योगोपचाराने आरोग्यसंपदेचे जतन करण्याचा वस्तुपाठ घालून देणारे विख्यात योगोपचारतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे २५ एप्रिल रोजी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
इचलकरंजीलगतचे बोरगाव (ता. चिकोडी) हे त्यांचे मूळ गाव. स्टेम सेल प्रत्यारोपण शल्य चिकित्सक अशी त्यांची ओळख होती.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कोल्हापुरात व्यवसाय करू केला. १८८८मध्ये त्यांच्याकडे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या योग विभागाची जबाबदारी राज्यात सर्वप्रथम देण्यात आली.
योगसाधनेने हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब आदि रोगांना आवर कसा घालता येतो, याची माहिती त्यांनी डॉक्टरसह रुग्णांना दिली.
यासह वृत्तपत्र, नियतकालिके, मासिके यांतून त्यांनी याविषयावर भरपूर लिखाण करून योग विद्येबाबत जागृती केली.
त्यांच्या ‘निरोगी राहू या आनंदाने जगू या’ हा संदेश देणाऱ्या शिबिरांनी आजवर ९००चा आकडा पूर्ण केला आहे. त्यांनी परदेशातही १४५ शिबिरे घेतली आहेत.
त्यांनी पहिली हास्ययोग चळवळ १९८८साली सुरू केली. पहिला शेतकरी लढा, जैन धर्मीय तरुणांत लोकप्रिय ठरलेल्या वीर सेवा दलाच्या कामाची पायाभरणी त्यांनीच केली.
त्यांची योग विषयी ६ पुस्तके प्रकाशित झाली असून त्याच्या सीडी मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी भाषेत उपलब्ध आहेत.
तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायणन, माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्यावर त्यांनी योगोपचार केले होते.
आसाराम बापूला बलात्कार प्रकरणी जन्मठेप
जोधपूर न्यायालयाने बलात्कार प्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूसह शिल्पी आणि शरदचंद्र या आरोपींना दोषी ठरवले असून आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
न्यायालयाने शरदचंद्र व शिल्पी या सहआरोपींनाही प्रत्येकी २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आसारामवर होता, ज्याची सुनावणी जोधपूरमधल्या विशेष एससी-एसटी न्यायालयात झाली.
आसारामच्या मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणाऱ्या उत्तर प्रदेशच्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती.
आसारामने जोधपूरनजीकच्या मनाई भागातील आश्रमात बोलावून १५ ऑगस्ट २०१३च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप होता.
आसारामला इंदूरहून अटक करून १ सप्टेंबर २०१३ रोजी जोधपूरला आणण्यात आले होते. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे.
संचिता गुप्ता उर्फ शिल्पी ही या दुर्दैवी मुलीच्या हॉस्टेलची वॉर्डन होती तर शरदचंद्र छिंदवाडातील या आश्रमशाळेचा संचालक होता.
शिल्पी व शरद यांनी आसारामला या कृत्यामध्ये साथ दिल्याचे न्यायालयात सिद्ध झाले व त्यामुळे त्यांनाही शिक्षा झाली.
महमूद अबू झैद यांना युनेस्कोचा वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार
तुरुंगवास भोगत असलेले इजिप्तमधील वृत्तछायाचित्रकार महमूद अबू झैद यांना ‘युनेस्को गुईलर्मो कानो प्रेस फ्रीडम २०१८’ पारितोषिक जाहीर झाले आहे.
२०१३साली काहिरामध्ये सुरक्षा दल आणि माजी राष्ट्रपती मुहम्मद मोर्सी यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीला कॅमेरात कैद करतांना त्यांना अटक करण्यात आली होती. ते पाच वर्षांपासून तुरुंगवास भोगत आहेत.
त्याला मृत्युदंडाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. २ मे रोजी त्याला बहुधा अनुपस्थितीतच हा पुरस्कार दिला जाईल.
मोहम्मद सलाहला ईपीएल सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कार
इजिप्तमध्ये जन्मलेल्या मोहम्मद सलाह या उत्तर आफ्रिकन फुटबॉलपटूला इंग्लिश प्रीमियर लीग या व्यावसायिक फुटबॉलपटूंच्या संघटनेने यावर्षीचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार बहाल केला आहे. हा बहुमान मिळविणारा तो पहिला आफ्रिकन फुटबॉलपटू ठरला.
लिव्हरपूल क्लबकडून खेळताना मोहम्मद सलाहने यंदाच्या फुटबॉल हंगामात आतापर्यंत ४१ गोल झळकावलेले आहेत. यांत इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये झळकावलेल्या ३१ गोलांचा समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा