चालू घडामोडी : १९ मे

प्रख्यात तामिळ लेखक बालाकुमारन यांचे निधन

 • प्रख्यात तामिळ कादंबरीकार व चित्रपटकथा लेखक बालाकुमारन यांचे १५ मे रोजी निधन झाले.
 • त्यांचा जन्म तंजावर जिल्ह्यात ५ जुलै १९४६ रोजी झाला. साहित्य हा त्यांचा आवडता प्रांत होता.
 • सुरुवातीला ते एका कृषी कंपनीत ते लघुलेखक होते. ती नोकरी त्यांनी सोडली. नंतर त्यांनी चित्रपटांसाठी कथा व संवाद लिहिले.
 • ‘मर्क्युरी पोक्कल’ (मर्क्युरी ब्लॉसम्स) ही त्यांची पहिली कादंबरी खूप गाजली. त्यात एका कामगाराची प्रेमकथा रेखाटली होती.
 • वाझी मयक्कम ही त्यांची पहिली लघुकथा तर कनायाझी या नियतकालिकात त्यांची ‘पुढु कविधाई: द टेलिफोन क्लीनर’ ही पहिली धारावाहिक कादंबरी प्रकाशित झाली.
 • राज राजा चोझान यांच्यावर ‘उदयार’ या पुस्तकाचे सहा खंड त्यांनी लिहिले. त्याच्या किमान पंधरा आवृत्त्या तरी पूर्ण झाल्या आहेत.
 • आनंदविकटन, कालक्की, कुमुदम या नियतकालिकांतून त्यांनी केलेले लेखन नंतर छोटेखानी कादंबऱ्यांच्या रूपात प्रसिद्ध झाले.
 • नायकन, गुना, बाशा, जेन्टलमन या चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा लिहिल्या. २००हून अधिक कादंबऱ्या व १०० लघुकथासंग्रह अशी त्यांची ग्रंथसंपदा.
 • त्या काळात ‘काचाताथापारा’ हे बंडखोर साहित्य नियतकालिक प्रसिद्ध होत असे, त्याच्या संस्थापकांपैकी ते एक होते.
 • तामिळनाडू सरकारच्या कलईमामानी पुरस्कारासह त्यांना इतरही अनेक सम्मान मिळाले होते.

ब्रिटनचा राजकुमार हॅरी आणि मेगन मार्कल यांचा विवाहसोहळा संपन्न

 • ब्रिटनचा राजकुमार प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल यांचा शाही विवाहसोहळा १९ मे रोजी थाटामाटात संपन्न झाला आहे.
 • विंडसर कॅसलमधील सेंट जॉर्ज चॅपलमध्ये ६०० खास पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला आहे.
 • या शाही विवाह सोहळ्यावर सुमारे २९३ कोटी रुपये खर्च करण्यात आला. हा खर्च सरकारी तिजोरीतून केला जाणार आहे.
 • विन्डसर कॅसलमध्ये विवाहबद्ध होणारे हॅरी-मेगनहे राजघराण्यातील सोळावे जोडपे ठरले आहे.
 • हॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही या लग्नाला हजेरी लावली.
 • प्रिन्स हॅरी हा इंग्लडची राणी एलिझाबेथ द्वितीयचा नातू आणि वेल्सचे राजकुमार चार्ल्स आणि डायना यांचा लहान मुलगा आहे.
 • हॉलीवूडची ३६ वर्षीय अभिनेत्री मेगन मार्केलचे हे दुसरे लग्न आहे. २०११मध्ये तिने अमेरिकन निर्माता ट्रेवर एंजलसनसोबत लग्न केले होते.

सीआयएच्या संचालकपदी जीना हास्पेल

 • अमेरिकेतील गुप्तचर संस्था सीआयएच्या संचालकपदी प्रथमच जीना हास्पेल या महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • हास्पेल सध्या सीआयएच्या उपप्रमुख होत्या. सीआयएकडून कैद्यांच्या चौकशीसाठी वापरण्यात आलेल्या अतिशय क्रूर पद्धतीतील त्यांच्या सहभागामुळे हास्पेल वादग्रस्त ठरला होत्या.
 • मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या संसद सदस्यांनी हास्पेल यांच्या नियुक्तीला विरोध केला होता.
 • सीआयएच्या ७० वर्षांच्या इतिहासात संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती होणाऱ्या हास्पेल या पहिल्याच महिला आहेत.

1 टिप्पणी: