समूह असून, तो हुमायूनच्या कबरीला लागून आहे. या नर्सरीला युनेस्कोने जागतिक वारसा बहाल केला आहे.
  • २०१५मध्ये भारत सरकारने आगा खान यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

प्रमोद नागदेवे यांना पंतप्रधान श्रमवीर पुरस्कार

  • अशोक लेलँडचे कर्मचारी प्रमोद हरिश्चंद्र नागदेवे यांना पंतप्रधान श्रमवीर पुरस्कार घोषीत झाला असून, येत्या २६ फेब्रुवारीला दिल्ली येथील विज्ञान भवनात त्यांना सन्मानित करण्यात येत आहे.
  • भारत सरकारअंतर्गत येणाऱ्या श्रम व रोजगार मंत्रालय दिल्लीतर्फे हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.
  • कामगार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांची पंतप्रधान श्रमवीर पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
  • यापूर्वी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबईतर्फे केला जाणारा गुणवंत कामगार २००८ या पुरस्काराचे ते मानकरी ठरले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा