चालू घडामोडी : ९ एप्रिल
राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ – दिवस चौथा
- नेमबाजी
- राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताच्या मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
- आपल्याच देशाची अनुभवी नेमबाज हीना सिद्धू हिला मात देत तिने सुवर्णपदक जिंकले. तर हीनाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
- १० मी. एअर रायफल प्रकारात भारताच्या रवी कुमारला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
- मेहुली घोषने १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. तर याच प्रकारात भारताच्या अपूर्वा चंडेलाने कांस्यपदक पटकावले.
- वेटलिफ्टींग
- वेटलिफ्टींगमध्ये ६९ किलो वजनी गटात भारताच्या पुनम यादवने सुवर्णपदकाची कमाई केली. ग्लासगो २०१४ राष्ट्रकुल स्पर्धेत ६३ किलो गटात पूनमने कांस्यपदक जिंकले होते.
- विकास ठाकूरने ९४ किलो वजनी गटात विकास ठाकूरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. २०१४मध्ये ८५ किलो गटात विकासने रौप्यपदक जिंकले होते.
- टेबल टेनिस
- मनिका बात्राच्या एकेरीतील दिमाखदार विजयाच्या बळावर भारताने चार वेळा विजेत्या सिंगापूरचा ३-१ असा पाडाव करीत राष्ट्रकुलमधील महिलांच्या सांघिक टेबल टेनिस स्पर्धेचे ऐतिहासिक विजेतेपद पटकावले.
- राष्ट्रकुलमधील टेबल टेनिस क्रीडा प्रकारात भारताने पटकावलेले हे दुसरे सुवर्णपदक ठरले. याआधी भारताने २००६मध्ये सुवर्णपदक मिळवले होते.
- मनिका भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली असली तर मधुरिका पाटकर आणि मौमा दास यांचा अनुभवसुद्धा महत्त्वाचा ठरला.
- मधुरिका-मौमा जोडीने दुहेरीत झोऊ आणि मेंग्यू यू जोडीचा ३-१ असा पराभव केला. मधुरिकाने एकेरीत मेंग्यू यू हिचा ३-१ असा पराभव केला.
- बॅडमिंटन
- भारतीय बॅडमिंटन संघाने तीन वेळेचा चॅम्पियन मलेशियावर प्रेक्षणीय विजय नोंदवित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक जिंकले.
- भारतीय संघाकडून मिश्र दुहेरीमध्ये सात्विक रणकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा, पुरुष एकेरीमध्ये किदंबी श्रीकांत व महिला एकेरी सामन्यामध्ये सायना नेहवाल या खेळाडूंच्या कामगिरीमुळे हे यश संपादन करणे सहज शक्य झाले.
- याआधी भारताने २०१०च्या नवी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत सांघिक रौप्य आणि २००६मध्ये कांस्य जिंकले होते.
नोबेलविजेते जर्मन भौतिकशास्रज्ञ पीटर ग्रुएनबर्ग यांचे निधन
- भौतिकशास्त्रातील नोबेल मिळवणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ पीटर ग्रुएनबर्ग यांचे ९ एप्रिल २०१८ रोजी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
- डिजिटल डेटाची साठवणूक करण्यासाठीच्या संशोधनामध्ये त्यांचे बहुमोल योगदान होते.
- गिगाबाईट हार्ड डिस्कचा विकासासाठी आवश्यक अशा जीएमआरचा त्यांनी शोध लावला होता.
- ग्रूएनबर्ग यांना फ्रेंच वैज्ञानिक अल्बर्ट फर्ट यांच्याबरोबर २००७मध्ये जायंट मॅग्नेटोरेझिस्टन्स परिणामाच्या शोधासाठी नोबेल मिळाले.
- ग्रुएनबर्ग यांना याआधी २००६मध्ये युरोपीय युनियनचा पुरस्कार मिळाला होता. तसेच इस्रायल, जपान आणि तुर्कस्ताननेही त्यांना पुरस्कार देऊन गौरविले होते.
- १९८९मध्ये त्यांना जर्मन अध्यक्षांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर २००६मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील मानाचा वूल्फ पुरस्कार मिळाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा