चालू घडामोडी : १८ मे

भारतीय वंशाचे भौतिकशास्त्रज्ञ प्रा. ई. सी. जॉर्ज सुदर्शन यांचे निधन

  • भारतीय वंशाचे सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ प्रा. ई. सी. जॉर्ज सुदर्शन यांचे १४ मे रोजी अमेरिकेतील टेक्सास येथे निधन झाले.
  • क्वांटम झेनो परिणाम नावाच्या विषयात त्यांचे संशोधन होते. पुंजभौतिकीत संशोधन करणाऱ्या सुदर्शन यांना नोबेल पारितोषिकासाठी किमान ६ वेळा शिफारस होऊनही तो मान हुलकावणी देऊन गेला.
  • सुदर्शन यांचा जन्म केरळातील कोट्टायम जिल्हय़ात पल्लम येथे १९३१मध्ये झाला. ते टेक्सास विद्यापीठात चाळीस वर्षे प्राध्यापक होते.
  • मद्रास विद्यापीठातून मास्टर्स पदवी घेऊन त्यांनी काही काळ होमी भाभा यांच्या समवेत टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम केले होते.
  • १९५८मध्ये रॉचेस्टर विद्यापीठातून त्यांनी पीएचडी केली. नंतर अमेरिकन नोबेल विजेते सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ ज्युलियन श्वेविंगर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्याची त्यांना संधी मिळाली.
  • २००५मध्ये नोबेल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती, पण सुदर्शन-ग्लॉबर सादरीकरण करणाऱ्या रॉय जे ग्लॉबर यांना नोबेल देण्यात आले, पण सुदर्शन यांना मात्र ते मिळाले नाही.
  • प्रकाशीय सुसंगततेचा पुंज सिद्धान्त त्यांनी मांडला होता. सुदर्शन यांना नोबेल न दिल्याने त्या वेळी नोबेल समितीवर टीका झाली, पण तीनपेक्षा जास्त व्यक्तींना एका वेळी नोबेल देता येत नाही असे स्पष्टीकरण समितीने केले.
  • सुदर्शन यांचे कणभौतिकीतील व्ही-ए थिअरीतही संशोधन होते, पण त्यातही नंतर हे संशोधन रिचर्ड फेनमन व मरे गेल मान यांनी पुढे नेले व त्यांना नोबेल मिळाले.
  • भारत सरकारने २००७मध्ये त्यांना पद्मविभूषण किताब दिला. डिरॅक पदक त्यांना २०१०मध्ये मिळाले होते.
  • सी. व्ही. रामन पुरस्कार, बोस पदक, केरळ सरकारचा विज्ञान तंत्रज्ञान पुरस्कार असे सन्मान त्यांना मिळाले.
  • त्यांनी रॉचेस्टर विद्यापीठ, सायराक्युज विद्यापीठ, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथमेटिकल सायन्सेस या संस्थांमध्ये त्यांनी काम केले. अमेरिकन फिजिकल सोसायटीचे ते फेलो होते.

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश न्या. जस्ती चेलमेश्वर निवृत्त

  • देशाचे सरन्यायाधीश होण्याची संधी हुकल्याचे शल्य व नाराजी मनात ठेवून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश न्या. जस्ती चेलमेश्वर १८ मे रोजी न्यायालयीन कामकाजातून निवृत्त झाले.
  • गेली साडेसहा वर्षे ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. सरन्यायाधीशांच्या विरोधात जाहीर पत्रकार परिषद घेणारे न्यायाधीश म्हणून ते निवृत्तीनंतरही ते दीर्घकाळ स्मरणात राहतील.
  • न्या. दीपक मिश्रा आणि न्या. जस्ती चेलमेश्वर यांची एकाच दिवशी नेमणूक झाली असल्याने या दोन न्यायाधीशांपैकी एक सरन्यायाधीश झाला व दुसरा होऊ शकला नाही.
  • न्या. चेलमेश्वर व न्या. मिश्रा यांचा एकाच दिवशी शपथविधी झाला. परंतु न्या. मिश्रा यांनी आधी शपथ घेतल्याने सेवाज्येष्ठतेत ते ज्येष्ठ ठरले आणि देशाचे सरन्यायाधीश झाले.

आशियाई बॅडमिंटन महासंघाच्या उपाध्यक्षपदी हिमांता बिस्वा सरमा

  • भारतीय बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष हिमांता बिस्वा सरमा यांची निवड आशियाई बॅडमिंटन महासंघाच्या उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे.
  • बीएसीची वार्षिक सर्वसाधारण बैठक बँकॉक येथे पार पडली. त्यात सरमा यांची या पदावर निवड करण्यात आली.

अमेरिका व ग्वाटेमालाचा दूतावास तेल अविवमधून जेरुसलेमला

  • अमेरिकेने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर १४ मे रोजी आपला दुतावास तेल अविवमधून तिकडे हलवला.
  • त्यानंतर अमेरिकेच्या या निर्णयाचे अनुकरण करत ग्वाटेमालानेही आपला दुतावास तेल अविवमधून जेरुसलेमला आणला आहे.
  • त्यामुळे अमेरिकेच्या या निर्णयाचे अनुकरण यापुढे इतर देशही करतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.
  • अमेरिकेच्या निर्णयानंतर पॅलेस्टीनी नागरिकांनी गाझा परिसरात मोठ्या प्रमाणात निदर्शने केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना इस्रायलकडून गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये ६२ नागरिकांचे प्राण गेले.
  • त्यामुळे ग्वाटेमालाबरोबर इतर देशांनीही जेरुसलेमला मान्यता दिली तर तणाव वाढीस लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
  • इस्रायल १९४८साली स्थापन झाल्यावर त्याला मान्यता देणारा ग्वाटेमाला हा दुसरा देश होता. इस्रायल आणि ग्वाटेमाला यांच्या मैत्रीचा इतिहासही मोठा आहे.
  • ग्वाटेमालाने घेतलेल्या निर्णयानंतर पेरुही मे महिन्याच्या शेवटपर्यंत आपला दुतावास जेरुसलेमला नेण्याची तयारी करत असल्याची घोषणा पेरुने केली आहे.
  • जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून कोणत्याही देशाने मान्यता दिली नव्हती. ट्रम्प प्रशासनाने डिसेंबर २०१७मध्ये जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली. त्यानंतर संयुक्त राष्ट्रामध्ये तसा प्रस्तावही मांडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा