सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (लघुपट): नागराज मंजुळे (पावसाचा निबंध)
सर्वोत्कृष्ट लघुपट (नॉन फीचर): मयत (सुयश शिंदे)
सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट: चंदेरीनामा (राजेंद्र जंगले)
नर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म): धप्पा (निपुण धर्माधिकारी) [हा पुरस्कार राष्ट्रीय एकतेवर आधारलेल्या चित्रपटास दिला जातो.]
इतर पुरस्कार:
सर्वोत्कृष्ट चित्रपट: व्हिलेज रॉकस्टार (सुवर्ण कमळ)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : रिद्धी सेन (नागर्कीर्तन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: श्रीदेवी (मॉम)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: दिव्या दत्ता (इरादा)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट: न्यूटन (निर्माता: अमित मसुरकर)
सर्वोत्कृष्ट साहसी दृश्य: अब्बास अली मोगल (बाहुबली २)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स: बाहुबली २
उत्तम करमणूक करणारा चित्रपट: बाहुबली २
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन: गणेश आचार्य (गोरी तू लठ मार: टॉयलेट एक प्रेम कथा)
स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म): अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन)
सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर: ए. आर. रहमान (मॉम)
सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट: गाझी
सर्वोत्कृष्ट लद्दाखी चित्रपट: वॉकिंग विद द विंड
सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट: टू लेट
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट: मयूरक्षी
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट: हेब्बत रामाक्का
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट: थोंडीमुथलम दृक्शियम
सर्वोत्कृष्ट ओरिया चित्रपट: हॅलो आर्सी
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट: दह..
सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट: इशू
विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रख्यात दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार (मरणोत्तर) जाहीर झाला आहे.
७०च्या दशकात उत्तम अभिनेता म्हणून बॉलीवूड गाजवणाऱ्या विनोद खन्ना यांनी उत्तरार्धात कुशल नेता म्हणूनही छाप पाडली होती. गतवर्षी दीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले.
‘मन की मीत’ या चित्रपटातून विनोद खन्ना यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी कारकिर्दीत खलनायकाच्या भूमिकेकडून नायकाच्या भूमिकेकडे यशस्वी प्रवास केला.
१९७१साली प्रदर्शित झालेला ‘हम तुम और वो’ हा त्यांचा नायक म्हणून पहिला चित्रपट होता.
अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर, जमीर, हेराफेरी, बर्निंग ट्रेन हे विनोद खन्ना यांचे विशेष गाजलेले चित्रपट होते.
त्यांनी वाजपेयी सरकारमध्ये काही काळ सांस्कृतिक आणि पर्यटन खात्याचे मंत्रिपद भूषवले, तसेच नंतर परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्रिपदही भूषवले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा