केंद्र सरकारने १ एप्रिल २०१५ रोजी फास्टर एडॉप्शन अँड मॅन्यूफेक्चरिंग ऑफ हाइब्रिड अँड इलेक्ट्रिक वेहिकल्स (फेम) इंडिया योजनेची सुरुवात केली.
ही योजना देशातील पर्यावरण अनुकूल वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे. ही योजना ‘राष्ट्रीय इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन’चा भाग आहे.
या योजनेद्वारे २०२० पर्यंत वीज आणि हायब्रिडचलित वाहनांच्या निर्मिती आणि विक्रीकरिता ७९५ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.
फेम इंडिया योजनेची वैशिष्ट्ये
या योजनेचा कार्यकाळ ६ वर्षाचा असून २०२० पर्यंत ही योजना २ टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
पहिला टप्पा २०१५-१६ आणि २०१६-१७ या कालावधीत राबविण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील अनुभवाचा अभ्यास करून ३१ मार्च २०१७ नंतर पुढील टप्पा राबविण्यात येईल.
या योजनेचे चार महत्वाचे उद्देश : तंत्रज्ञान विकास, प्रकल्प मार्गदर्शन, मागणीची निर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास
अवजड उद्योग मंत्रालयांतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे.
नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन:
केंद्र सरकारने २०१३ मध्ये राष्ट्रीय इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन-२०२० (एनईएमएमपी) चे उद्घाटन केले.
देशात हाइब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देऊन इंधन बचत करण्यासाठी एनईएमएमपीची सुरुवात केली गेली.
या योजनेंतर्गत २०२० पर्यंत ६-७ लाख हाइब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचे लक्ष्य आहे.
भारताचा परकीय चलनसाठा २७ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात १.३९ अब्ज डॉलरने वाढून ३४१.३७८ अब्ज डॉलर या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
परकीय चलन मालमत्तेत (फॉरिन करेन्सी असेट्स-एफसीए) वाढ झाल्याने परकीय चलनसाठा वाढला आहे. आता परत परकीय चलनसाठा आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
देशातील सोन्याचा साठा १९.८४ अब्ज डॉलर इतका कायम आहे.
आरबीआयने दिलेल्या आकडेवारीनुसार या आठवड्यात भारताचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील राखीवसाठा १.२९ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.
आंध्रप्रदेश राज्याच्या नवीन राजधानीचे नाव अमरावती असेल. विजयवाडा-गुंटूर परिसरात या शहराचा विकास केला जाणार आहे.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
याचबरोबर या गावाच्या विकासासाठीच्या मास्टर प्लॅनच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली. हा प्लॅन सिंगापूर सरकारने तयार केला आहे.
अमरावतीची वैशिष्ट्ये :
कृष्णा नदीकाठी वसलेले हे गाव २००० वर्षापूर्वी ४०० वर्षाकरिता सातवाहन साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते. त्यामुळे या गावाला ऐतिहासिक व अध्यात्मिक महत्व प्राप्त झाले आहे.
गावातील अमरेश्वराच्या मंदिरामुळे याला अमरावती असे नाव पडले. तसेच या गावाला ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळख प्राप्त आहे.
या गावाला गौतम बुद्ध, सम्राट अशोक तसेच चीनी प्रवासी ह्युएन त्संग यांनी भेटी दिल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या तंबाखूविरोधी मोहिमेची ‘पोस्टरगर्ल’ ठरलेल्या सुनीता तोमर या महिलेचे तोंडाच्या कर्करोगाची लढा देत असताना मध्य प्रदेशात निधन झाले.
तंबाखूविरोधी मोहिमेच्या जाहिरातीत त्यांनी आपले वैयक्तिक अनुभव सांगून कॅन्सरबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या कामी आपले योगदान दिले होते.
शहरी भागात राहणाऱ्या गरिबांना माफक दरामध्ये जेवणाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून ओडिशा राज्य सरकारने १ एप्रिलपासून ‘आहार’ योजना सुरू केली आहे.
१ एप्रिल या ओडिशा राज्याच्या स्थापनेच्या दिवशी (उत्कल दिवस) ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आहार योजनेचे उद्घाटन केले.
प्रायोगिक तत्वावर या योजनेअन्वये कटक, भुवनेश्वर, संभळपूर, बेहरामपूर आणि राऊरकेला पाच जिल्ह्यांमधील नागरिकांना पाच रुपयांमध्ये डाळ-भात उपलब्ध करून दिला जाईल.
अशा प्रकारची योजना सुरू करणारे ओडिशा हे तामिळनाडू (अम्मा कॅन्टिन), कर्नाटक (अण्णा कॅन्टिन) व आंध्रप्रदेश (अण्णा कॅन्टिन) नंतर देशातील चौथे राज्य ठरले आहे.
‘सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी कायदा, १९७३’मध्ये सुधारणा करण्याविषयी निर्णय केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला.
त्यामुळे सोयीसुविधा तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव असलेल्या देशातील होमिओपॅथी कॉलेज बंड करण्याचा अधिकार आता केंद्र सरकारला प्राप्त होणार आहेत.
दोन वर्षांपूर्वी कौन्सिलने केलेल्या पाहणीत १८८ (महाराष्ट्रात ४५) पैकी १०२ कॉलेजमध्ये सोयीसुविधा नसल्याचे आढळून आले होते.
‘प्यू रिचर्स सेंटर’ने जगातील धार्मिक लोकसंख्येचा अभ्यास केला. या अभ्यासाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार इ.स. २०५० पर्यंत जगातील हिंदूंच्या लोकसंख्येत ३४ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत इ.स. २०५० पर्यंत हिंदूंची लोकसंख्या तिसऱ्या क्रमांकावर असेल, तर भारत हा सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला जगातील पहिलाच देश ठरेल, अशी माहिती या अहवालातून समोर आली आहे.
भारतातील मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर अन्य धर्मियांपेक्षा अधिक असल्याचे या अहवालातून दिसून आले आहे.
निवडणूक आयोगाने ‘टोटलायझर’ या मतदान यंत्राचा प्रस्ताव कायदा मंत्रालयाकडे ठेवला होता.
या यंत्रामुळे मतदानावेळी आणि नंतरही मतदानाबाबतच्या गुप्ततेची पुढील पातळी वाढून त्याचा कल ओळखणेही टाळता यावे, अशी आयोगाची अपेक्षा आहे.
कायदा मंत्रालय हे निवडणूक यंत्रणेच्या प्रशासकीय कामास जबाबदार असते. कायदा मंत्रालयाने जरी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला असला, तरी केंद्र सरकारने याबाबत अद्याप विचार केलेला नाही.
मल्ली मस्तान बाबू हा भारतीय गिर्यारोहकअर्जेंटिना व चिलीदरम्यान असलेल्या पर्वतरांगांतील एका पर्वतावर चढताना २४ मार्चला बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह त्याच्या सहकाऱ्यांना सापडला आहे.
मुळचा आंध्र प्रदेशातील नेळ्ळोर येथील रहिवासी असलेला मल्ली बाबू याने आयआयटी खरगपूरमधून पदवी मिळविली होती.
त्याला गिर्यारोहणाची प्रचंड आवड होती. त्याने २००६ मध्ये १७२ दिवसांत सात शिखरे सर केली होती. त्यामुळे त्याची ओळख ‘७ समिटर’ अशी झाली होती.
स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी वॉशिंग्टन येथील न्यायालयाने एका भारतीय वंशाच्या पूर्वी पटेल या महिलेला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
पटेल यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना २० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्या मूळ भारतीय वंशाच्या असून इंडियाना येथे राहत होत्या.
साईना नेहवालला मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
साईनाचा उपांत्य फेरीत अग्रमानांकित चीनच्या ली झुएरुई हिने १३-२१, २१-१७, २२-२० असा पराभव केला.
बंदी असलेले गुंगी आणणारे औषध घेतल्याप्रकरणी एका वर्षात तब्बल २१ भारतीय वेटलिफ्टरर्सची घेण्यात आलेली चाचणी सकारात्मक आढळून आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा