अवनी चतुर्वेदी : लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक
- फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी या भारतीय हवाई दलातील लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या आहेत.
- १९ फेब्रुलारीला गुजरातच्या जामनगर येथील हवाई तळावरुन अवनी यांनी ‘फाइटर एअरक्राफ्ट मिग २१’च्या साथीने उड्डाण घेतले आणि यशस्वीपणे मिशन पूर्णही केले.
- जगभरात ब्रिटन, अमेरिका, इस्त्रायल आणि पाकिस्तान अशा निवडक देशांमध्येच महिलांना लढाऊ वैमानिक होण्याची संधी दिली जाते.
- भारतात ऑक्टोबर २०१५मध्ये केंद्र सरकारने महिलांना लढाऊ वैमानिक होण्याची संधी उपलब्ध करुन दिली.
- महिला लढाऊ वैमानिक बनवण्यासाठी २०१६मध्ये पहिल्यांदाच तीन महिला अवनी चतुर्वेदी, मोहना सिंह आणि भावना यांना हवाई दलात सामील केले होते.
- अवनी मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील आहे. तिने आपले प्रशिक्षण हैदराबाद एअरफोर्स अकॅडमीतून पूर्ण केले आहे.
- भारताचे हवाईदल प्रमुख : एअर चीफ मार्शल बी एस धनोआ
नवाज शरीफ पीएमएल-एन पक्षाच्या अध्यक्षपदासाठी अपात्र
- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना तेथील सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानातील सत्ताधारी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजच्या (पीएमएल-एन) अध्यक्षपदासाठी अपात्र ठरविले आहे.
- त्यामुळे पंतप्रधान पदानंतर शरीफ यांना आता पक्षाध्यक्ष पदावरूनही पायउतार व्हावे लागणार आहे.
- गेल्या वर्षी पनामा पेपर लिक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना दोषी ठरवत पंतप्रधानपदावरून हटवले होते.
- पंतप्रधानपदावर असताना नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.
- संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) नवाज शरीफ प्रकरणाचा तपास केला होता. जेआयटीच्या अहवलात शरीफ आणि कुटुंबीयांवरील आरोप योग्य असल्याचे सिद्ध झाले होते.
दक्षिण आफ्रिकेतील गुप्ता साम्राज्याला उतरती कळा
- दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी पदत्याग केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील अजय, अतुल, राजेश या गुप्ता बंधुंच्या साम्राज्याला उतरती कळा लागली आहे.
- गेले अनेक महिने गुप्ता बंधुंवर वेगवेगळे आरोप करण्यात आले होते. मात्र केवळ तपास चालू आहे असे सांगत तपास यंत्रणांनी कोणतीही प्रत्यक्ष कारवाई त्यांच्यावर केली नव्हती.
- मात्र १४ फेब्रुवारीला राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली.
- गुप्तांच्या जोहान्सबर्गमधील सॅक्झनवर्ल्ड येथील आलिशान अशा संकुलावर छापा टाकण्यात आला तसेच त्यांच्या अनेक सहकार्यांना अटक झाली. तसेच गुप्ता बंधूंमधील ज्येष्ठ बंधू अजयला फरारही घोषित करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा