डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

  • भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २०१८ रोजी १२७वी जयंती देशात तसेच जगभरात उत्साहाने साजरी केली जात आहे.

यानिमित्ताने या महामानवाच्या जीवनपटावर एक नजर....

  • १४ एप्रिल १८९१: महू, मध्यप्रदेश येथे सेनिक छावणीत जन्म.
  • १९०७: मॅट्रिकची परीक्षा पास.
  • १९०७: रमाबाई वलंगकर यांच्यासोबत विवाह.
  • १९१०: इन्टरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण.
  • १९१२: बी.ए.परीक्षा उत्तीर्ण.
  • १९१२: पुत्र यशवंतराव यांचा जन्म.
  • २ फेब्रुवारी १९१३: वडील सुभेदार रामजी यांचे निधन.
  • १ जून १९१३: सयाजीराव गायकवाड यांनी विदेशातील अध्ययनासाठी शिष्यवृत्ती बहाल केली.
  • १९१३: उच्च शिक्षणाकरिता न्यूयॉर्क (अमेरिका) येथे रवाना.
  • १९१५: अॅन्शंट इंडियन कॉमर्स या प्रबंधावर एम.ए.ची उपाधी बहाल.
  • जून १९१६: नॅशनल डिविडंड ऑफ इंडिया ए हिस्टॉरिक अॅंड अनालिटिकल स्टडी प्रबंध कोलंबिया विद्यापीठाद्वारे स्वीकृत.
  • १९१६: कास्ट इन इंडिया, देअर मेकेनिझम जेनेसिस अॅंड डेव्हलपमेंट या निबंधाचे वाचन.
  • १९१६: पीएच.डी. पदावी बहाल.
  • ११ नोव्हेंबर १९१८: सिडेनहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून नियुक्ती.
  • ३१ जानेवारी १९२०: राजर्षी शाहू यांच्या साहाय्याने मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित.
  • १ मार्च १९२०: माणगाव ( कोल्हापूर) येथे बहिष्कृत परिषदेचे अध्यक्षपद.
  • १ मे १९२० -अखिल भारतीय बहिष्कृत परिषद, नागपूर.
  • १९२२: बॅरीस्टर परीक्षा पास.
  • १९२३: डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी बहाल.
  • २० जुलै १९२४: बहिष्कृत हितकारिणी सभाची स्थापना, मुंबई.
  • जुलै १९२६: राजरत्न या मुलाचे निधन.
  • १९ मार्च १९२७: कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, महाड.
  • ३ एप्रिल १९२७: बहिष्कृत भारत पाक्षिकाचे प्रकाशन.
  • १९२७: मुंबई विधिमंडळात सदस्य म्हणून निवड.
  • ४ सप्टेंबर १९२७: समाज समता संघची स्थापना.
  • १२ नोव्हेंबर १९२७: ज्येष्ठ बंधू बाळाराम आंबेडकर यांचे निधन.
  • १३ नोव्हेंबर १९२७: अमरावती येथे अंबादेवी मंदिर सत्याग्रह.
  • २५ डिसेंबर १९२७: महाडचा सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन.
  • जून १९२८: मुंबई येथे सरकारी विधी महाविद्यालयात प्राध्यापक.
  • २९ जून १९२८: समता पाक्षिकाचा आरंभ.
  • २३ ऑक्टोबर १९२८: सायमन कमिशनपुढे साक्ष.
  • १९२९: अस्पृश्यांसाठी ३३ टक्के आरक्षण ठेवण्याबाबत मुंबई विधिमंडळात भाषण.
  • ३ मार्च १९३०: काळाराम मंदिर, नाशिक सत्याग्रह प्रारंभ.
  • २ ऑक्टोबर १९३०: लंडन येथे गोलमेज परिषदेसाठी मुंबई येथून रवाना.
  • नोव्हेंबर १९३०: गोलमेज परिषदेत अस्पृश्यांची बाजू ठामपणे मांडली.
  • २४ नोव्हेंबर १९३०: जनता या साप्ताहितकाचा आरंभ.
  • १४ ऑगस्ट १९३१: मणीभवन मुंबई येथे गांधीजींसोबत पहिली भेट.
  • ८ ऑक्टोबर १९३१: अल्पसंख्याकांच्या प्रश्नाबात गांधीजींच्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध.
  • २६ नोव्हेंबर १९३१: गांधी: आंबेडकर-पंचम जॉर्ज यांची भेट.
  • २५ सप्टेंबर १९३२: पुणे करारावर स्वाक्षरी.
  • २७ मे १९३५: पत्नी रमाबाई यांचे निधन.
  • २ जून १९३५: मुंबई, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावर नियुक्ती.
  • १३ ऑक्टोबर १९३५: ‘हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.’ डॉ. आंबेडकरांची येवला येथे धर्मांतराची घोषणा.
  • मे १९३६: जातिप्रथेचे उन्मूलन भाषण प्रकाशित.
  • ३१ मे १९३६: ‘मुक्ती कोन पथे’ विख्यात भाषण, मुंबई.
  • १५ ऑगस्ट १९३६: स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.
  • १७ फेब्रुवारी १९३७: मुंबई असेंब्ली निवडणूकीत विजय.
  • १७ सप्टेंबर १९३७: कोकणातील खोती नष्ट करण्यासाठी मुंबई विधिमंडळात बिल मांडले.
  • ४ जाने १९३८: पंढरपूर, मातंग परिषदेतर्फे मानपत्र अर्पण.
  • १२-१३ फेब्रु.१९३८: मनमाड येथे अस्पृश्य रेल्वे कामगार परिषद.
  • मे १९३८: मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा राजीनामा.
  • सप्टेंबर १९३८: औद्योगिक कलहाचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले.
  • ७ नोव्हेंबर १९३८: स्वतंत्र मजूर पक्षातर्फे सत्याग्रह.
  • जानेवारी १९३९: महाड, शेतकरी परिषदेचे अध्यक्षपद-कॉंग्रेसच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीका.
  • २२ जून १९४०: मुंबई, सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत भेट.
  • १९४०: थॉट्स ऑन पाकिस्तान ग्रंथाचे प्रकाशन.
  • एप्रिल १९४२: अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना.
  • १९ जुलै १९४२: भारतीय दलित वर्ग परिषद, नागपूर येथे हजर.
  • १९४२: मजूर मंत्री म्हणून निवड.
  • १९ जाने १९४३: पुणे विख्यात भाषण ‘रानडे, गांधी आणि जिन्ना.’
  • जून १९४५: कॉंग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांप्रती काय केले? ग्रंथ फ्रकाशित.
  • २० जून १९४६: मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना.
  • १९४६: ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ हा ग्रंथ प्रकाशित.
  • १७ डिसेंबर १९४६: भारताला कोणतीही शक्ती एकात्मक होण्यापासून परावृत्त करु शकत नाही. संविधान सभेत भाषण.
  • ऑगस्ट १९४७: भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून मंत्रीमंडळात समावेश.
  • २९ ऑगस्ट १९४७: संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदावर निवड.
  • १५ एप्रिल १९४८: डॉ. शारदा कबीर यांच्यासोबत विवाह.
  • ऑक्टो: १९४८: दि अनटचेबल्स ग्रंथ प्रकाशित.
  • सप्टेंबर १९४८: सरसंघचालक माधवराव गोळवलकर यांच्यासोबत भेट.
  • ४ नोव्हेंबर १९४८: घटनेचा मसुदा घटना समितीसमोर ठेवला.
  • २५ नोव्हेंबर १९४९: घटना समितीत देशभक्तीने ओथंबलेले समारोपीय भाषण.
  • २६ नोव्हेंबर १९४९: घटना समितीने घटना स्वीकार केली.
  • मे १९५०: बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य लेख महाबोधी संस्थेच्या मासिकात प्रसिद्ध.
  • २५ मे १९५०: कोलंबोत विश्व बौद्ध परिषदेला उपस्थित.
  • १९ जून १९५०: औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय स्थापन.
  • मे, १९५१: लोकप्रतिनिधित्व विधेयक लोकसभेपुढे मांडले.
  • सप्टेंबर १९५१: हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हा लेख महाबोधी मासिकामध्ये प्रकाशित.
  • २७ सप्टेबर १९५१: हिंदू कोड बिल व मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत मंत्रिपरिषदेचा राजीनामा.
  • जानेवारी १९५२: प्रथम सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पराभव.
  • मार्च १९५२: राज्यसभेसाठी निवड.
  • ५ जून १९५२: कोलंबिया विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी अर्पण.
  • १२ जानेवारी १९५३: हैद्राबाद, उस्मानिया विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी अर्पण.
  • ३० जानेवारी १९५४: महात्मा फुले बोलपट चित्रपटाच्या मुहूर्त समारंभास उपस्थित.
  • मे १९५४: भंडारा पोटनिवडणुकीमध्ये पराभव.
  • ३ ऑक्टोबर १९५४: आकाशवाणीवर ‘माझे वैयक्तिक तत्त्वज्ञान’ भाषण.
  • डिसेंबर १९५४: रंगून , तिसऱ्या जागतिक बौद्ध परिषदेला उपस्थित.
  • ४ मे १९५५: भारतीय बौद्ध महासभा स्थापित.
  • ४ फेब्रुवारी १९५६: मुंबई ही महाराष्ट्राची आहे, अशी ताकीद भारत सरकारला दिली.
  • २४ मे १९५६: नरेपार्क येथे, ऑक्टोबर महिन्यात मी बौद्धधर्माची दीक्षा घेईल अशी घोषणा केली.
  • १४ ऑक्टोबर १९५६: नागपूर येथे पूज्य भंते महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते पत्नीसोबत धम्मदीक्षा घेतली व नंतर आपल्या ५ लाख अस्पृश्य बंधूंना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
  • १५ ऑक्टोबर १९५६: बौद्ध धम्म का स्वीकारला या विषयी सकाळी अभूतपूर्व भाषण व नागपूर म्युनिसिपालिटीतर्फे संध्याकाळी मानपत्र अर्पण.
  • १६ ऑक्टोबर १९५६: चंद्रपूर येथे २ लाख अस्पृश्य बंधूंना धम्मदीक्षा दिली.
  • २० नोव्हेबर १९५६: काठमांडू, नेपाळ येथे जागतिक बौद्ध परिषदेत बुद्ध आणि कार्लमार्क्स हे अभूतपूर्व भाषण दिले.
  • ६ डिसेंबर १९५६: दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण.
  • ७ डिसेंबर १९५६: मुंबई येथे दादर चौपाटीच्या किनाऱ्यावर १० लाख लोकांच्या साक्षीने बौद्ध पद्धतीनुसार अंतिम संस्कार.
  • १४ एप्रिल १९९०: देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार (मरणोत्तर) ‘भारतरत्न’ जाहीर.

डॉ. आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथ

  • कास्ट्स इन इंडिया (१९१७)
  • स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज (१९१८)
  • द प्रॉब्लम ऑफ द रूपी (१९२३)
  • दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया (१९२४)
  • वेटिंग फॉर अ व्हिसा (१९३५-३६)
  • अनाइअलेइशन ऑफ कास्ट (१९३६)
  • मिस्टर गांधी अँड दी एमॅन्सीपेशन ऑफ दी अनटचेबल्स (१९४५)
  • रानडे, गांधी अँड जिन्ना (१९४३)
  • थॉट्स ऑन पाकिस्तान (१९४५)
  • व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स (१९४५)
  • महाराष्ट्र एज ए लिंग्विस्टिक स्टेट (१९४५)
  • हू वर दि शुद्राज? (१९४६)
  • स्टेट्स अँड माइनॉरिटीज (१९४७)
  • हिस्ट्री ऑफ इंडियन करंसी अँड बँकिंग (१९४७)
  • द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दी बिकम अनटचेबल्स (१९४८)
  • थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट (१९५५)
  • बुद्ध अँड कार्ल मार्क्स (१९४६)
  • कम्यूनल डेडलाक अँड वे टू सॉल्व इट (१९४५)
  • बुद्ध अँड दी फ्युचर ऑफ हिज रिलीजन (१९५०)
  • फ्युचर ऑफ पार्लियामेन्ट्री डेमोक्रेसी (१९५१)
  • लिंग्विस्टिक स्टेट्स नीड्स फार चेक्स अँड बॅलेन्सेज (१९५३)
  • बुद्धिज्म अँड कम्यूनिज्म (१९५६)
  • द बुद्धा अँड हिज धम्मा (१९५७)
  • हिंदू वुमन: राइजिंग अँड फॉल

पत्रकार व संपादक असलेल्या डॉ. आंबेडकरांनी काढलेली वृत्तपत्रे

  • मूकनायक
  • बहिष्कृत भारत
  • जनता
  • समता
  • प्रबुद्ध भारत

डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल काही खास गोष्टी...

  • त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ  द रुपी - इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्यूशन’मधून रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेच्यावेळेस अनेक सूचनांचा वापर करण्यात आला.
  • १९५५मध्ये त्यांनी मध्य प्रदेश आणि बिहारचे प्रशासन चांगले चालावे यासाठी दोन्ही राज्याच्या विभाजनाचा सल्ला दिला होता. ४५ वर्षांनी या राज्यांचे विभाजन २०००मध्ये केले गेले आणि त्यानंतर छत्तीसगढ आणि झारखंड ही राज्ये तयार झाली.
  • त्यांची आत्मकथा ‘वेटिंग फॉर अ व्हिसा’ ही कोलंबिया विद्यापीठात अभ्यासक्रमात वापरली जाते.
  • परदेशात जाऊन अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत.
  • त्यांचे लग्न झाले तेव्हा ते १५ वर्षांचे होते. तर रमाबाई या ९ वर्षांच्या होत्या.
  • डॉ. आंबेडकर त्यांच्या काळातील सर्वात जास्त शिकलेले संसद सदस्य होते. ते भारताचे पहिले कायदामंत्री होते. 
  • ते गरीब ब्राम्हण विद्यार्थ्यांनाही मदत करायचे. ते म्हणायचे की, ज्यांना सामाजिक सुविधा मिळत नाहीत, ते सर्व गरीब हे दलितच आहेत. 
  • भारतीय लेबर कॉन्फरन्सच्या ७व्या अधिवेशनामध्ये बाबासाहेबांनी भारतातील कंपन्यांमध्ये कामाचे तास १४ वरुन ८ केले.
  • अर्थशास्त्रात नोबेल मिळवणारे जागतिक किर्तीचे अर्थशास्त्रज्ञ प्रा. अमर्त्य सेन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले गुरु मानायचे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा