चालू घडामोडी - ७ एप्रिल २०१५
- ७ एप्रिल : जागतिक आरोग्य दिन
- जागतिक आरोग्य संघटना ही जगातील आरोग्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे. १९५० पासून ७ एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.
- जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी ७ एप्रिल रोजी एक घोषवाक्य जाहीर करीत असते. यावर्षी ‘अन्न ठेवूया सुरक्षित, शेतापासून ताटापर्यंत’ हे घोषवाक्य जाहीर केले आहे.
- अन्न पदार्थांमध्ये होणारी अनेक प्रकारची भेसळ, कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर, यामुळे अन्न असुरक्षित होते आणि त्याच्या सेवनापासून होणारे धोके टाळणे हा यावर्षीच्या आरोग्य दिनाचा मुख्य उद्देश आहे.
- दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. (डायल)ला प्रतिष्ठेचा ‘गोल्डन पिकॉक नॅशनल क्वालिटी ऍवॉर्ड’ २०१५ साठी जाहीर झाला आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुणवत्तापूर्ण सुविधा पुरविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन ‘डायल’ला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- हा पुरस्कार २० एप्रिल रोजी दुबई येथे होणाऱ्या ‘२५ व्या वर्ल्ड काँग्रेस ऑन लिडरशीप फॉर बिझनेस एक्स्लन्स ऍण्ड इनोव्हेशन’ ह्या वार्षिक कार्यक्रमात प्रदान करण्यात येईल.
- प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा राज्य सरकारच्या ताब्यात येण्यासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये करार झाला आहे. हा करार झाल्याने आता इंदू मिलमध्ये लवकरच बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरु होऊ शकेल.
- इंदू मिलची जागा केंद्रीय वस्त्रोद्योग खात्यांतर्गत येत होती. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, महाराष्ट्र सरकार व राष्ट्रीय वस्त्र निगम यांच्यात त्रिपक्षीय करार झाला. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार यांनी करारावर स्वाक्षरी केली.
- या करारानंतर आता इंदू मिलच्या १२ एकरच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधले जाणार आहे.
- पर्यटकांचे आकर्षण असलेले आशियातील सर्वांत मोठे ट्युलिप गार्डन नागरिकांसाठी खुले करण्यात आले.
- दल सरोवराच्या किनाऱ्यावर असलेल्या गार्डनचे उद्घाटन जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी केले.
- जवळपास ५३ प्रकारचे दहा लाख ट्युलिप फुले पर्यटकांना गार्डनमध्ये पाहावयास मिळतील.
- ट्युलिप फुलाचे सरासरी आयुर्मान तीन ते चार आठवडे इतके असते. मात्र मुसळधार पाऊस किंवा अधिक उष्णतेमुळे त्यावर परिणाम होऊ शकतो.
- वने आणि पर्यावरण मंत्रालयाने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हवेच्या प्रदूषणावर देखरेख ठेवण्यासाठी नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
- यामुळे नागरिकांमध्ये प्रदूषणाबाबत जागृती निर्माण करणे, हादेखील एक उद्देश आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या सेवेला सुरवात झाली होती.
- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आयआयटी कानपूर यांच्या साह्याने तज्ज्ञांनी एअर क्वालिटी इंडेक्स तयार केला आहे.
- अंमलबजावणी कशी करणार?
- सध्या दिल्ली, आग्रा, कानपूर, लखनौ, वाराणसी, फरीदाबाद, अहमदाबाद, चेन्नई, बंगळूर आणि हैदराबाद या दहा शहरांमध्ये या सेवेला सुरवात.
- तसेच २२ राज्यांच्या राजधान्या आणि दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ४४ शहरांचाही यात समावेश होणार.
- रिअल टाइम तत्त्वावर प्रदूषणाबाबत माहिती समजणार.
- नागरिकांच्या सोयीसाठी ‘एक क्रमांक, एक रंग आणि एक विश्लेषण’ असे याचे स्वरूप असणार आहे.
- या दहा शहरांमध्ये सातत्याने निरीक्षण करणारी सहा ते सात केंद्रे उभारण्यात येणार.
- भारतीय पॅरालिंपिक समितीचे अध्यक्ष राजेश तोमर यांना अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले आहे.
- गेल्या महिन्यात गाझियाबादमध्ये झालेल्या १५ व्या राष्ट्रीय पॅरालिंपिक स्पर्धेत खेळाडूंना आवश्यक त्या सोईसुविधा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे बंगळूरमध्ये झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत तोमर यांना अध्यक्षपदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.
- रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) नवीन आर्थिक वर्षाचे पहिले द्वैमासिक पतधोरण जाहीर
- एसएलआर : २१.५० टक्के
- रेपो दर : ८.५० टक्के
- रिव्हर्स रेपो दर : ७.५० टक्के
- सीआरआर : ४ टक्के
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदी राजीव शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- यापूर्वी, २०१३ मध्ये शुक्ला ‘आयपीएल’चे अध्यक्ष होते. मात्र, त्यावेळी आयपीएलमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर त्यांनी राजीनामा दिला होता.
- मागील वर्षी रणजिब बिस्वाल यांच्याकडे आयपीएलच्या अध्यक्षपदाची सूत्रे होती.
- बीसीसीआयच्या अन्य समित्यांमधील नेमणूका
- संघनिवड समितीचे अध्यक्ष : संदीप पाटील
- तांत्रिक समितीचे अध्यक्ष : अनिल कुंबळे
- वित्तीय समितीचे अध्यक्ष : जोतिरादित्य शिंदे
- भारतीय संघाचे दौरे व वेळापत्रक ठरवणाऱ्या समितीचे अध्यक्ष : गोकाराजू गंगाराजू
- संलग्नता समितीचे अध्यक्ष : अनुराग ठाकूर
- भारतीय ग्रँडमास्टर द्रोणावली हरिकाने स्वीडनची ग्रँडमास्टर पिया क्रॅमलिंगसमवेत विश्व महिला बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. दोघींनीही या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारल्याने त्यांना हे पदक मिळाले.
- या स्पर्धेचे जेतेपद मिळविणाऱ्या युक्रेनच्या मारिया मुझीचुककडून हरिकाने उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले होते.
- अल्बर्ट आइनस्टाइनने मांडलेल्या सापेक्षतावादी सिद्धांताची पडताळणी करण्याच्या प्रयोगामुळे ब्रिटनमधील प्रताप सिंग या १५ वर्षीय भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यास इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
- प्रतापच्या या प्रयोगाबद्दलचा लेख इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सतर्फे प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकेत प्रसिद्ध होणार आहे.
- युद्धजर्जर येमेनमधून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका करणाऱ्या भारताकडे आता जगभरातील २६ देशांनी आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी मदतीचा हात मागितला आहे.
- येमेनमध्ये अडकलेल्या सुमारे ४००० हजार नागरिकांपैकी ३३०० भारतीय नागरिकांची आणि २२० परदेशी नागरिकांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे.
- भारत सरकारने नौदल व हवाईदलाच्या मदतीने येमेनमधील एडन बेटावरून भारतीय नागरिकांना जिबुती येथे आणून सुखरूप भारतात आणले आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग स्वतः जिबुतीमध्ये भारतीय नागरिकांना मदत करत आहेत.
- पाकिस्तान सरकारही आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत असून, पाकिस्तानी जहाजातून नुकतीच अकरा भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली होती.
- सिलिकॉन व्हॅलीतील इतर बांधकामाच्या तुलनेत अल्प काळात तसेच सर्वात कमी खर्चात फेसबुकने नवी इमारत उभी केली असल्याची माहिती फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.
- कॅनडातील ख्यातनाम आर्किटेक्ट फ्रॅंक गेहरी यांनी या इमारतीची उभारणी केली आहे.
- केनियामधील एका विद्यापीठावर भीषण दहशतवादी हल्ला करुन शेकडो निष्पाप विद्यार्थ्यांची हत्या करणाऱ्या अल शबाब या दहशतवादी संघटनेच्या सोमालियामधील दोन तळांवर केनियन हवाई दलाने जोरदार हल्ला चढविला.
- अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या अल शबाबच्या दहशतवाद्यांनी सोमालियाच्या सीमारेषेपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या गॅरिसा विद्यापीठावर केलेल्या निर्दय हल्ल्यामध्ये १४८ विद्यार्थी मृत्युमुखी पडले होते.
- या विद्यापीठामध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांना वेगळे काढत त्यांची निर्घृणपणे हत्या केली होती.
- आरोपीविरुद्ध खटला दाखल न करता अनिश्चित काळापर्यंत त्याला तुरुंगात ठेवण्याची मुभा देणारे वादग्रस्त दहशतवादविरोधी विधेयक मलेशियातील संसदेने पुन्हा एकदा संमत केले.
- मलेशियाचे सुधारणावादी मानले जाणारे पंतप्रधान नजीब रझाक यांनी २०१२ मध्ये हा कायदा रद्द केला होता. मात्र हा कायदा आता पुन्हा एकदा लागू केला जाणार आहे.
- मलेशियातील विरोधी पक्षांनी या कायद्यात काही दुरुस्त्या सुचविल्या होत्या. परंतु मलेशियन सरकारने या विधेयकामध्ये कोणताही बदल न करता त्याचे कायद्यात रुपांतर केले.
- या कायद्यामुळे कोणतीही संस्था दहशतवादी संस्था म्हणून घोषित करण्याचे अधिकार सरकारला मिळाले आहेत. सरकारच्या यासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांचे न्यायालयाकडून परीक्षण करता येणार नाही.
- मलेशियाचे पंतप्रधान : नजीब रझाक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा