चालू घडामोडी : २४ मे
मणिपूरमध्ये पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन होणार
- मणिपूरमधील पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याच्या वटहुकुमाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
- या विद्यापीठामध्ये क्रीडा विज्ञान, क्रीडा तंत्रज्ञान आणि उच्च कामगिरी प्रशिक्षण यांवर लक्ष देण्यात येणार आहे. तसेच अॅथलीट आणि प्रशिक्षकांसाठी विविध अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहेत.
- मणिपूर सरकारने या प्रस्तावित विद्यापीठाला या आधीच जागा दिली आहे. त्यामुळे वटहुकुमावर राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर कार्यवाही वेगाने होईल.
अतुल गोतसुर्वे उत्तर कोरियात भारताचे राजदूत
- महाराष्ट्राचे सनदी अधिकारी अतुल गोतसुर्वे यांची उत्तर कोरियात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे.
- मूळचे सोलापूरचे असलेल्या गोतसुर्वे यांचे यांनी पुण्याच्या एमआयटीमधून बीई व सीओईपीमधून एमई केले आहे. पुण्यातूनच त्यांनी एलएलबी पूर्ण केले.
- याआधी त्यांनी भूतान, मेक्सिको तसेच क्युबामध्ये काम केले असून, ते काही काळ पुण्यातील पासपोर्ट कार्यालयाचे प्रमुखही होते.
- भारत व उत्तर कोरिया यांच्यातील संबंध सुधारत असताना व काही प्रमाणात व्यापार वाढत असताना, गोतसुर्वे यांची झालेली नेमणूक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.
आंतरराष्ट्रीय नेमबाजी वर्ल्डकपमध्ये तेजस्विनी सावंतला सुवर्ण
- ऑस्ट्रेलियातील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य अशा दोन पदकांची कमाई करणाऱ्या तेजस्विनी सावंतने म्युनिक, जर्मनी येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी वर्ल्डकपमध्ये ५० मी. रायफल प्रोन प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
- उदयोन्मुख नेमबाज अंजुम मुदगिलला (६२१.२) मागे टाकून तिने ६२१.४ गुणांसह हे सुवर्ण जिंकले. तर अंजुम मुदगिलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
- पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात चेन सिंगने रौप्यपदक विजेती कामगिरी केली. त्याने ६२७.९ गुणांची कमाई केली.
प्रेस कौन्सिलच्या अध्यक्षपदी सी. के. प्रसाद यांची पुनर्नियुक्ती
- सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी. के. प्रसाद यांची दुसऱ्यांदा प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
- नोव्हेंबर २०१४पासून प्रसाद यांनी ३ वर्षे प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया या मीडिया वॉचडॉगचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते. न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांच्या जागी प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली होती.
- उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने प्रसाद यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा नियुक्ती केली आहे.
उत्तर कोरियाकडून स्वतःचा अणवस्त्र चाचणी तळ नष्ट
- कोणाच्याही मनात संशय राहू नये यासाठी खास परदेशी पत्रकारांच्या उपस्थितील उत्तर कोरियाने त्यांचा अणवस्त्र चाचणी तळ नष्ट केला आहे.
- उत्तरपूर्वेला डोंगररांगांमध्ये उत्तर कोरियाचा हा चाचणी तळ होता. उत्तर कोरियाने हा तळ नष्ट करताना आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना निमंत्रण दिले नाही.
- विविध आर्थिक आणि अन्य निर्बंधांचा सामना करणाऱ्या उत्तर कोरियाने आपल्या आक्रमकतेला लगाम घातली असून कट्टर हाडवैर असलेल्या दक्षिण कोरिया आणि अमेरिकेबरोबर चर्चा सुरु केली आहे.
- मागच्या काही वर्षात उत्तर कोरियाने सातत्याने अणवस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचण्या केल्याने जागतिक तणाव निर्माण झाला होता.
- पण आता उत्तर कोरियाने अणवस्त्र चाचणी तळच नष्ट करुन संपूर्ण जगाला सकारात्मक संदेश दिला आहे. त्यामुळे संशयाला जागा उरतेच.
- हा अणवस्त्र चाचणी तळ नष्ट केल्याचे जाहीर केल्यानंतर काही तासातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन बरोबरची १२ जूनला सिंगापूरमध्ये होणारी नियोजित बैठक रद्द केली आहे.
- ट्रम्प यांनी अचानक घेतलेली माघार हा एक मोठा झटका आहे. जागतिक शांततेच्या दृष्टीकोनातून ही बैठक होणे महत्वाचे होते.
- उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा : किम जोंग उन
न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या अध्यक्षपदी स्टॅसी कनिंगहॅम
- न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या अध्यक्षपदी स्टॅसी कनिंगहॅम यांची निवड करण्यात आली आहे.
- या स्टॉक एक्स्चेंजच्या २२५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक महिला या सर्वोच्च पदावर विराजमान झाली आहे. स्टॅसी या सध्या न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या मुख्य संचालन अधिकारी होत्या.
- नॅसडॅक व न्यूयॉर्क शेअर बाजार हे दोन्ही आता महिलांच्या हातात आहेत. सध्या नॅसडॅकच्या मुख्य कार्यकारी ॲडेना फ्रीडमन या महिलाच आहेत.
- त्या कनिंगहॅम या लेहाय विद्यापीठातून उद्योग अभियांत्रिकीत बीएस झालेल्या असून नंतर त्यांनी न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये काम सुरू केले.
- १९६७मध्ये या संस्थेत मुरियल सिबर्ट यांच्या रूपाने एका महिलेला पहिल्यांदा स्थान मिळाले होते. त्यानंतर कॅथरिन किनी या २००२मध्ये सहअध्यक्ष झाल्या होत्या.
नागपूर मनपा व युरोपियन युनियनमध्ये करार
- स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकास कामे करण्यासाठी नागपूर महापालिका आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये इंटरनॅशनल अर्बन को-ऑपरेशन (आययूसी) या कार्यक्रमांतर्गत भागीदारी करार करण्यात आला आहे.
- नागपूर आणि जर्मनीतील कार्लस्रू या शहरांच्या शहरी विकासातील सहकार्य क्षेत्र ओळख आणि विस्तारासाठी हा करार करण्यात आला आहे.
- नागपूर आणि कार्लस्रू हे संयुक्तपणे विशेषत: शाश्वत शहरी विकास आणि भारतातील स्मार्ट सिटी मिशनच्या गरजेसंदर्भात स्थानिक कृती योजना तयार करणार आहेत.
- या करारावर स्वाक्षरी करण्याआधी आययूसीचे भारताचे प्रतिनिधी आशिष वर्मा (शाश्वत विकास तज्ज्ञ) यांनी प्रकल्पाबद्दल सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा