चालू घडामोडी - ३ एप्रिल २०१५


    ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
  • संतश्रेष्ठ श्री नामदेव नगरी, घुमान, (पंजाब) येथील ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते पंजाबी लेखक गुरुदयाल सिंग, माजी कृषिमंत्री शरद पवार आणि मावळत्या संमेलनाचे प्रमुख फ. मुं. शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. 
  • डॉ. सदानंद मोरे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष उपस्थिती असेल.
  • सकाळी नामदेव ग्रंथदिंडी, कविवर्य नारायण सुमंत यांची कृषिदिंडी निघणार आहे. पद्मश्री सुरतजितसिंग पातर यात सहभागी होणार आहेत. ग्रंथप्रदर्शनाचे उद्‌घाटन फ. मुं. शिंदे व पंजाब साहित्य अकादमीचे अध्यक्ष गुरुभजनसिंग गिल यांच्या हस्ते होणार आहे.

  • अमेरिकेतल्या इंटेल सेंटर या खासगी कंपनीनं जगातल्या धोकादायक राष्ट्रांची यादी जाहीर केली. यात पाकिस्तान हे जगातलं आठव्या क्रमांकाचं धोकादायक राष्ट्र ठरलंय.
  • इराक सर्वात धोकादायक असल्याचं समोर आलंय. इंटेल सेंटर ही कंपनी जगभरातल्या गुप्तचर यंत्रणांना सहाय्य पुरवते. 
  • या यादीमधले टॉप १० देश अनुक्रमे असे : इराक, सिरीया, नायजेरिया, सोमालिया, अफगाणिस्तान, लिबिया, येमेन, पाकिस्तान, युक्रेन, इजिप्त 
  • दक्षिण आशियाई देशातील केवळ अफगाणिस्तानचाच या यादीत समावेश आहे. 
  • गेल्या महिनाभरात दहशतवाद्यांचे तसेच बंडखोरांचे हल्ले, तसेच त्यासंबंधीची छायाचित्रे, व्हिडिओ तसेच हल्ल्यांमध्ये मृत आणि जखमी झालेल्यांच्या संख्येवरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

  • येमेनमधील अल-कायदा दहशतवाद्यांनी समुद्रकिनाऱ्यालगतच्या अल-मुकल्ला शहरात घुसखोरी करीत तेथील ३०० कैद्यांची सुटका केली. त्यामध्ये अनेक दहशतवादी आणि शिया बंडखोरांचा समावेश आहे. एडनमधील संघर्षात सहभागी असलेले हे शिया बंडखोर आहेत
  • इराणचा पाठिंबा असलेल्या हौथी या शिया बंडखोर संघटनेला लक्ष्य करीत सौदी अरेबियाने हवाई हल्ले सुरू केले असले, तरी बंडखोरांचा प्रभाव अद्यापही कमी झालेला नाही. एडनमध्ये येमेनचे अध्यक्ष अबिद रब्बो मन्सूर हादी यांची सुरक्षा यंत्रणा हौथीने भेदली आहे.

  • फेसबुकच्या ‘क्रिएटिव्ह लॅब’ने त्यांच्या युजर्ससाठी ‘रिफ’ नावाचे नवे ऍप विकसित केले आहे. ‘फूल्स डे’ म्हणजे एक एप्रिलनिमित्त हे प्रदर्शित करण्यात आले. या रिफ ऍपमध्ये तुम्ही मूळ व्हिडिओसोबत आणखीन एक सहायक व्हिडिओ जोडू शकतो.
  • तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबतचा २० सेकंदांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून मित्रांना टॅग करण्याची सोय यामध्ये दिली आहे. तो शेअर करताना मूळ व्हिडिओच्या खाली त्यातील मित्रांचे ‘फनी फेसेस’ जोडले जातात. 
  • या कल्पनेमुळे व्हिडिओ पाहणाऱ्या युजरला व्हिडिओ आणि त्याखालील संबंधित मित्र-मैत्रिणींचे गमतीदार चेहेरे दिसू लागतात. 
  • ‘रिफ’च्या साह्याने केलेले व्हिडिओ फेसबुकच्या वेब व्हर्जनवरदेखील पाहता येतात. या ऍपमध्ये संपादन, कटिंग, लाइक, कमेंट करण्याची सुविधा नाही.

  • इराण व अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, जर्मनी आणि चीन (पी ५+१) या देशांमध्ये झालेल्या प्रदीर्घ राजनैतिक चर्चेनंतर आता इराणच्या वादग्रस्त आण्विक कार्यक्रमासंदर्भातील करारास अंतिम संमती देण्यात येणार आहे. 
  • या करारान्वये इराणने अणुबॉंब तयार न करण्याचे मान्य केले असून, याबदल्यात इराणवरील कठोर आर्थिक निर्बंध टप्प्याटप्प्याने उठविण्यात येणार आहेत.

  • कांदोळी येथील फॅब इंडिया या तयार कपडे विक्री करणाऱ्या मॉलवजा दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवून अश्लील छायाचित्रे घेतली जात असल्याचा खळबळजनक प्रकार केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी उघडकीस आणला.
  • पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दुकानात सीसीटीव्ही ऑपरेट करणारे कर्मचारी परेश भगत, राजू पायानशी, प्रशांत नाईक, व करीम लखानी या चौघांना अटक केली आहे. 
  • पोलिसांनी अटक केलेले चौघे जण व दुकान चालकाविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या ३५४ (सी) कलमाखाली विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

  • नायजेरियामध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुहाम्मदू बुहारी यांनी गुडलक जोनाथन यांचा पराभव केला आहे. बुहारी यांना १ कोटी ५४ लाख मते पडली आहे तर जोनाथन यांना १ कोटी ३३ लाख मते पडली आहेत.
  • नायजेरियात निवडणूक जिंकणारे बुहारी हे पहिले विरोधी पक्षाचे नेते आहेत. ऑल प्रोगेसिव्ह काँग्रेस पक्षाने विरोध पक्षात निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे.

  • डॉ. गुलशन राय यांना देशाचे पहिले ‘मुख्य सायबर सुरक्षा अधिकारी’ म्हणून नेमण्यात आले आहे. मार्च २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नवीन पदाची निर्मिती पंतप्रधान कार्यालयांतर्गत केली.
  • राय हे गेल्या २५ वर्षांपासून माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सायबर सुरक्षा, ई-प्रशासन, ई-कॉमर्स क्षेत्रासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा आदी क्षेत्रांत काम केले आहे.
  • सध्या ते ‘इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’चे महासंचालक म्हणून कार्यरत होते.
  • यापूर्वी राय यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत येणाऱ्या शिक्षण आणि संशोधन नेटवर्कचे कार्यकारी संचालक म्हणून सात वर्षे काम पाहिले.

  • मरियम आसिफ सिद्दिकी (वय १२) या सहावीत शिकणाऱ्या मुलीने भगवद्‌गीता स्पर्धा जिंकून एकतेचा संदेश दिला आहे. 
  • १९५ शाळांतील साडेचार हजारांपेक्षा अधिक सहभागी स्पर्धकांमधून मुस्लिम धर्मीय असलेल्या मरियमने ही स्पर्धा जिंकली. 
  • ‘इस्कॉन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने भगवद्‌गीतेसंदर्भात स्पर्धा घेण्यात आली. या वेळी घेण्यात आलेल्या चाचणीत बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेद्वारे विद्यार्थ्यांचे भगवद्‌गीतेविषयीचे ज्ञान तसेच भगवद्‌गीतेचे आकलन तपासण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा