चालू घडामोडी : ३ व ४ मे
विक्रीकर निरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ७ जानेवारी २०१८ रोजी २५१ पदांसाठी घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षेचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला.
- या परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील शिवाजी बालाजी जाकापुरे याचा सर्वाधिक १५६ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक आला आहे.
- ठाण्यातील प्रमोद त्र्यंबक केदार याने मागासवर्गातून, तर सांगली जिल्ह्यातील शीतल अंबाण्णा बंडगर हिने महिलांमधून पहिला क्रमांक मिळविला.
- शिफारशीमध्ये पात्र न ठरलेल्या उमेदवारांना गुणपडताळणीसाठी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या तारखेपासून दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
- यासाठी आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक असल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.
- सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षेसाठी राज्यातून ३ लाख ३० हजार ९०९ उमेदवारांनी परीक्षा दिली होती.
- या परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेसाठी ४ हजार ४३० उमेदवार पात्र ठरले होते. त्यानंतर ७ जानेवारी २०१८ रोजी मुख्य परीक्षा पार पडली.
विराट कोहली काउंटी क्रिकेट खेळणार
- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आगामी काळात सरे या काउंटी क्रिकेट क्लबकडून काउंटी क्रिकेट खेळणार आहे.
- आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर विराट काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे.
- विराट कोहली हा काउंटी क्रिकेट खेळणारा चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, वरुण अॅरॉन यांच्यानंतर चौथा भारतीय कसोटीपटू ठरला आहे.
पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये वाढ : युनेस्को अहवाल
- जगभरात गेल्या पाच वर्षांत पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे जागतिक माध्यम स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या युनेस्कोच्या अहवालात म्हटले आहे.
- २०१२ ते २०१६ या काळात अशा घटनांत ५३० पत्रकारांचा मृत्यू झाला असून त्यात भारतातील १८ पत्रकारांचा समावेश आहे.
- २००७ ते २०११ या काळात ३१६ पत्रकारांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत गेल्या ५ वर्षांत प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांत ६७ टक्के वाढ झाली आहे.
- यापैकी सीरियात सर्वाधिक म्हणजे ८६ पत्रकारांचा बळी गेला. त्याखालोखाल इराक (४६), मेक्सिको (३७), सोमालिया (३६), पाकिस्तान (३०), ब्राझील (२९), येमेन (२१), अफगणिस्तान (२०), होंडारूस (१९), भारत (१८), लीबिया (१७), बांगलादेशात (१०) पत्रकारांचा बळी गेला आहे.
केंब्रिज अॅनालिटिकाचे कामकाज बंद
- भारतीयांची फेसबुकवरील माहिती चोरून गैरवापर करणाऱ्या ब्रिटनच्या केंब्रिज अॅनालिटिकाने आपले सारे कामकाज त्वरित बंद केल्याची घोषणा केली आहे.
- या कंपनीने अमेरिका आणि ब्रिटनमध्ये स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी निवेदन देण्याचीही घोषणा केली आहे.
- २०१३मध्ये स्थापन झालेली केम्ब्रिज अॅनालिटिका ही अमेरिकेतील एक मोठी अॅनॅलिसिस फर्म व मोठ्या प्रमाणावर डेटा पुरवणारी कंपनी आहे.
- केम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीची कार्यालये न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लंडन, ब्राझिल आणि मलेशियामध्ये आहेत.
- या कंपनीवर फेसबुकच्या ५ कोटी युजर्सचा व्यक्तिगत डेटा चोरी करून त्याचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.
- या कंपनीने २०१६मध्ये पार पडलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काम केल्याने त्याची चर्चा झाली होती.
- या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेल्या विजयाचे श्रेय केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीलाही दिले गेले.
- केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात फेसबुकचा वापर करणाऱ्यांची खासगी माहिती सुरक्षित ठेवून तिचा गैरवापर होऊ न देण्यासाठी पुरेसे उपाय न केल्याबद्दल फेसबुकचे संस्थापक व प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी अमेरिकन काँग्रेसपुढे दिलगिरी व्यक्त केली.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी जस्टिन लॅंगर
- ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर जस्टिन लॅंगरची तिन्ही प्रकाराच्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
- दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे मुख्य प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी राजीनामा दिला होता, तेव्हापासून हे पद रिक्त होते.
- लँगर २३ मे रोजी पदाची सूत्रे स्वीकारेल आणि चार वर्षांसाठी ही नियुक्ती राहील. या दरम्यान अॅशेस मालिका, एक विश्वचषक आणि टी-२० विश्वचषकाचे आयोजन असेल.
- प्रशिक्षकपदाचा चांगला अनुभव लॅंगरकडे आहे. बिग बॅश स्पर्धेत लॅंगरने पर्थ स्कॉचर्स या संघाचं प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्याच्या संघाने तीन वेळेस ही स्पर्धा जिंकली होती.
- याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या मुख्य संघाचा सह-प्रशिक्षक म्हणूनही त्याने काही काळासाठी काम पाहिले आहे.
- लॅंगरने ऑस्ट्रेलियाकडून १०५ कसोटी सामने खेळला असून, यामध्ये २३ शतकांच्या सहाय्याने त्याने ७ हजार ६९६ धावा केल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा