चालू घडामोडी - २७ मार्च २०१५
 
- अंतराळ क्षेत्रात मोलाची कामगिरी करून, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव उंचावणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थातच इस्रोला महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
- इस्रोने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भारताचे मंगळ यान पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत पाठविले होते. अमेरिका आणि रशियालाही पहिल्या टप्प्यात ही कामगिरी करता आली नव्हती. 
- त्यानंतर इस्रोने भारताला दिशादर्शक क्षेत्रातही मजबुती प्रदान करीत आतापर्यंत ‘आयआरएनएसएस’  या श्रेणीतील चौथा उपग्रह नुकताच यशस्वीपणे अंतराळात प्रक्षेपित केला होता.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कारासाठी इस्रोची निवड केली आहे. या समितीतील अन्य सदस्यांमध्ये सरन्यायाधीश एच. एल. दत्तू, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, भाजपाचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी आणि गोपालकृष्ण गांधी यांचा समावेश आहे.
- गांधी शांतता पुरस्कार :
- महात्मा गांधी यांच्या १२५व्या जन्म शताब्दीनिमित्त भारत सरकारने १९९५ सालापासून गांधी शांतता पुरस्कार देण्यात येतो. 
- स्वरूप : एक करोड रुपये व प्रशस्तिपत्र 
- या पुरस्कारची निवड समितीत पाच व्यक्ति म्हणजेच, भारतीय पंतप्रधान (अध्यक्ष), लोकसभा विपक्ष नेता, भारतीय मुख्य न्यायाधीश व इतर दोन प्रख्यात व्यक्तिंचा समावेश आहे.
- आतापर्यंत हा पुरस्कार १३ व्यक्ती/संस्थांना मिळाला असून इस्रो हा पुरस्कार प्राप्त करणारी १४ वी संस्था आहे. 
- पहिला गांधी शांतता पुरस्कार १९९५ साली सर्वप्रथम डॉ.जूलियस न्यरेरे (टांझानियाचे पहिले राष्ट्रपती) यांना देण्यात आला. रामकृष्ण मिशन, बाबा आमटे, नेल्सन मंडेला इत्यादींना हा पुरस्कार मिळालेला आहे. 
- राजस्थान सरकारने पंचायतराज संस्थांच्या निवडणुकीतील उमेदवारांसाठी किमान शिक्षणाची अट लागू केली आहे. अशी तरतूद करणारे राजस्थान हे पहिले राज्य ठरले आहे.
- राजस्थान पंचायत राज कायदा १९९४ मध्ये दुरुस्ती करून नवीन तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे.
- ऑस्ट्रेलियाच्या ७ बाद ३२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ २३३ धावांत गारद झाला आणि भारताचे विश्वचषक २०१५ मधील आव्हान संपुष्टात आले.
- सातव्यांदा उपांत्य फेरी गाठणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला.
- १९७० आणि ८०च्या दशकांत एचआयव्ही आणि हिपॅटायटिस सी ची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करताना दूषित रक्ताचा वापर केल्या गेल्याबद्दल ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी आज त्या हजारो रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाइकांची जाहीर माफी मागितली.
- इराकमधील तिक्रित शहरात आणि शहराभोवती अमेरिकन लढाऊ विमानांनी हल्ले सुरू केले आहेत. यामुळे आता इराकी फौजा आणि दहशतवादी यांच्यातील युद्धात अमेरिकाही थेट सहभागी झाली आहे.
- इराणचा पाठिंबा असलेल्या नागरी सैन्याने यापूर्वीच इराकी फौजांना हैराण केले आहे. तिक्रित शहरासाठीच्या संघर्षाला चार आठवडे झाले असून तो न थांबल्यामुळे इराक सरकारने अमेरिकेकडे मदत मागितली होती.
- येमेनचे अध्यक्ष अब्द-रब्बू मन्सूर हदी यांनी अडेन येथील आपला आश्रय सोडून सौदी अरेबियाला प्रयाण केले. दक्षिण येमेनमधील अडेन शहराच्या भोवताली हौती बंडखोर फौजांनी हल्ले सुरू केले आहेत. 
- शिया हौतीस व इतर बंडखोर गटांनी येमेनच्या बहुतांश भागावर ताबा मिळवत अध्यक्ष हदी यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
- सौदी अरेबिया आणि अरबी आघाडीच्या लढाऊ विमानांनी हौतीने ताबा मिळविलेल्या राजधानी सना येथे शिया हौती व त्यांच्या आघाडीच्या सशस्त्र तुकड्यांवर हल्ले केले. 
- जर्मनविंगच्या ए ३२० क्रमांकाच्या विमानाचा सहचालकानेच हेतूपूर्वक अपघात घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. 
- जर्मनीतील २८ वर्षाच्या ऍड्रेज लुब्तीज असे त्या सहचालकाचे नाव आहे. विमानप्रवासाचा केवळ ६३० तासांचा अनुभव त्याला होता. तसेच तो सप्टेंबर २०१३ मध्येच जर्मनविंगमध्ये रूजू झाला होता.
 
 
 
 
 
 
 
 
  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा