चालू घडामोडी : १६ मे
बृहन्मुंबईला देशातील सर्वात स्वच्छ राजधानीच्या शहराचा मान
- केंद्र सरकारतर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षण स्पर्धेत बृहन्मुंबई महापालिकेला देशातील सर्वात स्वच्छ राजधानीच्या शहराचा मान मिळाला.
- नागपूर, परभणी व सासवडसह राज्यातील ८ शहरांनी विविध गटांत पारितोषिके मिळवली.
- राष्ट्रीय पातळीवर हागणदारीमुक्ती व कचरा व्यवस्थापनात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या राज्यांत महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकाविला.
- राष्ट्रीय पातळीवरील अव्वल तीन स्वच्छ शहरांत इंदूर व भोपाळ या मध्यप्रदेशातील दोन शहरांनी पहिले दोन क्रमांक पटकाविले, तर चंडीगड तिसऱ्या क्रमांकावर आले.
- गोव्याची राजधानी पणजीलाही स्वच्छ राजधानी गटात पारितोषिक मिळाले आहे. इंदूरने तर सलग दुसऱ्या वर्षी देशातील सर्वांत स्वच्छ महानगराचा मान मिळविला आहे.
- एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांत पाचगणी, सासवड व शेंदूरजनाघाट ही राज्यातील तीन शहरे विजेती ठरली आहेत.
- केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीप पुरी यांनी स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या ५२ शहरांची नावे जाहीर केली.
- २०१६पासून सुरू झालेल्या स्वच्छ शहरे व महानगरांच्या या स्पर्धेत यंदा ४२०९ छोट्या मोठ्या शहरांनी सहभाग नोंदविला.
- २ ऑक्टोबर २०१९पर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले, तरी याच वर्षी दोन ऑक्टोबरपर्यंत ते गाठण्याचे लक्ष्य केंद्राने राज्यांसमोर ठेवले आहे.
हीना सिद्धूला हॅनोवर आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक
- भारतीय नेमबाज हीना सिद्धूने हॅनोवर आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये सुवर्णपदक पटकावले, तर पी. हरी निवेताने कांस्यपदकाची कमाई केली.
- हिनाने अंतिम फेरीत शानदार कामगिरी केली. ती शेवटी फ्रान्सच्या मॅथिल्डे लामोलेविरुद्ध टायब्रेकमध्ये सरशी साधत सुवर्णपदक पटकावले. निवेता २१९.२ गुणांसह कांस्यपदकाची मानकरी ठरली.
- हीनाने गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल इव्हेंटमध्ये सुवर्ण आणि १० मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये रौप्यपदक पटकावले होते.
डॉ. जोआन कोरी यांना ग्रबर जेनेटिक्स पुरस्कार
- जनुक वैज्ञानिक व नामांकित वनस्पती जीवशास्त्रज्ञ डॉ. जोआन कोरी यांना ‘ग्रबर जेनेटिक्स पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.
- वनस्पती जीवशास्त्रात गेली अडीच दशके त्यांनी केलेले काम मानवतेला पुढे घेऊन जाणारे आहे त्यामुळेच त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे.
- वनस्पती जीवशास्त्राच्या मदतीने जागतिक तापमानवाढीच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले. यात वनस्पतींच्या कार्बन शोषून घेण्याच्या क्षमतेवर भर दिलेला असतो.
- वनस्पतींच्या विकासातील मूलभूत नियामक तसेच जैवरासायनिक प्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला आहे.
- हवेतील कार्बन डायऑक्साइड जास्त प्रमाणात शोषून घेणाऱ्या वनस्पती तयार करणे, दुष्काळ व पुरात टिकू शकतील अशा वनस्पतींची निर्मिती ही कोरी यांच्या संशोधनाची वैशिष्टय़े आहेत.
- वीसपट अधिक कार्बन शोषणाऱ्या गवतासारख्या वनस्पतीची निर्मिती त्या करीत असून त्यासाठी ५० दशलक्ष डॉलर्स व १० वर्षांचा कालावधी लागेल.
- कोरी यांनी काही वनस्पती सावलीत प्रकाशाशिवाय वाढवण्याचा मार्ग शोधला आहे.
- ‘हार्नेसिंग प्लांटस इनिशिएटिव्ह’ हा त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेला संशोधन कार्यक्रम आहे. हवामान बदल व तापमानवाढीच्या मुद्द्यावर यातून त्या काम करीत आहेत.
- साल्क इन्स्टिटय़ूट फॉर बायॉलॉजिकल स्टडीज या संस्थेत त्या रेणवीय वनस्पती व पेशी जीवशास्त्र विभागाच्या संचालक म्हणून काम करतात.
- यूएस अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, जर्मन नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, रॉयल सोसायटी ऑफ लंडन या अनेक संस्थांच्या त्या सदस्य आहेत.
- कुमो सायन्स इंटरनॅशनल अॅवॉर्ड, जेनेटिक्स सोसायटी ऑफ अमेरिका मेडल, सायंटिफिक अमेरिकन रीसर्च लीड इन अॅग्रिकल्चर असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा