सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविणारे व्यक्ती : पवनकुमार चामलिंग
भारतातील घटकराज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा बहुमान पवनकुमार चामलिंग यांनी मिळवला आहे.
२१ मे २०१४ रोजी सलग पाचव्यांदा त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते सिक्किम राज्याचे गेली २३ वर्षे ५ महिने इतका प्रदीर्घकाळ मुख्यमंत्री आहेत.
त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकेकाळचे आधारस्तंभ असलेल्या पश्चिम बंगालचे मुख्यमत्री ज्योती बसू यांचा विक्रम मोडला आहे. त्यांनी सलग २३ वर्षे पश्चिम बंगालची धुरा सांभाळली होती.
सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे संस्थापक असलेल्या ६८ वर्षीय पवन चामलिंग यांनी डिसेंबर १९९४मध्ये मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतली.
‘नवे सिक्कीम, आनंदी सिक्कीम’ या आपल्या घोषणेद्वारे त्यांनी राज्याचा कायापालट केला.
सिक्कीममधील याँगयाँग येथे जन्मलेल्या चामलिंग यांनी वयाच्या २२व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला.
१९८३मध्ये याँगयाँगचे सरपंच झाले, तेथून त्यांची कारकीर्द सुरू झाली. १९८५मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले.
दुसऱ्यांदा विजयी झाल्यावर मंत्रिमंडळात उद्योगखात्याची जबाबदारी त्यांच्या सोपविण्यात आली. १९८९ ते ९२ या काळात नरबहादूर भंडारी यांच्या मंत्रिमंडळात ते होते.
१९९३मध्ये त्यांनी सिक्कीम डेमॉक्रेटिक फ्रंटची स्थापना केली. त्यानंतर १९९४, १९९९, २००४, २००९ व २०१४ अशा सलग ५ वेळा त्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून दिला आहे.
१६ मे १९७५ रोजी सिक्किमचा भारतात २२वे राज्य म्हणून समावेश झाला. राज्याच्या गेल्या ४३ वर्षांमध्ये २३ वर्षे एकट्या चामलिंग यांनीच मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे.
मलेशियाच्या पंतप्रधानपदी ९२ वर्षीय महाथीर मोहम्मद
निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर ९२ वर्षीय महाथीर मोहम्मद यांनी मलेशियाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
राजे सुलतान मोहम्मद पाचवे यांनी महाथीर मोहम्मद यांना पंतप्रधानपदाची अधिकृतपणे शपथ दिली.
जगातील लोकशाही मार्गाने निवडून आलेले सर्वात वयोवृद्ध नेते म्हणून ते ओळखले जातील.
यापूर्वी महाथीर यांनी जवळपास २२ वर्षे मलेशियाचे पंतप्रधानपद भूषविले होते. मात्र २००३ साली त्यांच्या पक्षाचा पराभव झाल्यावर त्यांना पायउतार व्हावे लागले होते.
महाथिर यांनी २२२ पैकी ११३ जागांवर विजय मिळवला. तर मावळते पंतप्रधान नजीब रजाक यांच्या बँरिसन नँशनल आघाडीला केवळ ७९ जागा मिळाल्या.
नजीब रजाक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. १ एमडीबी योजनेतून त्यांनी कोट्यवधी रुपये लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
त्यामुळे नजीब रजाक आणि त्यांची पत्नी रोस्माह मॅन्सोर यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
रवी व्यंकटेशन यांचा इन्फोसिसच्या संचालकपदाचा राजीनामा
देशातील दुसऱ्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसच्या स्वतंत्र संचालकपदाचा रवी व्यंकटेशन यांनी राजीनामा दिला आहे.
इन्फोसिससारखी एक भक्कम कंपनी आता एका चांगल्या नेतृत्वाखाली वाटचाल करत असल्याची प्रतिक्रिया देत व्यंकटेशन यांनी सोडचिठ्ठी दिली.
इन्फोसिसमध्ये सहअध्यक्ष राहिलेले कृष्णन हे इन्फोसिसच्या संचालक मंडळात २०११मध्ये सहभागी झाले होते.
त्याचबरोबर ते यापूर्वी मायक्रोसॉफ्ट इंडिया, कमिन्स इंडियाचे अध्यक्षही राहिले आहेत. रॉकफेलर फाऊंडेशनच्या संचालक मंडळावर ते सध्या आहेत.
क्ले कोर्टवर सलग ५०वा सामने जिंकण्याचा नदालचा विक्रम
स्पेनच्या राफेल नदाल याने क्ले कोर्टवर सलग ५०वा सामना जिंकून जॉन मॅकेन्रो यांचा ३४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
मॅकेन्रो यांनी १९८४मध्ये माद्रिद इनडोअर स्पर्धेत विजेतेपद मिळवत क्ले कोर्टवर सलग ४९ सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता.
नदालने माद्रिद खुल्या स्पर्धेतच दिएगो श्वार्टझमन याच्यावर ६-३, ६-४ असा विजय नोंदविला आणि क्ले कोर्टवर सलग ५०वा सामना जिंकण्याची किमया साधली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा