राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आपल्या दीर्घ आजाराला कंटाळून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
फिटनेसवर प्रचंड भर देणारे हिमांशू रॉय यांना हाडांचा कॅन्सर झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती.
अमेरिकेत जाऊन त्यांनी उपचारही घेतले होते. त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत होती. त्यामुळेच त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली.
गुन्हे विभागामध्ये काम करताना सगळ्यांना जपणारा, सहकाऱ्यांना मोकळिक देणारा व बॉडी बिल्डर ऑफिसर अशी हिमांशू रॉय यांची ओळख होती.
१९८८च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी होते. सेंट झेविअर्स या महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले.
त्यांनी दहशतवादापासून ते खूनाच्या गंभीर गुन्ह्याची संवेदनशील प्रकरणे हाताळली होती. मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून रॉय यांची कारर्किद अत्यंत यशस्वी ठरली होती. त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केली होती.
२०१३मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणी त्यांच्या तपासामुळेच विंदू दारा सिंगला अटक झाली होती.
पत्रकार जे डे हत्या प्रकरणातील तपासात हिमांशू रॉय यांचा मोठा वाटा होता. याशिवाय अजमल कसाबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणीही हिमांशू रॉय यांच्याच नेतृत्त्वात झाली होती.
२०१४साली मुंबईच तत्कालिन पोलीस आयुक्त राकेश मारीया यांच्यासह हिमांशू रॉय यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. झेड प्लस दर्जाची सुरक्षा मिळालेले ते मुंबई पोलीस दलातील पहिले अधिकारी होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेपाळ दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ११ व १२ मे रोजी दोन दिवसीय नेपाळ दौरा पाडला. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या निमंत्रणावरुन मोदी नेपाळला गेले होते.
या दोन दिवसीय दौऱ्यात मोदींनी तीन तीर्थस्थळांना भेटी दिल्या तसेच एका प्रकल्पाचे भूमिपूजनही केले. याशिवाय दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करारही करण्यात आले.
पंतप्रधानपदी आल्यापासून मोदी यांची गेल्या ४ वर्षातील ही तिसरी नेपाळ भेट आहे. तसेच नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भारताकडून प्रथमच हा उच्च स्तरीय दौरा होता.
भारत आणि नेपाळमध्ये प्राचीन काळापासून सांस्कृतिक संबंध आहेत. रणनितीक दृष्टीकोनातून नेपाळ भारतासाठी अत्यंत महत्वाचा देश आहे पण अलीकडच्या काळात नेपाळवर चीनचा प्रभाव वाढू लागला आहे.
तसेच दोन वर्षांपुर्वी मधेसी समुदायाच्या निदर्शनांनंतर तयार झालेल्या कोंडीनंतर दोन्ही देशांमध्ये काही गैरसमज आणि तणावाचे प्रसंग निर्माण झाले होते.
त्यामुळे भारत-नेपाळ संबंध अधिक दृढ करणे हा मोदींच्या दौऱ्यामागचा महत्वाचा उद्देश होता.
या भेटीदरम्यान नेपाळ आणि भारत यांच्यामध्ये रेल्वेमार्ग, अंतर्गत जलवाहतुक, कृषीविषयक मुद्दे, पंचेश्वर बहुउद्देशिय धरण प्रकल्प यावर चर्चा झाली.
सीतेचे माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनकपूरच्या जानकी मंदिरात मोदी यांनी पूजाही केली, तसेच त्यांनी राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांचीही भेट घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा