चालू घडामोडी - १९ व २० एप्रिल २०१५
- ‘जातीवाचक शिवीगाळ’ (ऍट्रॉसिटी) केल्याची प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहू नयेत, असे खटले जलदगतीने चालविले जावेत तसेच जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यांवर पायबंद बसण्यासाठी राज्यात आठ ठिकाणी विशेष न्यायालये सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती सी. एम. थूल यांनी दिली.
- राज्यातील आठ महसुली शहरांपैकी नागपूर व मुंबई येथे अशी विशेष न्यायालये सुरू झाली आहेत. भविष्यात अन्य सहा ठिकाणीही न्यायालये सुरू होतील.
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येच्युरी यांची पक्षाचे सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच, सोळा जणांची पॉलिट ब्युरो म्हणून, तर ९१ जणांची पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे (सेन्ट्रल कमिटी) सदस्य म्हणूनही नियुक्ती करण्यात आली.
- विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या पक्षाच्या २१ व्या कॉंग्रेस बैठकीत येच्युरी यांची सरचिटणीसपदाचे उमेदवार म्हणून मावळते सरचिटणीस प्रकाश कारत यांनी घोषणा केली.
- बॉलिवूडमधील एव्हरग्रीन चित्रपटांमध्ये समावेश असलेला ‘शोले’ हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाल्यानंतर सुमारे ४० वर्षांनी शुक्रवारी पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झाला.
- पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट हे पूर्वी व्हीसीआरवर दाखविण्यात येत होते. त्या वेळी भारतीय चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये स्थान नव्हते.
- पण, आता सुमारे ४० वर्षांनी रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ हा चित्रपट कराचीतील न्यूप्लेक्स या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
- जिओ फिल्म्स आणि मंडीवाला एंटरटेन्मेंट यांनी हा चित्रपट पाकिस्तानमध्ये आता प्रदर्शित केला असून, याच्या ग्रॅंड प्रीमियरला पाकिस्तानमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते.
- ‘आधार कार्ड’ किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र सादर करूनही ‘पॅन’ काढण्याची सुविधा प्राप्तिकर खात्याने उपलब्ध करून दिली आहे.
- ‘पॅन’ काढण्यासाठीची काहीशी किचकट प्रक्रिया सोपी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
- संयुक्त राष्ट्रसंघाची ‘थिंक टॅंक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी’ने ‘ग्लोबल ई-वेस्ट मॉनिटर- २०१४’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या निर्मितीमध्ये भारत पाचव्या स्थानावर जाऊन पोचला आहे.
- मागील वर्षभराच्या अवधीमध्ये अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये ३२ टक्के एवढा इलेक्ट्रॉनिक कचरा तयार झाला असून अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीनंतर भारताचा क्रमांक लागतो.
- मागील वर्षभरात देशभर १.७ दशलक्ष टन इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची निर्मिती झाली असून पुढील तीन वर्षांमध्ये देशातील इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या निर्मितीचे प्रमाण २१ टक्क्यांनी वाढणार असल्याचे हा अहवाल सांगतो.
- आर्थिकदृष्ट्या मागासलेला खंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आफ्रिकेमध्ये मात्र ई-कचऱ्याच्या निर्मितीचे प्रमाण सर्वांत कमी म्हणजे फक्त १.९ दशलक्ष टन एवढे नगण्य असल्याचे दिसून आले.
- इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या संपर्कात आल्याने कर्करोग, यकृताचे आजार, मूत्राशयाचे रोग होण्याचे प्रमाण बळावते, असे हा अहवाल सांगतो.
- जगभरातील अनेक देशांमध्ये घेतलेल्या सर्वेक्षणांच्या आधारे ब्रॉडबँड विस्ताराचे प्रमाण निर्धारित करण्यात आले आहे. त्यामध्ये भारताचा १२५ वा क्रमांक लागतो. भारताचे शेजारी राष्ट्र असणारे भूतान आणि श्रीलंका यांनीही ब्रॉडबँड विस्तारामध्ये आघाडी घेतली आहे.
- वायरलेस ब्रॉडबँडमध्ये भारताचा जगभरातील देशांमध्ये ११३वा क्रमांक असून, विस्ताराचे प्रमाण १०० यूजरमागे ३.२ टक्के आहे.
- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अध्यक्ष : राहुल खुल्लर
- सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे पोलिस अधीक्षक विवेक प्रियदर्शी यांना आयपीएल-६ स्पॉट फिक्सिंग प्रकरणच्या चौकशी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याची परवानगी दिली.
- हि चौकशी समिती स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणामध्ये आयपीएलचे माजी सीओओ सुंदर रमन यांची चौकशी करेल.
- सर्वोच्च न्यायालयाने माजी सरन्यायाधीश राजेंद्र मल लोढा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. हि समिती राज कुंद्रा, गुरुनाथ मयप्पन, आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या शिक्षेसंबंधी निर्णय घेणार आहे.
- बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानावर उतरलेल्या अंकित केशरी (वय २०) या बंगालच्या नवोदित क्रिकेटपटूचा झेल घेताना सहकारी खेळाडूशी धडक होऊन दुर्दैवी मृत्यू झाला.
- ‘कॅब’ने (बंगाल क्रिकेट संघटना) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. अंकित ईस्ट बंगालकडून खेळत होता.
- भवानीपूर क्लबविरुद्धच्या लढतीसाठी अंतिम संघात त्याचा समावेश नव्हता. रेल्वेचा रणजीपटू अर्णब नंदी याच्याऐवजी तो मैदानावर उतरला होता.
- भारतातील सरकारी क्षेत्रातील दूसरी सर्वात मोठी तेल उत्खनन कंपनी ऑईल इंडियाने गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये आपल्या ५४ मेगावॅट क्षमतेच्या पवन पवन उर्जा प्रकल्पाला सुरुवात केली.
- दोन राज्यांच्या भागीदारीमध्ये असलेल्या या योजनेतील १६ मेगावॅट क्षमतेचा एक टप्पा गुजरात मधील पाटण येथे तर ३८ मेगावॅट क्षमेतेचा दुसरा मध्यप्रदेशमधील चंदगढ येथे असेल.
- या योजनेचा एकूण खर्च ४३९ कोटी रुपये आहे, ज्यामध्ये गुजरातमधील प्रकल्पाचा खर्च १२६.५ कोटी आणि मध्यप्रदेशमधील प्रकल्पाचा खर्च ३१२.४५ कोटी रुपये आहे.
- या योजनेनंतर कंपनीची एकूण अक्षय ऊर्जा क्षमता (व्यावसायिक पवन उर्जा आणि सौर ऊर्जा योजना) १२६.०० मेगावॅट झाली आहे.
- आंतरराष्ट्रीय पॅराऑलम्पिक समितीने (IPC) भारतीय पॅराऑलम्पिक समितीला अनिश्चित काळासाठी बरखास्त केले.
- गाझियाबाद (दिल्ली) मध्ये २० ते २२ मार्च २०१५ दरम्यान पार पडलेल्या १५ व्या राष्ट्रीय पॅराऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना अत्यंत निकृष्ट दर्जाच्या सोयीसुविधा देण्यात आल्यामुळे आंतरराष्ट्रीय पॅराऑलम्पिक समितीने हा निर्णय घेतला.
- भारतीय पॅराऑलम्पिक समितीला बरखास्त करण्याची आंतरराष्ट्रीय पॅराऑलम्पिक समितीची (IPC) हि दुसरी वेळ आहे.
- यामुळे आता भारतीय पॅराऍथलिटला २०१६च्या रिओ दि जनेरो येथे होणाऱ्या पॅराऑलम्पिक स्पर्धा तसेच आयपीसी पुरस्कृत कोणत्याच स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
- यासंदर्भात केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय पॅराऑलम्पिक समितीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
- भारताची वाय. प्रांजला हिने चीनच्या झेंग वूशुआंगचा पराभव करत आशियाई ज्यूनियर टेनिस स्पर्धा जिंकली.
- प्रांजलाने झेंग वूशुआंगच्या साथीने आशियाई ज्यूनियर टेनिस दुहेरी स्पर्धेचे विजेतेपदहि मिळविले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा