चालू घडामोडी : २९ एप्रिल
नेपाळमधील हायड्रोइलेक्ट्रिसिटी प्रकल्पाच्या कार्यालयात स्फोट
- पूर्व नेपाळमध्ये भारताकडून विकसित करण्यात आलेल्या अरुण-३ या हायड्रोइलेक्ट्रिसिटी (पाण्यापासून वीजनिर्मिती) प्रकल्पाच्या कार्यालयात २९ एप्रिल रोजी स्फोट झाला.
- या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. तसेच चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही आठवड्यांनंतर या प्रकल्पाचे उद्घाटन होणार होते. मात्र, तत्पूर्वी ही घटना समोर आली आहे.
- ९०० मेगावॅट क्षमतेचा अरुण-३ हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्प २०२०पर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे.
- मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ मे रोजी आपल्या नेपाळ दौऱ्यादरम्यान या प्रकल्पाचे शिलान्यास करणार होते.
- अरुण- ३ प्रकल्पासाठी नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी २५ नोव्हेंबर २०१४ रोजी या प्रकल्प विकासासाठी करार झाला होता. भारताच्यावतीने सतलज जलविद्युत विभागाने या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
डायना एडलजी आणि पंकज रॉय यांना जीवनगौरव पुरस्कार
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी आणि माजी महान कसोटीपटू पंकज रॉय यांना सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला आहे.
- डायना यांनी महिला क्रिकेटसाठी अत्यंत मोलाचे योगदान देताना २० कसोटी सामने आणि ३४ एकदिवसीय सामने खेळले.
- त्यांच्या १७ वर्षांच्या कारकीर्दीत या दोन्ही प्रकारात त्यांनी अनुक्रमे ६३ आणि ४६ बळी मिळवले.
- डायना एडलजी आणि पंकज रॉय यांना २०१६-१७ या वर्षांसाठी तर माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड आणि महिला संघाच्या माजी कर्णधार सुधा शाह यांना २०१७-१८ या वर्षांसाठी हा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
- त्याशिवाय अब्बास अली बेग, दिवंगत कसोटीपटू नरेन ताम्हणे, आणि दिवंगत कसोटीपटू बुधी कुंदरन यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
- जूनमध्ये भारत-अफगाणिस्तान दरम्यान होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याप्रसंगी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताला कांस्यपदक
- तिरंदाजी विश्वचषकाच्या मिश्र गटात अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नाम यांच्या भारतीय संघाने तुर्कीचा पराभव करून कांस्यपदक पटकावले.
- कांस्यपदकासाठी रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघाने १५४-१४८ असा विजय मिळवला.
- विश्वचषकात मिश्र गटातील भारताचे हे दुसरे कांस्यपदक असून यापूर्वी गतवर्षी अभिषेकने दिव्या धयालच्या साथीने ही कामगिरी करून दाखवली होती.
- वर्माचे हे यश विश्वकरंडक स्पर्धेतील सातवे यश आहे. अंताल्या येथे गतवर्षी झालेल्या स्पर्धेत वर्माने दिव्या दयाळसह ब्राँझपदक जिंकले होते. याच स्पर्धेत पुरुषांच्या सांघिक गटात त्याने भारताचे पहिले सुवर्णपदक मिळवले होते.
- तसेच मेक्सिको येथे २०१५मध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत वैयक्तिक गटात त्याने रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यावर्षी पोलंड येथील विश्वस्पर्धेत याच गटात त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा