चालू घडामोडी : १३ एप्रिल

राष्ट्रकुल स्पर्धा : भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट

 • नेमबाजी
 • महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात विक्रमी ४५७.९ गुणांची नोंद करत सुवर्णपदकाची कमाई केली.
 • या स्पर्धेतले तेजस्विनीचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. यापूर्वी तेजस्विनीने ५० मी. रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदकाची कमाईदेखील केली आहे.
 • पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायरमध्ये अनिश भानवालाने सुवर्ण पदक जिंकले. या कामगिरीसह अनिश भारताकडून सर्वात कमी वयात सुवर्णपदक मिळवणारा खेळाडू ठरला आहे.
 • याव्यतिरीक्त अंजुम मुद्गीलने ५० मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारातच रौप्यपदकाची कमाई केली.
 • बॉक्सिंग
 • ६९ किलो गटात मनोज कुमारने कांस्यपदक जिंकले.
 • टेबल टेनिस
 • महिला दुहेरीत भारताच्या मनिका बत्रा आणि मौर्ना दास जोडीने रौप्यपदक जिंकले
 • महिला दुहेरीत सुतिर्था मुखर्जी आणि पुजा सहस्त्रबुद्धे जोडीने कांस्यपदक जिंकले.
 • कुस्ती
 • ६५ किलो वजनी गटात बजरंग पुनियाने भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले.
 • ९७ किलो वजनी गटात फ्री-स्टाईल कुस्तीमध्ये मौसम खत्रीला रौप्यपदक. 
 • ५७ किलो वजनी गटात फ्री-स्टाईल कुस्तीमध्ये पूजा धांडाला रौप्यपदक.
 • ९१ किलो वजनी गटात भारताच्या नमन तंवरला कांस्यपदक.

नवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात

 • पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे.
 • पाक राज्यघटनेच्या कलम ६२ (१) (एफ) अंतर्गत दोषी ठरलेला लोकप्रतिनिधी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांवर आजीवन बंदी घातली जाईल, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
 • गेल्या वर्षी पनामा पेपर्स प्रकरणी पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने नवाझ शरीफ यांना याच कलमांन्वये शरीफ यांना दोषी ठरवत पंतप्रधान पदावर राहण्यास अपात्र ठरविले होते.
 • त्यामुळेच न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता शरीफ यांना यापुढे कधीच सार्वजनिक पद स्वीकारता येणार नाही.
 • याआधी त्यांना राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदीही राहता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा