बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाने जामीन केल्यामुळे, त्यांचा तुरुंगातून पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्याप्रकरणी छगन भुजबळ यांना सक्तवसुली महासंचालनालयाकडून (ईडी) १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती.
महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स या व्यवहारातून भुजबळ कुटुंबीयांना मिळालेल्या ८७० कोटी रुपयांबाबत महासंचालनालयाकडून चौकशी सुरू आहे.
छगन भुजबळांसह त्यांचा मुलगा पंकज आणि समीर यांच्यासह १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
यंदा साहित्याचा नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही
जगप्रसिद्ध नोबेल पुरस्कार विजेत्यांची निवड करणाऱ्या स्वीडिश अॅकेडमीतील सदस्यांवर झालेला सेक्स स्कँडलचा आरोप आणि इतर समस्यांमुळे यंदाचा (२०१८) साहित्याचा नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.
स्वीडिश अॅकेडमी यावर्षी पुरस्कार देणार नसून पुढच्यावर्षी २०१९ साली दोन्ही पुरस्कार विजेत्यांची नावाची घोषणा करु असे संस्थेने म्हटले आहे.
लोकांचा अॅकेडमीवरचा विश्वास कमी झाल्यामुळे संस्थेने यावर्षी पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला.
परंपरेनुसार पुरस्कार देण्यात यावा असे काही सदस्यांचे मत होते पण अन्य सदस्यांचा विरोध असल्यामुळे पुरस्कार पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
फ्रेंच फोटोग्राफर जीन क्लाउड अरनॉल्टवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यामुळे स्वीडीश अॅकेडमी अडचणीत सापडली आहे.
जीन क्लाउड अरनॉल्ट अॅकेडमीच्या सदस्या आणि कवियत्री कॅटरीना फ्रोस्टेनसन यांचा नवरा आहे. स्वीडिश अॅकेडमीकडून मिळणाऱ्या पैशावर अरनॉल्ट एक सांस्कृतिक प्रकल्पही चालवायचा.
जगभरात #MeToo कॅम्पेनतंर्गत लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवला जात आहे. याच कॅम्पेनतंर्गत हे प्रकरण समोर आले. अरनॉल्टवर १८ महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केले आहेत.
यापूर्वी १९४३साली दुसऱ्या विश्वयुद्धाच्यावेळी साहित्याचा नोबेल पुरस्कार स्थगित करण्यात आला होता. आता ७५ वर्षानंतर पुन्हा एकदा हा पुरस्कार स्थगित करण्यात आला आहे.
अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दरवर्षी विविध क्षेत्रांमधल्या कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार दिला जातो.
समभागांच्या वायदा व्यवहाराचे तास मध्यरात्रीपर्यंत विस्तारले
भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने फ्युचर्स आणि ऑप्शन्ससारख्या समभागांच्या वायदा व्यवहाराचे तास हे वस्तू वायदा बाजाराशी सुसंगत करताना, ते मध्यरात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत विस्तारले आहेत.
येत्या १ ऑक्टोबरपासून भारतातील गुंतवणूकदार समभागांचे डेरिव्हेटिव्हज्चे सौदे मध्यरात्रीपर्यंत करू शकतील.
सध्या फक्त वस्तू वायदा (कमॉडीटी डेरिव्हेटिव्ह) व्यवहार सकाळी १० ते मध्यरात्री ११.५५ या कालावधीत सुरू असतात.
भांडवली बाजारातील रोखीतील (कॅश) व्यवहार मात्र सध्याच्या पद्धतीप्रमाण दुपारी ३.३० पर्यंतच सुरू राहतील.
बाजारमंचांकडून प्रत्यक्ष व्यवहार तास वाढविले जाण्यापूर्वी जोखीम व्यवस्थापन, सेटलमेंटची प्रक्रिया, मनुष्यबळाची उपलब्धता, कार्यप्रणालीची क्षमता, देखरेख प्रणाली वगैरे तयारीचा ठोस आराखडा ‘सेबी’ला सादर करून औपचारिक संमती घेणे भाग ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा